एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खंडणीखोरांवर कारवाई व्हावी, असे म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या सभेत खंडणी मागणारा फरार पदाधिकारी मोकाट
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने आज नागपुरात 'आदित्य संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संवाद कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी "खंडणी मागणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी मांडली.
नागपूर : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेनेने आज नागपुरात 'आदित्य संवाद' कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या संवाद कार्यक्रमादरम्यान आदित्य ठाकरे यांनी "खंडणी मागणाऱ्या पदाधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे", अशी मागणी मांडली. परंतु त्याचवेळी खंडणी मागणारा आणि सध्या फरार असलेला एक पदाधिकारी आदित्य ठाकरे यांच्या संवाद कार्यक्रमात मोकाट फिरत होता.
शिवसेना जिल्हा उपप्रमुख रवीनिश पांडेवर खंडणी मागितल्याप्रकरणी नागपूर जिल्ह्याच्या मौदा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणाले की, कायदा आपले काम करत असून शिवसेना त्यामध्ये पडणार नाही.
रवीनिश पांडे याने दोन दिवसांपूर्वी मध्यरात्रीनंतर राष्ट्रीय महामार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना थांबवून त्यांच्याकडून अवैध वसुली करत खंडणी मागितल्याचा आरोप आहे. रविनिश पांडे आणि त्याच्या तीन सहकाऱ्यांनी रात्री 1 ते 2 दरम्यान नागपूर - भंडारा रोडवर माथनी टोल नाक्याजवळ वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रक्सना थांबवत "आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेनेचे पदाधिकारी आहोत, त्यामुळे ओव्हर लोड गाडी चालवायची असेल तर आम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील" अशी मागणी केली होती. तसे आरोप लावत एका ट्रक मालकाने मौदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. त्यानंतर काल मौदा पोलीस स्टेशनमध्ये पांडे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर खंडणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
चारही आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, पोलिसांच्या लेखी फरार असलेला रविनिश पांडे हा आदित्य ठाकरे यांच्या 'आदित्य संवाद' कार्यक्रमातही उपस्थित होता. त्यामुळे आदित्य ठाकरे जरी कायदेशीर कारवाईची मागणी करत असले तरी खंडणीचा आरोप असलेल्या शिवसैनिकांना अटक करत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
याच प्रकरणात रवीनिश पांडे आणि एका ट्रान्स्पोर्टरदरम्यान झालेल्या संवादाची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत असून त्यामध्ये काही धक्कादायक विधाने आहेत.
रवीनिश : "पुरा गांव खायेगा, पुरा गांव कामायेगा, बिना रॉयल्टी की गाड़ियां चलेगी तो हम (शिवसैनिक) कैसे चुपचाप बैठ जायँगे"
"शिवसेना भी है.. सेना नही है क्या...
राजस्व / महसूल, परिवहन सब विभाग हमारे है. RTO हमारा है.. सरकार हमारी है".
कल आदित्य जी आने वाले है, उसी की तैयारी में लगे है...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement