एक्स्प्लोर

Devendra Fadanvis : बाळासाहेब ठाकरेंनी  370 कलम हटवण्याची मागणी केली होती, मोदींनी ते स्वप्न पूर्ण केले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया 

Devendra Fadanvis : आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करुन दाखवलं त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

नागपूर : अनेक वर्ष बाळासाहेब ठाकरेंनी 370 कलम (Article 370) हटवण्याची मागणी केली होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते स्वप्न पूर्ण केलं, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली आहे. पण ज्यावेळी मोदी हे स्वप्न पूर्ण करत होते, तेव्हा उद्धव ठाकरे यांची भूमिका राज्य सभेत वेगळी, इतर ठिकाणी वेगळी होती, असं म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) निशाणा साधला. आम्ही अखंड भारतावर विश्वास ठेवणारी लोकं आहोत, ते असंभव होतं, ते मोदींनी संभव करुन दाखवलं त्यामुळे आपण येत्या काळाची वाट पाहावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाने काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला वैध ठरवलं. त्यानंतर या निर्णयावर अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान कोर्टाच्या निर्णयाने कोणलाही आता शंका येणार नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. 


देशाच्या इतिहासात आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला आज त्यावर सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे मोहर उमटवली. आज भारताचा आणि जम्मू काश्मीरच्या लोकांचा विजय झाला. जम्मू काश्मीर एक विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवादी आगार झालं होतं पण 370 रद्द केल्यानंतर विकासाचा आगार होणार आहे. आज कोर्टाने मोहोर उमटवली त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये विकासाची मोहोर उमटवली असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीसांनी दिली. 

त्यांना या संबंधी बोलण्याची अधिकार नाही - देवेंद्र फडणवीस

कलम 370 चा मुद्दा देखील जेव्हा आला होता, तेव्हाही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली होती. ज्या लोकांनी बाळासाहेबांच्या विचारांना विरोध केला त्यांच्याच विचारांना उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्यांना या संदर्भात काहीही बोलण्याचा अधिकार नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. 

जो न्याय मलिकांना तोच इतरांना - देवेंद्र फडणवीस

मलिकांनी अजित पवारांसोबतची भूमिका जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहिलं. जोपर्यंत त्यांच्यवरील आरोप सिद्ध होत नाहीत, तोपर्यंत त्यांना सत्तेत सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीसांनी केली. यावर बोलताना फडणवीसांनी म्हटलं की, जो न्याय मलिकांना दिलाय,त्यांच्यावर जे आरोप झालेत तसे इतर कोणावर झाले असते, तरी तोच न्याय केला असता. 

विकास कामांना विरोध करणारे हीच उद्धव ठाकरेंची निती - देवेंद्र फडणवीस

धरावीचे टेंडर रद्द करण्याचे काम कोणी केले. विकास कामांना नेहमी विरोध करायची हीच उद्धव ठाकरेंची निती आहे. लोकांना घरं मिळू नये असं त्यांना वाटतं. उद्धव ठाकरे यांचा मूळ स्वभाव हा विरोध करणारा आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर केली. 

हेही वाचा :

Devendra Fadanvis : तर राज्यातील सर्व कांदा केंद्र सरकार खरेदी करणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special ReportChay Wale Baba |  41 वर्षांपासून मौनव्रत, चायवाल्या बाबाची महाकुंभ मेळ्यात चर्चा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लॅम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Nashik Accident : पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
पोलादी सळ्यांनी घेतला पाच तरुणांचा जीव, नाशिकमधील भीषण अपघातानंतर पोलिसांना खडबडून जाग; घेतला मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 जानेवारी 2025 | सोमवार
Embed widget