एक्स्प्लोर

Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात, आमदार फरांदेंच्या हातात नाशिक ढोल, पालकमंत्र्यांचा हटके डान्स

मानाच्या पाच गणपतीसह 21 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 67 cctv, 4 ड्रोन,  आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे.

Key Events
Nashik Ganpati Visarjan 2023 Anant Chaturdashi Live Updates western Maharashtra Ganpati Visarjan Miravnuk Jalgaon Dhule Nandurbar Ahmednagar Ganpati Visarjan latest news Nashik Ganpati Visarjan 2023 Live : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात, आमदार फरांदेंच्या हातात नाशिक ढोल, पालकमंत्र्यांचा हटके डान्स
Feature Photo

Background

नाशिक : नाशिक शहरातील गणेश विसर्जन मिरवणूक सकाळी 11 वजाता सुरू होणार, पालकमंत्री दादा भुसे यांच्याहस्ते पूजा करून वाकडी बारव पासून मिरवणूक सुरू होणार आहे. मानाच्या पाच गणपतीसह 21 चित्ररथ मिरवणुकीत सहभागी होणार आहे. 67 cctv, 4 ड्रोन,  आणि शेकडो पोलिसांचा बंदोबस्त मिरवणुकीवर लक्ष ठेवून असणार आहे. गुलालावडी व्यायाम शाळेचे लेझीम पथक, इतर मंडळाचे ढोल पथक मिरवणुकीच्या आनंदात भर घालणार आहे. शिवसेवा युवक मंडळाची मिरवणूक खास आकर्षण रहाणार, दक्षिण भारतातील कलाकार देवांची वेशभूषा धारण करून आपली अदाकारी साकारणार आहेत. सकाळी 9 वाजेपासून घरगुती गणेश विसर्जनाला सुरवात होणार आहे. शहराच्या सहा ही विभागात विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. 27 नैसर्गिक आणि 57 कृत्रिम तलावात विसर्जन केले जाणार, अधिकाधिक मूर्ती दान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे

अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून उद्या लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जाईल. नाशिकमध्ये (Nashik) देखील उद्या सकाळी अकरा वाजेपासून मुख्य मिरवणुकीला सुरवात होणार असून गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांच्या बंदोबस्तासह यंदा तब्बल 70 सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Camera) मिरवणूक मार्गावर पाळत ठेवणार आहेत. त्याचबरोबर चार ड्रोनद्वारे अवकाशातून नाशिक गणेश मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवले जाणार आहे. यासह प्रत्येक मंडळांसोबत एक वरिष्ठ अधिकारी व पथक नेमण्यात आले असून हे पथक मंडळांच्या वेळेसंदर्भात नोंदी घेणार आहे. त्यामुळे कुठल्याही अनुचित प्रकाराला आळा बसणार आहे. 

गणेश विसर्जन मिरवणूक (Nashik Ganesh Visarjan) अवघ्या काही तासांवर आली असून नाशिकमध्ये सकाळी अकरा वाजता गणेश विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ होणार आहे. शहरातील भद्रकाली परिसरातील वाकडी बारव येथून सुरुवात होणार आहे. त्यासाठी पोलिस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयाने बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण केले आहे. तसेच रेंगाळणाऱ्या मंडळांवर लक्ष ठेवण्यासाठी मिरवणुकीच्या सुरुवातीपासून 'ड्रोन शूटिंग' करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी केलेल्या चुका, इतर पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येणार आहे. त्यात पोलिसांचे निरीक्षणही कागदोपत्री मांडण्यात येतील. यासह एखाद्या मंडळाने नियमांचे उल्लंघन केले असल्यास त्यावरील कारवाईचा निर्णयही घेण्यात येणार आहे. 

असा आहे मिरवणूक मार्ग 

दरम्यान पारंपरीक मिरवणूक मार्गावरील वाकडी बारव, चौकमंडई, जहांगिर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधी रोड, मेहर सिग्नल, अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुरामपुरीयारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण अशी निघणार आहे. या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद असणार आहे.  

17:34 PM (IST)  •  28 Sep 2023

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला लागले गालबोट, भर मिरवणुकीत दोन तरुणांमध्ये तुफान राडा

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये (Nashik) मोठ्या उत्साहात गणेश विसर्जन मिरवणूक सुरु असून सकाळी पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरवात झाली. दरम्यान सकाळपासुन नाशिककरांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. त्यामुळे मिरवणूक मार्गावर पाय ठेवायला जागा नाही. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, मिरवणूक भद्रकाली परिसरात असताना अचानक दोन तरुणांची (Youth Fight) हाणामारी झाली. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या आणि मिरवणूक पाहायला आलेल्या या दोघांमध्ये तुफान राडा झाला. काही वेळात एकमेकांची डोकीही फोडली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांनाही ताब्यात घेतले. यात एकजण गंभीर असल्याने त्याला पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. 

 

15:02 PM (IST)  •  28 Sep 2023

Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरवात, आमदार फरांदेंच्या हातात नाशिक ढोल, पालकमंत्र्यांचा हटके डान्स 

Nashik Ganesh Visarjan : आज गणेशोत्सवाचा अखेरचा दिवस म्हणजेच अनंत चतुर्दशी असल्याने लाडक्या गणरायाला निरोप दिला जातोय. नाशिक शहरातील जुने नाशिक भागातील वाकडी बारव येथून मुख्य विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला आहे. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी नाशिक ढोल वाजवत आनंद लुटला. तर दुसरीकडे पालकमंत्री दादा भुसे यांनी विसर्जन मिरवणुकीत ढोल ताशाच्या वाद्यांवर ठेका धरल्याचे पाहायला मिळाले. 

अवघ्या राज्यभरात गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला असून आज लाडक्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. पोलिसांच्या सूचनेनुसार नाशिक शहरातील भद्रकाली येथील वाकडी बारव येथून गणपती  विसर्जन रथ मिरवणूकीची सुरवात झाली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज ढोल, ताशांच्या निनादात व टाळ मृदृंगाच्या गजरात उत्साहात सुरूवात झाली. मिरवणूकीत अग्रस्थानी नाशिक महानगरपालिकेचा शासकीय मानाच्या गणपतीसह शहरातील विविध गणपती मंडळांनी सहभाग नोंदविला. लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देत मिरवणूक लवकरात लवकर पुढे नेऊन निर्विघ्नपणे पार पाडावी, असे आवाहन यावेळी मंत्री दादा भुसे यांनी गणेश मंडळांना केले. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओ

Eknath Shinde Shiv Sena : पालिका निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे शिवसेनेत भाकरी फिरवणार?
Shiv Sena UBT MNS Alliance Raj Uddhav Thackeray : दोन दिवसांत ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा?
NCP Alliance PCMC Election :दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकत्र? Nana Kate Sunil Gavhane EXCLUSIVE
Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2026 Auction: आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
आयपीएल 2026 चा आज मिनी लिलाव; किती वाजता सुरु होणार, किती खेळाडूंवर बोली लागणार?, A टू Z माहिती
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Dhurandhar Box Office Collection Day 11: बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' सुस्साट; अकराव्या दिवशी छप्पडफाड कमाई, 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार?
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Thane Election BJP: ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
ठाण्यात तडीपार गुंडाचा भाजप प्रवेश शेवटच्या क्षणी रोखला, वरिष्ठ नेते आयत्यावेळी कार्यक्रमाला आलेच नाहीत, नेमकं काय घडलं?
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
Embed widget