एक्स्प्लोर

Nanded Heavy Rain: रावणगाव साखरझोपेत असताना आभाळ फाटलं, नांदेडच्या मुखेडमध्ये ढगफुटीसदृश पाऊस, सहा गावं पाण्याखाली

Nanded Heavy Rain news: रात्री दीड वाजता आभाळ फाटलं, एक रात्रीत पाण्याची पातळी 18 फुटांनी वाढली, नांदेडच्या मुखेड तालुक्यात नेमकं काय घडलं? सहा गाव पाण्याखाली गेली आहेत.

Nanded Heavy Rain: गेल्या काही तासांपासून मराठवाड्याच्या काही भागांमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. नांदेडच्या मुखेड तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटीसदृश पाऊस (Heavy Rain) झाल्याने सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी दोन गावांमध्ये तब्बल 80 नागरिक अडकून पडले आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने आता या नागरिकांना वाचवण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दलाला  (एसडीआरएफ) पाचारण करण्यात आले असून लहान होड्या आणि बोटींच्या साहाय्याने नागरिकांना बाहेर काढण्याची मोहीम सुरु झाली आहे.

गेल्या काही तासांपासून मुखेड, उद्गीर या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. धरणक्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्याने मुखेड तालुक्यातील सहा गावं पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यासंदर्भात स्थानिक आमदार तुषार राठोड यांनी माहिती देताना सांगितले की, मुखेड तालुक्यात फारसा पाऊस झालेला नाही. मात्र, तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या उद्गीर येथील धरणक्षेत्रात मुसळधार  पाऊस झाला आहे. रविवारी रात्री गावकरी झोपल्यानंतर रात्री दीड ते दोनच्या सुमारास उद्गीर भागात ढगफुटीसदृश पाऊस झाला. त्यामुळे लेंडी नदीला पूर आला. अलीकडेच लेंडी आंतरराज्यीय प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याने पूरपरिस्थिती आणखी गंभीर झाली आहे. त्यामुळे मुखेड तालुक्यातील भेंडेगाव, बुद्रुक, भिंगोली, हसनाळ, रावणगाव, भासवाडी आणि मारजवाडी ही सहा गावं पाण्याखाली गेली आहेत. यापैकी चार गावांमधील नागरिकांना रात्रीच सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले. मात्र, रावणगाव येथील गावठाणात 80 जण अडकले आहेत. तर हसनाळ येथे 9 जण अडकले आहेत. या सगळ्यांच्या मदतीसाठी सकाळी सहा वाजल्यापासूनच एसडीआरएफ, उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार संपूर्ण यंत्रणेसह बचावकार्यासाठी दाखल झाले होते. सध्या पाऊस कमी झाला असून पाण्याची पातळी कमी झाली आहे, अशी माहिती आमदार तुषार राठोड यांनी दिली.

गेल्या तीन दिवसांपासून मुखेड तालुक्यात संततधार पाऊस सुरु आहे. मात्र, रविवारी रात्री दीड-दोन वाजल्यानंतर तुफान पाऊस झाला. हा पाऊस मुखेडला कमी झाला. मात्र, तालुक्याच्या बॉर्डरवर असणाऱ्या उद्गीर येथील धरणक्षेत्राच्या वरच्या भागात पाऊस झाला. त्यामुळे एका रात्रीत 18 फूट पाणी वाढले, असेही तुषार राठोड यांनी सांगितले.

Marathwada Rain: मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण येलदरी तुडुंब भरले

मराठवाड्यातील दुसरे मोठे धरण असलेले येलदरी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे. धरण परिसरात सुरू असलेला पाऊस तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून येत असलेली पाण्याची आवक यामुळे धरणाचे सर्व १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. १० दरवाजे आणि जलविद्युत केंद्राच्या टर्बाइनमधून एकुण २३८०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग हा पूर्णा नदीपात्रात सोडण्यात आलाय. त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. येलदरी धरण भरल्याने परभणी,हिंगोली,नांदेड,वसमत,पुर्णा या ५ प्रमुख शहरासह २०० खेड्यांचा पाणी प्रश्न मिटला आहे तसेच जवळपास ७० हजार हेक्टर वरील शेतीपिकांना यांचा फायदा होणार आहे.

आणखी वाचा

मुंबईत मुसळधार पाऊस; पार्किंगमध्ये गाड्या उभ्या असल्यासारख्या रस्त्यांवर रांगा, लोकलवरही परिणाम

मी गेल्या 2 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत आहे
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य

व्हिडीओ

Raj Thackeray Sena Bhavan हाकेच्या अंतरावर सेनाभवन,जायला 20 वर्ष, राज ठाकरे भावूक Special Report
Thackeray Brothers Vachanam Special Report ठाकरे बंधूंचा मुंबई महापालिकेसाठी वचननामा,सेनाभाजपची टीका
Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
मनसेच्या नाशिकमधील सत्ताकाळातील महापौर-उपमहापौर आमने सामने, नाशिकमधील लक्षवेधी लढत चर्चेत, कोण बाजी मारणार?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray VIDEO : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
BMC Election 2026: मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
मुंबईत राज-उद्धव ठाकरे एकत्र येण्याचा फायदा होणार नाही कारण...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली भाजपची ती थिअरी
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
Embed widget