एक्स्प्लोर
RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता, असे मत त्यांनी मांडले.

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी आज घराणेशाहीच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. मात्र, राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आहे. त्यामुळे हा टोला नेमका कुणाला होता याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे 300 किल्ले होते. मात्र, एकाही किल्ल्यावर किल्लेदार म्हणून महाराजांनी एकही नातेवाईक नेमला नव्हता. कारण शिवाजी महाराज जबाबदारीचे वाटप करताना नात्यांपेक्षा गुणवत्तेला महत्व देत होते, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी व्यक्त केले आहे. सरकार्यवाह भैय्याजी जोशी आज हिंदू साम्राज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्ह व्याख्यानात बोलत होते. जे शिवाजी महाराजांनी तेव्हा केले ते आजही झाले पाहिजे, अशी आठवणही सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी करून दिली. मात्र, राजकारणात नाते संबंधांपेक्षा गुणवत्तेला महत्व दिले पाहिजे अशी आठवण सरकार्यवाह यांनी नेमकी कोणाला करून दिली याची चर्चा आता सुरु होण्याची शक्यता आहे. Coronavirus | पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती शिवराज्याभिषेक दिन हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु साम्राज्य दिनाच्या स्वरूपात साजरा करतो. राज्य कसे चालवलं पाहिजे, राज्य व्यवस्था कशी असली पाहिजे याची एक ब्लूप्रिंट शिवाजी महाराज देऊन गेले आहे. त्यामुळे आज ज्यांना शासन व्यवस्था चालवायची आहे. त्या सर्वांना शिवाजी महाराजांच्या शासन व्यवस्थेला समजून घेण्याची गरज असल्याचेही सरकार्यवाह म्हणाले. एवढेच नाही तर शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे महत्व इंग्रजांनीही ओळखले होते. जर शिवाजी महाराज आणखी 5 ते 6 वर्ष जगले असते. तर कदाचित भारतावर इंग्रजांचे राज्य आलं नसतं असे इंग्रज सैन्यातील अधिकारीही मान्य करायचे, अशी आठवणही सरकार्यवाह यांनी करून दिली आहे. Sunil Tatkare on Nisarg | रायगड जिल्ह्याला कोणतेही निकष न ठेवता मदत करावी : सुनिल तटकरे
आणखी वाचा























