एक्स्प्लोर

पगार मिळत नसल्याने शिक्षकांवर उपासमारीची वेळ; नागपूर विधानभवनावर मोर्चा

18 वर्षांपासून हिवाळी अधिवेशनात कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचा पगारासाठी मोर्चा येतो. पगार मिळत नसल्याने पडेल ते काम करुन शिक्षक आपली गुजराण करत आहेत.

नागपूर : तुम्ही किती दिवस किंवा किती महिने विना पगार काम करू शकता. कदाचित काही महिने. मात्र, जर एखाद्यावर तब्बल 18 वर्ष विना पगार काम करण्याची वेळ आली तर तुम्ही काय म्हणणार? नागपुरात विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशन दरम्यान ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांचा असाच एक मोर्चा आला आहे. जे गेले वर्षानुवर्षे विना पगार काम करत आहेत. हे शिक्षक काम करत असलेले कनिष्ठ महाविद्यालय शासनाकडून अनुदानासाठी पात्र ठरल्यानंतरही शासनाने त्यासाठी आर्थिक तरतूद केलेली नाही. गेल्या 18 वर्षात राज्यात 5 मुख्यमंत्री होऊन गेले, अनेक शिक्षण मंत्र्यांनी सत्ता उपभोगली. अनेक वेळा आश्वासने देऊनही आर्थिक तरतूद झाली नाही. परिणामी आज हे विना पगारी शिक्षक मोल मजुरी करण्यासाठी, सायकलवर फिरुन चणे, फुटाणे, डाळी, मसाले विकण्यासाठी मजबूर झाले आहे. राज्यात ज्युनियर कॉलेजच्या अशा विना पगारी शिक्षकांची संख्या 23 हजार आहे. नव्या राज्य सरकारकडून मोठ्या अपेक्षा घेऊन हे शिक्षक राज्यातील कानाकोपऱ्यातून सध्या नागपूरात आले आहे. यापैकी काही शिक्षकांनी त्यांची व्यथा एबीपी माझासमोर व्यक्त केली. मधू तिहारे यांच शिक्षण एमएससी झालं आहे. मात्र, सध्या ते गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यात सकाळी सायकलवर फिरुन चणे, फुटाणे, डाळी विकतात. त्यानंतर ते दुपारी ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवतात. तर, शाहदुल्ला अब्दुल अंसारी, शिक्षणाने एमएससी बीएड आहेत. जीवविज्ञान हा विषय ते शिकवतात. मात्र, पगार मिळत नसल्यामुळे जिंतूर तालुक्यात गावागावात फिरुन मसाले विकण्याचंही ते काम करतात. त्यामुळे त्यांना संपूर्ण तालुक्यात मसाले वाले गुरुजी असही म्हणतात. गणेश ढोरे हे 5 विषयात एमए आहेत, बीएड आणि एमफिलही केलं आहे. मात्र, शैक्षणिक व्यवसायातून कोणताही पगार मिळत नसल्यामुळे गणेश सकाळी कॉलेज आटोपल्यानंतर शेतावर शेतमजूर म्हणून काम करतात. किमान आईचा मृत्यू होण्यापूर्वी एकदा तरी पगार द्या असे आर्जव त्यांनी केले आहे. संबंधित बातम्या - महापालिका शाळेतल्या विद्यार्थी संख्येत गेल्या पाच वर्षात 24 टक्क्यांनी घट जामियाची तुलना जालीयनवाला बागेशी म्हणजे शहीदांचा अपमान : देवेंद्र फडणवीस Solapur University | आमदारांच्या नातेवाईकांचे गुण वाढवल्याचा सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुंवर आरोप | ABP Majha
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल

व्हिडीओ

Durgeshwari Kosekar Nagpur : भाजपकडून सिव्हिल इंजिनिअर दुर्गेश्वरी कोसेकरला उमेदवारी
Thackeray Brothers BMC Election : मुंबईत ठाकरे ब्रँडची 'मराठी' परीक्षा
Mahayuti on Palika Election : महायुतीतल्या अंतर्गत लढाईत कुणाची सरशी? Special report
Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
Shivsena Vs BJP : ठाण्याचा हिशेब, नागपुरात चुकता? शिवसेना-भाजपमध्ये 90-40 चा फॉर्म्युला?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandup Bus Accident: भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
भांडुपमध्ये बसने 13 प्रवाशांना चिरडलं; महिलांना जागचं हलताही आलं नाही, नेमकं काय घडलं? हादरवणारे PHOTO
BJP Candidate List BMC Election 2026: मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
मुंबई महापालिकेसाठी भाजपाच्या 86 उमेदवारांची पहिली यादी जाहीर; ठाकरेंविरुद्ध तगडे उमेदवार!
Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
BMC : साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
साहेब, माझ्यावर अन्याय का? माझं काय चुकलं? निष्ठावंत कार्यकर्त्याचा भाजपश्रेष्ठींना सवाल, उमेदवारी देताना डावलल्याची सल
Vivek Bhimanwar : विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
विवेक भीमनवार यांची MPSC अध्यक्षपदी निवड; आयोगाला लाभणार अनुभवी नेतृत्व
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
कंडका पाडला! राज्यात फक्त कोल्हापुरात महायुतीचं जमलं; भाजप मोठा भाऊ, शिंदेसेना राष्ट्रवादीला किती जागा मिळाल्या?
Emraan Hashmi Mesmerized By Seeing Girija Oak: जेव्हा गिरीजा ओकचं आरस्पानी सौंदर्य पाहून खुद्द इमरान हाश्मी झालेलं दंग; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला कुणालाच ठाऊक नसलेला 'तो' किस्सा
'इमरान हाश्मी स्वत: तिच्याकडे सतत पाहत होता...'; सुप्रसिद्ध दिग्दर्शिकेनं सांगितला 21 वर्षांपूर्वीचा विमानतला 'तो' प्रसंग
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
आदित्य ठाकरेंच्या वरळीत शिवसेनेत नाराजी; तिकीट न मिळाल्याने शाखाप्रमुखाचा राजीनामा, दोन पदाधिकाऱ्यांचीही निराशा
Embed widget