Nashik News :नाशिक गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट, तीन दिवसांपासून धुवाँधार, आज पावसाचा अंदाज काय?
Nashik Ganesh Visarjan : नाशिकमध्ये मोठ्या उत्साहात गणेश मिरवणुकीला सुरवात होत असून मात्र मिरवणुकीवर पावसाची सावट आहे.
नाशिक : नाशिकमध्ये (Nashik) गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरु असल्याने सायंकाळच्या सुमारास येत असलेल्या पावसामुळे गणेशोत्सव देखावे पाहायला जाणाऱ्या नाशिककरांचा चांगलाच हिरमोड झाला. आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा (Ganesh Visarjan) दिवस असल्याने आज पावसाची शक्यता असल्याने ऐन मिरवणुकीत मंडळांसह नाशिककरांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे.
गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा (Nashik Ganeshotsav) उत्साह शिगेला पोहचला आहे. या दहा दिवसातील सात दिवस नाशिककरांनी गणेशोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला. सायंकाळच्या सुमारास नाशिककरांनी मोठ्या संख्येने गणेश देखावे पाहण्यासाठी बाहेर पडत होते. मात्र गेल्या तीन दिवसांपासून सायंकाळच्या सुमारास पाऊस सुरु असल्याने नाशिककरांच्या (Nashik ganesh Visarjan) आनंदावर जणू विरजण पडले होते. गेल्या तीन दिवसांपासून सकाळच्या सुमारास ऊन तर दुपारच्या सुमारास पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे आजही सकाळपासून उन्हाचा तडाखा जाणवत असून आज गणेश विसर्जन मिरवणुकीचा महत्वाचा दिवस असल्याने आजही पावसाची (Nashik Rain) शक्यता नाकारता येत नाही.
गेल्या दहा दिवसांपासून सार्वजनिक मंडळांसह घराघरांत विराजमान झालेल्या गणपती बाप्पाला (Ganpati Bappa Morya) आज निरोप देण्यात येत आहे. गणेश विसर्जनाची तयारी प्रशासनाच्या वतीने पूर्ण करण्यात आली आहे. मात्र गेल्या दिवसांपासून सातत्याने दुपारपासून पावसाला सुरवात होत आहे. सकाळपासून उन्ह जनावत असते. तर दुपारनंतर ढग दाटून येतात. हवामान विभागाकडून पाच दिवसांचा पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार काल ग्रीन अलर्ट असतानाही पाऊस आला. आजही ग्रीन अलर्ट आहे, तरीदेखील गणेश विसर्जन मिरवणुकीवर पावसाचे सावट आहे. गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला सर्वत्र गणरायाच्या उत्सवाची धामधूम, महाप्रसाद व विविध सांस्कृतिक कार्यक्रम होते, मात्र त्यातच धुवाधार पावसाने हजेरी लावल्याने या उत्सवाच्या आनंदावरच पाणी फिरल्याचे चित्र पाहायला मिळाले.
आजही पावसाचे सावट
दरम्यान गणेश विसर्जनासाठी विसर्जन घाट, नैसर्गिक घाट व कृत्रिम तलाव या ठिकाणी जय्यत तयारी केली असून, पारंपरिक मिरवणुकीने ढोलताशांच्या गजरात निरोप दिला जात आहे. भक्तगणांच्या अलोट गर्दीकडून गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या'च्या निनादात गणरायांना निरोप दिला जाणार आहे. महापालिकेतर्फे सर्व सहा विभागात नैसर्गिक घाटांजवळ व कृत्रिम तलावांची ठिकठिकाणी निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान अखेरच्या दिवशी विविध मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिक गर्दी करतील असे वाटत होते, परंतु पावसामुळे त्यांच्या उत्साहावर विरजण पडले. आज सकाळपासून वातावरणात चांगलीच उष्णता जाणवत असून दुपारी पावसाची शक्यता असल्याने गणेशभक्तांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी :