एक्स्प्लोर

चोरीचा पॅटर्न बदलला, नागपुरात मासिक वेतन घेऊन चोरी करणाऱ्या कॉर्पोरेट चोर जेरबंद

शंका येऊ नये म्हणून त्यांच्या मदतीसाठी दहा अणि बारा वर्षीय दोन मुलं सुद्धा पाठविण्यात आली होती. नागपूरातील नेताजी मार्केटमधून मोबाईल चोरीच्या प्रकरणात आफताब इब्रार अन्सारी याला ताब्यात घेतलं आणि तिथून त्याच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली.

नागपूर  : पगारी नोकरांबद्दल तुम्ही आम्ही सर्वांनीच ऐकलंय. पैसे घेऊन काम करणाऱ्यांचीही आपल्याला माहिती आहे. मात्र, नागपूरमध्ये पगार घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यांना नागपूर पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या पगारदार चोरांमुळं नागरिकांसह पोलीस देखील चक्रावले आहेत. बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोरी करणारी एक टोळी नागपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय होती. नागपूर पोलिसांनी या टोळीचा पर्दापाश केला आहे. अमरजीतकुमार महतो, विशालकुमार महातो, धर्मेंद्रकुमार मंडल, भोला महतो, आस्तिक घोष, नंदकुमार चौधरी, आणि आफताब इब्रार अंसारी अशी अटकेतील आरोपींची नावं आहेत. झारखंड मध्ये राहणाऱ्या ह्या टोळीच्या म्होरक्याने एकदम कॉर्पोरेट स्टाईल चोरीचा उद्योगच नागपुरात उघडला होता. चोरीच्या कामानुसार 5000 ते 15000 महिना असा पगार या चोरांना मिळत होता. त्या बरोबर या चोरांच्या राहण्याची आणि जेवणाची ही व्यवस्था करण्यात आली होती.  हे चोरटे बाजार आणि गर्दीच्या ठिकाणी मोबाईल लंपास करायचे. त्यानंतर चोरलेले मोबाईल ते झारखंडमध्ये पाठवून देत होते. तिथून थेट बांगलादेशात मोबाईलची तस्करी केली जायची. शंका येऊ नये म्हणून त्यांच्या मदतीसाठी दहा अणि बारा वर्षीय दोन मुलं सुद्धा पाठविण्यात आली होती. नागपूरातील नेताजी मार्केटमधून मोबाईल चोरीच्या प्रकरणात आफताब इब्रार अन्सारी याला ताब्यात घेतलं आणि तिथून त्याच्या इतर साथीदारांची माहिती मिळाली. ही टोळी पकडली गेली असली, तरी या झारखंडचा म्होरक्‍याने अशा अनेक टोळ्या महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाठवल्या असल्याची माहिती आहे. हा म्होरक्या झारखंडच्या तीन पहाड नावाच्या गावात राहणारा आहे. हा म्होरक्या 25 ते 30 वयोगटातील असल्याची माहिती आहे. शिवाय तो फार शिक्षित देखील नाही. मात्र त्याला मोबाईलबद्दल खूप माहिती आहे. तो स्वत: कधीच आपल्या या पगारी टोळी बरोबर फिरला नाही. त्यांच्याशी संपर्क करायचा असल्यास फोनचा वापर करावा लागत असल्याचे कळाले आहे. तसेच इथे चोरलेले मोबाईल घेऊन त्याला द्यायला  एका व्यक्तीची नेमणूक केली होती, अशी माहितीही मिळाली आहे.
अधिक पाहा..
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
आई-वडिलांच्या तब्येतीची अशी घ्या काळजी, उपयुक्त 6 आहारतत्त्वं
आई-वडिलांच्या तब्येतीची अशी घ्या काळजी, उपयुक्त 6 आहारतत्त्वं
Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, पाण्याअभावी मुलांची लग्नही रखडली, पाहा पाणी टंचाईचं विदारक दृश्य
हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, पाण्याअभावी मुलांची लग्नही रखडली, पाहा पाणी टंचाईचं विदारक दृश्य
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भीमजयंती, दिमाखदार सोहळा, पण डीजेवाल्याने ऐकलंच नाही, गुन्हा दाखल!
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भीमजयंती, दिमाखदार सोहळा, पण डीजेवाल्याने ऐकलंच नाही, गुन्हा दाखल!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kolhapur Accident Video : टेम्पोतील सळई कारच्या काचेत घुसल्या, काळजाचा ठोका चुकवणारा VIDEOABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 22 April 2025Sharad Pawar Sunetra Pawar :विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेची बैठक, शरद पवार - सुनेत्रा पवार एकत्रJaykumar Gore : पोलिसांशिवाय अवैध वाळू उपसा अशक्य, जयकुमार गोरेंचं मोठं वक्तव्य... ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime : त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशातील व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू; परिसरात खळबळ, महंतांचा गंभीर आरोप, म्हणाले...
आई-वडिलांच्या तब्येतीची अशी घ्या काळजी, उपयुक्त 6 आहारतत्त्वं
आई-वडिलांच्या तब्येतीची अशी घ्या काळजी, उपयुक्त 6 आहारतत्त्वं
Water Crisis : हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, पाण्याअभावी मुलांची लग्नही रखडली, पाहा पाणी टंचाईचं विदारक दृश्य
हंडाभर पाण्यासाठी महिलांची वणवण, पाण्याअभावी मुलांची लग्नही रखडली, पाहा पाणी टंचाईचं विदारक दृश्य
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भीमजयंती, दिमाखदार सोहळा, पण डीजेवाल्याने ऐकलंच नाही, गुन्हा दाखल!
महाराष्ट्रातील सर्वात मोठी भीमजयंती, दिमाखदार सोहळा, पण डीजेवाल्याने ऐकलंच नाही, गुन्हा दाखल!
Nashik Crime : आधी विधवा महिलेचा जीव घेतला, नंतर त्याने कडुनिंबाच्या झाडाला दोर लावून स्वतःलाही संपवलं; नाशिक हादरलं!
आधी विधवा महिलेचा जीव घेतला, नंतर त्याने कडुनिंबाच्या झाडाला दोर लावून स्वतःलाही संपवलं; नाशिक हादरलं!
Uddhav Thackeray & Ashish Shelar: उद्धव ठाकरे हा मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह; आशिष शेलारांनी दुसऱ्या ठाकरेंशीही पंगा घेतला
उद्धव ठाकरे हा मुंबईतील लँड स्कॅमचा बादशाह; आशिष शेलारांनी दुसऱ्या ठाकरेंशीही पंगा घेतला
शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर... नेमकं काय म्हणाले मुश्रीफ? 
शरद पवार अजित पवार एकत्र येणार का? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर... नेमकं काय म्हणाले मुश्रीफ? 
Sangram Thopte : विखे पाटील मला म्हणायचे, संग्राम निर्णय घे, पण मी काँग्रेसमध्येच राहिलो, पण आता नाही, भाजप प्रवेश करताच थोपटे काय-काय म्हणाले?
विखे पाटील मला म्हणायचे, संग्राम निर्णय घे, पण मी काँग्रेसमध्येच राहिलो, पण आता नाही, भाजप प्रवेश करताच थोपटे काय-काय म्हणाले?
Embed widget