एक्स्प्लोर

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंनी कलम 370 आणि उपकलमं समजून सांगावेत, संजय राऊतांचा चिमटा

Sanjay Raut : शिवसेनेच्या स्वभावातच गुंडा गर्दी आहे. मात्र ती न्याय हक्कासाठी आहे. एकनाथ शिंदे यांनी 370 कलम आणि उपकलम समजून सांगावेत आणि मग या 370 कलमावर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. 

नागपूर : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut Nagpur) यांची नागपुरात एंट्री होताच, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर हल्लाबोल केला. एकनाथ शिंदे यांनी 370 कलम आणि उपकलम समजून सांगावेत आणि मग या 370 कलमावर बोलावं, असा घणाघात संजय राऊत यांनी केला. ते 'एबीपी माझा'शी बोलत होते. 

शिवसेनेच्या स्वभावातच गुंडा गर्दी आहे. मात्र ती न्याय हक्कासाठी आहे. एकनाथ शिंदे यांनी 370 कलम आणि उपकलम समजून सांगावेत आणि मग या 370 कलमावर बोलावं, असं संजय राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल

यावेळी संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्लाबोल केला. "देवेंद्र फडणवीस म्हणतात नवाब मलिक यांना जो न्याय तो इतरांना सुद्धा लागू होईल. मात्र फडणवीस बोलतात तसं वागत नाहीत. त्याच्यामुळे अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांना सुद्धा तोच न्याय मिळणार का? हा प्रश्न अनुत्तरीत आहे", असं संजय राऊत म्हणाले. 

देवेंद्र फडणवीसांनी मलिकांना महायुतीच्या सरकारमध्ये सामील न करुन घेण्यासाठी अजित पवारांना पत्र लिहिल्यानंतर राजकारणात एकच खळबळ माजली. दरम्यान जो न्याय आम्ही मलिकांना दिलाय, त्यांच्यावर जे आरोप आहेत. ते दुसऱ्या कोणावर असते तरी त्यांना हाच न्याय आम्ही दिला असता, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली होती. फडणवीसांच्या याच उत्तरावर राऊतांनी टीकास्र डागलं. 

डुप्लिकेट राष्ट्रवादी का घाबरतेय? 

 डुप्लिकेट राष्ट्रवादीने नवाब मलिक यांच्या बाजूने आता राहायला हवं. ते का घाबरतात माहित नाही. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला अजित पवारांचा विरोध होता, हे मी सकाळीच बोललो आहे. कारण मी या सगळ्या प्रक्रियेचा भाग होतो म्हणून मी ठामपणे सांगतोय, असं संजय राऊत म्हणाले. 

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी काय बोलतील हे गांभीर्याने घ्यायचं गरज नाही. राज्य सरकारमध्ये नेमकं काय सुरू आहे, त्यावर आम्ही प्रश्न विचारणार. इतिहासात काय झालं ही मोदी पॉलिसी आहे. शिवसेनेची गुंडगिरी ही न्यायासाठी आहे. शिवसेना मनाने गुंडा असतो मुख्यमंत्री हे काही दिवसाचे पाहुणे आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

हेही वाचा : 

Devendra Fadanvis : बाळासाहेब ठाकरेंनी  370 कलम हटवण्याची मागणी केली होती, मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Maharashtra Budget 2024 : अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
अडीच वर्ष 'लाडका बेटा' योजना राबवली, त्याचं काय?, ठाकरेंच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं चोख प्रत्युत्तर
Embed widget