एक्स्प्लोर
Advertisement
जामियाची तुलना जालीयनवाला बागेशी म्हणजे शहीदांचा अपमान : देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जामियातील घटनेची जालियनवाला बाग हत्याकांडाशी तुलना केल्यानं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी ट्वीट करत टीका केली आहे.
मुंबई : जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का ? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला आहे.
देवेंद्र फडणवीस आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, 'जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे. अशा आंदोलनांना प्रोत्साहन देणे यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे'.
जामिया विद्यापीठातील हिंसाचार जालियनवाला बाग हिंसाचाराची आठवण करून देणारा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारवर ताशेरे ओढले. देशातील तरूणांना बिथरवू नका, असा इशाराही त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे. नागपूर येथे आयोजित केलेल्या पत्रकार परीषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीतील जामिया विद्यापीठातील पहिल्यांदाचा हिंसाचारावर भाष्य केले होते.जामिया विद्यापीठातील घटनेची तुलना मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी जालियनवाला बागशी करणे हा देशासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तमाम शहीदांचा अपमान आहे. जे नारे त्याठिकाणी दिले गेले, त्याच्याशी उद्धवजी सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी कृपया देश आणि महाराष्ट्राला द्यावे ! pic.twitter.com/K4SJuSqj4G
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019
उद्धव ठाकरे म्हणाले, देशात अशांतता आणि अस्वस्थततेचं वातावरण निर्माण केलं जात आहे. मी जाणीवपूर्वक हा शब्द वापरत आहे. दिल्लीत विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्यात आला. जणू काही जालियनवाला बागेतले दिवस परत आले की काय? जालियनवाला बाग झाला तेव्हा ज्याप्रमाणे हिंसाचार घडला होता, तसंच वातावरण देशात पुन्हा निर्माण केलं जात आहे की काय अशी भीती देशात आणि तरुणांच्या मनात आहे. ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार येत्या काही दिवसात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. राज्य सरकारकडून त्यासंदर्भातील हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्तच नाही तर चिंतामुक्त करणार असल्याचं म्हटलंय. तर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनीही शेतकरी कर्जमाफीसंदर्भात लवकरच गोड बातमी येईल असं म्हटलंय. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यसाठी ठाकरे सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त होत आहे.अशा आंदोलनांना प्रोत्साहन देणे यावरून तडजोडीची किती मोठी परिसीमा तुम्ही गाठली आहे, हे आता स्पष्ट झाले आहे !!! pic.twitter.com/DK3iZNMLob
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 17, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement