Nandurbar News : नंदुरबारमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, मानाचा दादा गणपतीचा रथ मार्गस्थ, हिना गावितांचे लेझीम नृत्य
Nandurbar Ganesh Visarjan : नंदुरबार (Nandurbar) शहरातील गणपती विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Visarjan) सुरुवात झाली असून मानाच्या दादा गणपतीचा रथ विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे.
नंदुरबार : नंदुरबार (Nandurbar) शहरातील पहिल्या मानाचा दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला (Ganesh Visarjan) सुरुवात झाली असून मानाच्या गणपतीचा रथ विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे. मानाच्या गणपतींना निरोप देण्यासाठी हजारो गणेश भक्त विसर्जन मार्गावर उपस्थित आहेत. पारंपारिक वाद्याच्या तालावर तरुणाई लेझीम नृत्यावर थिरकताना दिसत आहे. याचबरोबर खासदार हिना गावित (Heena Gavit) यांनी मिरवणुकीत सहभागी होत तरुणींसोबत लेझीम नृत्याचा आनंद घेतला.
अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2023) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. नंदुरबार शहरात (Nandurbar Ganeh Visarjan) गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली असून पहिल्या मानाचा गणपती असलेल्या दादा गणपती विसर्जन मार्गावर मार्गस्थ झाला आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' घोषणांनी आणि गुलालाची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत महिलांचे लेझीम पथक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
नंदुरबार शहरात गणेश विसर्जन मिरवणूक यांची धूम पाहण्यास मिळत आहे. मानाच्या पहिल्या दादा गणपतीच्या (Dada Ganpati) विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली असून नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या खासदार डॉ हिना गावित यांनी यावेळी उपस्थिती दर्शवली. मानाच्या दादा गणपती समोर शहरातील तरुणी लेझीम नृत्यामध्ये खासदार हिना गावित ही सहभागी झाल्या होत्या. पारंपारिक वाद्याच्या तालावर खासदार हिना गावित यांनी लेझीम नृत्याचा आनंद घेत गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या तरुणींचा आनंद द्विगुणित केल्याचे पाहायला मिळाले. सनई-संबळ, हलगीच्या तालावर तरुणाई थिरकल्याचे दिसून आले.
जिल्ह्यात 217 सार्वजनिक गणेश मंडळाची मिरवणूक
नंदुरबार जिल्ह्यात 217 सार्वजनिक गणेश मंडळाचे तर अनेक खाजगी गणेश मंडळाच्या बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे. प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली असून ग्रामीण भागात सकाळपासूनच विसर्जन मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. तळोदा शहरात क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळाने आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देत विसर्जन मिरवणूक काढली. मिरवणुकीत अकरा पथकांच्या शिस्तबद्ध पण तितक्याच थरारक कसरतींनी शहरवासियांचे लक्ष वेधून घेतले. मंडळाने नेहमीप्रमाणे गुलाल विरहित मिरवणूक काढून पर्यावरणरक्षणाचा महत्त्वपूर्ण संदेश देखील यानिमित्ताने दिला. यावेळी 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' चा जयघोष करत गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला जात आहे.
इतर महत्वाची बातमी :