एक्स्प्लोर

KCR : तेलंगणातील गुलाबी वादळ अखेर महाराष्ट्रात धडकण्यासाठी सज्ज, नांदेडमधील नवीन मोंढा मैदानात 5 फेब्रुवारीला जाहीर सभा

K. Chandrashekar Rao: नांदेडमधील नवीन मोंढा मैदानात सभा पार पडणार आहे. पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.

मुंबई:   तेलंगणातील गुलाबी वादळ अखेर महाराष्ट्रात धडकण्यासाठी सज्ज झालंय. भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांची महाराष्ट्रातील पहिली जाहीर सभा नांदेडमध्ये (Nanded)  होणार आहे.. शिक्षक मतदारसंघाच्या आचारसंहितेमुळे 15 जानेवारी रोजी होणारी सभा रद्द झाली होती. त्यानंतर आता 5 फेब्रुलारीला सभा होणार आहे.. नांदेडमधील नवीन मोंढा मैदानात सभा पार पडणार आहे. पक्ष आता राष्ट्रीय राजकारणात आला आहे. त्याच पक्ष वाढीसाठी आणि पक्ष बांधणीसाठी केसीआर यांनी महाराष्ट्रात पहिल्या महासभेचं आयोजन केले आहे.

मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव कर्नाटक (Karnatak) , महाराष्ट्र (Maharashtra) , छत्तीसगड (Chhattisgarh) , गुजरात (Gujrat) आणि ओडिशामध्ये (Odisha)  शिरकावाचा प्रयत्न आहे. पक्षाच्या अंतर्गत माहितीनुसार, तेलुगू भाषिक लोकसंख्या इतर राज्यांमधील लोकसभेच्या जवळपास 30 जागांच्या निकालांवर परिणाम करू शकते. त्यात कर्नाटकातील 40 विधानसभा आणि 14 लोकसभेच्या जागा, महाराष्ट्रातील 22 विधानसभा आणि 8 लोकसभेच्या जागा, छत्तीसगडमधील 12 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागा, 18 लोकसभा जागांवर तेलगू भाषिक लोक प्रभाव दाखवू शकतात.

राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

महाराष्ट्रातील तेलंगाणा सीमाभागातील किनवट, माहूर, बिलोली, देगलुर, धर्माबाद या तालुक्यातील गावांमध्ये बैठका होणार आहेत. ओवैसींच्या एमआयएमनंही नांदेडमधूनच महाराष्ट्रात एन्ट्री घेतली होती. एमआयएमचे  पुढे आमदार आणि खासदाराही झाले आणि आता त्याच मार्गानं केसीआरही महाराष्ट्रात येत आहेत. यासभेला सीमावादाचीही पार्श्वभूमी आहे. ज्या पद्धतीनं काही गावांनी कर्नाटकात जाण्यासाठी ठराव मंजूर केले. त्याच पद्धतीनं नांदेडच्या तेलंगाणा सीमा भागातल्या  काही गावांनीही ठराव केले होते. त्यांनी तेलंगाणात जाण्याची तयारी दर्शवली होती. केसीआर यांचा पक्ष आधी तेलंगाणा राष्ट्र समिती होता.  त्याचंच नाव बदलून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती ( Bharat Rashtra Samithi)  केले आणि राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री घेतली.

तेलुगू भाषिकांसह वंचित समाजांना आकर्षित करण्याचा प्रयत्न असणार आहे. दलित, ओबीसीसह इतर मागास समाजांवर केसीआर यांच्या पक्षाची मदार आहे. तेलंगाणात हाच मतदार काँग्रेससोबत होता आणि आता तोच मतदार बीआरएससोबत आहे.  महाराष्ट्रातही असंच काहीसं होणार का? की महाराष्ट्रातील सभांच्या आड केसीआर यांचा आणखी काही प्लॅन आहे हे लवकरच कळणार आहे.  

इतर महत्त्वाच्या बातम्या :

KCR National Party Launch : तेलंगणा सीएम केसीआर यांचा राष्ट्रीय राजकारणात चंचुप्रवेश; 2024 साठी नेमकी रणनीती आहे तरी काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nawab Malik at Ajit Pawar : अजित पवार यांच्या घरी डिनर डिप्लोमसी, नवाब मलिकांची खास उपस्थिती!Deekshabhoomi Underground Parking Issue : नागपूर दीक्षाभूमी आंदोलन कुणी भडकवलं? Spcial ReportTop 25 : रात्रीच्या राज्यातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 02 July 2024 : ABP MajhaVidhan Parishad Election Special Report : घेणार माघार की होणार घोडेबाजार? विधानपरिषदेत कुणाचा गेम?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
IND vs ZIM: ध्रुव जुरेल की जितेश शर्मा... संजू सॅमसनच्या जागी विकेटकीपर कोण?
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
जिम्बाब्वे दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना, पाहा फोटो
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
Photos: शाहिद कपूर ते युवराज सिंह... लग्नाआधी सानियाचं नाव कुणा कुणासोबत जोडलं?
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Embed widget