एक्स्प्लोर

Vidarbha Rains : आज व उद्या जिल्ह्यात 'ऑरेंज अलर्ट', अतिमुसळधार पावसाची शक्यता

अतिविसर्ग होवून तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येवून पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता.

नागपूर : भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्हयात 8 ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे व 8 ते 9 ऑगस्ट या दोन दिवसाकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून यादिवशी अत्यंत मुसळधार पाऊसाचा इशारा दिलेला आहे. या कालावधीमध्ये पावसासोबतच वादळीवारा व वीज पडण्याची शक्यता देखली भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह-88 टक्के, नवेगाव खैरी-99 टक्के, खिंडशी-96 टक्के, वडगाव- 100 टक्के क्षमतेने भरलेले आहे. 

मध्यम प्रकल्प जसे वेणा, कान्होली बारा, पांढराबोडी, मकरधोकडा, सायकी, चंद्रभागा, मोरधाम, केसरनाला, उमरी, कोलार, खेकडानाला व जाम हे 100 टक्के भरलेले असून या ठिकाणी सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सूरु आहे. तसेच जिल्हयातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प 100 टक्क्यांनी भरलेले असून त्या ठिकाणी देखील सांडव्यावरुन पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरण देखील 85 टक्के भरलेले असून या कालावधीमध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व 10 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आले आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होवून तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येवून पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे.

वीज कोसळ्याने मृत्यू

या वर्षी अगोदर वीज पडल्यामुळे 12 व्यक्तींना तर पूरामध्ये वाहून व नदी आणि नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून 17 व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलेला आहे. सद्यपरिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा ईशारा देयात येत असून नागरिकांनी आवश्यक काळजी घेवून स्वरक्षण करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरु असतांना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व वीजगर्जना होत असतांना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. 

दुथडी भरुन वाहत आहे नदी व नाले

सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बहुतांश नदी व नाले दुथडी भरुन वाहत असून पुलावरुन पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पध्दतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करु नये.या कालावधीत भारतीय हवामान खाते तसेच धरण क्षेत्रातील गावातील नागरिकांनी संबंधित विभागाकडून दिल्या जात असलेल्या सूचना, हवामानाचा अंदाज, चेतावणी, पाण्याचा साठा, पाण्याचा विसर्ग याकडे लक्ष वेधणे आवश्यक आहे. या अनुषंगाने देण्यात येणाऱ्या शासकीय सूचनांचे पालन करण्यात यावे. या कालावधीमध्ये साथीचे रोग पसरत असतात यामुळे आपण आपलं घर व परिसर स्वच्छ ठेवावा.डासांची पैदास होणार नाही याची पूर्ण काळजी घ्यावी. शक्यतोवर घरचे ताजे व शिजलेले अन्न खावे व पाणी स्वच्छ व उकळलिेले प्यावे.

Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर

येथे करा संपर्क

प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे. त्यामुळे स्वत:ची तसेच परिवाराची काळजी घेणे आवश्यक असून कालावधीत सतर्क राहणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील नागरिकांना विनंती आहे की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. अधिका माहितीसाठी नागपूर जिल्हाआपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, नियंत्रण कक्ष 0172-2562668, टोल फ्री क्र. 1077 येथे संपर्क साधता येईल.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMahayuti vs MVA : निवडणुकीआधी वक्तव्यांचा 'जिहाद'? महायुतीची रणनीती काय? Special ReportZero Hour Shinde Fadnavis on Hindu Votes : हिंदू मतांच्या एकत्रीकरणासाठी शिंदे-फडणवीसांच्या भेटीगाठीZero Hour MVA And Mahayuti : महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जागावाटपासाठी खलबतं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Israel Vs Iran : इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
इस्त्रायल-लेबननच्या संघर्षात इराणची एण्ट्री, इस्त्रायलवर केला 200 मिसाईल्सचा भडीमार
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
'ती' घटना अत्यंत दुर्मिळ; कोल्हापुरातील हत्याप्रकरणात हायकोर्टाकडून आरोपीला फाशीची शिक्षा कायम
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल;  आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
बसमधील सुंदरीला आधी छत्री द्यावी लागेल; आव्हाड म्हणाले, आधी भरत गोगावलेंचे पाय धरा
Pitru Paksha 2024 : उद्या सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
सर्वपित्री अमावस्या आणि ग्रहण एकाच दिवशी; पित्र करावे की नाही?
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Video : हक्क मागतोय महाराष्ट्, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचारगीत लाँच; अमित शाहांना मिश्कील टोला
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
पुण्यात 21 एकरवरील ऐतिहासिक शिवसृष्टी; मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्याहस्ते लोकार्पण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
भाजपमध्ये पहिला राजीनामा पडला, माजी मंत्र्‍यानी ठोकला रामराम ; दोन ओळीतच दिलं स्पष्टीकरण
Embed widget