एक्स्प्लोर

Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर

Most Beautiful Mummy : इटलीमधील एका दोन वर्षीय मुलीच्या 'ममी'ला (Mummy) जगातील सर्वात सुंदर ममी असं म्हटलं गेलं आहे. याचं कारण म्हणजे 100 वर्षांनंतरही या मुलीचं शरीर पूर्णपणे सुरक्षित आहे.

World's Most Beautiful Preserved Person : तुम्ही आतापर्यंत ममीबद्दल (Mummy) नक्कीच ऐकलं असेल. कधी चित्रपटांमुळे तर कधी संशोधनामुळे आपल्याला ममीबाबत कानावर येतं. पुरातन काळात मृत व्यक्तीचं शरीर संरक्षित करुन ठेवण्यासाठी त्यावर रायायिनक प्रक्रिया करण्यात यायची यालाच 'ममी' असं म्हटलं जातं. तुम्ही आतापर्यंत अनेक ममीबद्दल ऐकलं असेल, काही ममी शेकडो वर्ष जुन्या असून त्यावर संशोधन सुरु आहे. दरम्यान तुम्ही जगातील सर्वात सुंदर ममीबद्दल ऐकलं आहे का? नसेल तर आम्ही आज तुम्हाल जगातील सर्वात सुंदर ममीबद्दल सांगणार आहोत. ही ममी 100 वर्षांनंतरही पूर्णपणे सुरक्षित आहे. त्यामुळे या ममीला जगातील सर्वात सुंदर ममी असं म्हटलं गेलं आहे.

जगातील सर्वात सुंदर ममी

इटलीमध्ये 100 वर्षांपूर्वी दोन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला, त्यानंतर तिचं शरीर सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबियांनी तिची ममी बनवून घेतली. या मुलीचं नाव रोसालिया लोम्बार्डो (Rosalia Lombardo) असं आहे. रोसालियाचा न्यूमोनियामुळे 02 डिसेंबर 1920 रोजी मृत्यू झाला. पण अद्यापही रोसालियाची ममी पूर्णपणे सुरक्षित स्वरुपात आहे. या ममीला जगातील सर्वात सुंदर ममी नाव देण्यात आलं आहे. रोसालियाची ममी पाहताना असं वाटतंच नाही की, ही ममी आहे. रोसालियाची ममीकडे पाहिल्यास एक लहान मुलगी झोपलेली असल्याचं वाटतं. त्यामुळे या ममीला स्लिपिंग ब्युटी (Sleeping Beauty Mummy) असंही म्हणतात.

Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर

काचेच्या पेटीत संरक्षित आहे रोसालियाचं शरीर

रोसालिया लोम्बार्डो (Rosalia Lombardo) ही ममी सध्या इटलीमध्ये आहे. इटलीमधील उत्तरी सिसिलीच्या (Northern Sicily) पालेर्मोतील (Palermo) कॅपुचिन कैटाकॉम्ब्स (Capuchin Catacombs) येथे ही ममी आहे. कॅपुचिन कैटाकॉम्ब्स (Capuchin Catacombs) येथे सुमारे 8000 इतर ममी संग्रहित करत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये रोसालियाचीही ममी आहे. पण रोसालियाच्या ममी व्यतिरिक्त इतर कोणतीही ममी सुरक्षित अवस्थेत नाही. रोसालियाचं शरीर संरक्षित ठेवण्यासाठी ते एका काचेच्या पेटीत नायट्रोजन गॅस भरून त्यात ठेवलेलं आहे.
Trending News : जगातील सर्वात सुंदर 'ममी', 100 वर्षांनंतरही संरक्षित आहे शरीर

100 वर्षांनंतर फक्त मेंदूच्या आकारात बदल

रोसालियाचं शरीर 100 वर्षानंतरही सुरक्षित आहे. तिची त्वचा आणि केस अद्यापही सुरक्षित आहेत. स्कॅन आणि एक्स-रेमध्ये आढळून आलं की, रोसालियाच्या शरीराची संरचना आणि अवयव 100 वर्षांनंतर व्यवस्थित आहेत. फक्त तिचा मेंदू त्याच्या मूळ आकाराच्या 50 टक्के संकुचित झाला होता.

इतर संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Almatti Dam Special Report : अलमट्टीच्या धोक्याचा खरा अभ्यास कधी होणार?Rajkiya Sholey Special Report : दिल्लीतल्या गदारोळाचे मुंबईत साईड इफेक्टSpecial Report on Delhi Congress protest : संसद भवनाबाहेर राजकारणतला 'दे धक्का'चा अंकSpecial Report Mumbai BJP Protest:कार्यालय,सोनियांच्या पोस्टरवर शाईफेक,भाजप कार्यकर्त्यांकडून दगडफेक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
Shukla vs Marathi Kalyan Rada : 'मराठी माणसं घाण आहात' तिघांना मारलं; कल्याणच्या सोसायटीत राडा
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी Chhagan Bhujbal यांची मुलाखत  EXCLUSIVE
अजित दादांना उपकारांची आठवण करुन देणारी भुजबळांची स्फोटक मुलाखत
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Pravin Swami :नागपूरच्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचे जेवण, ठाकरेंच्या आमदारानं केलं शूट
Dinga Dinga Disease VIDEO : लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
लोकांना नाचायला लावणारा नवा आजार- डिंगा डिंगा, आफ्रिकन देशात थैमान
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Aaditya Thackeray :बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे,आदित्य ठाकरे यांची मागणी
Nanded Suicide : मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
मुख्याध्यापकाने दिवसाढवळ्या शाळेत दारू ढोसली, बदनामीच्या भीतीने रात्री आत्महत्या केली; नांदेडमधील धक्कादायक घटना
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
छगन भुजबळांचं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींसह मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, नेमकी काय केली मागणी? 
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Devendra Fadanvis Vidhan Sabha Speech : लाडक्या बहिणींना पुढील हफ्ता कधी? फडणवीसांनी भाषणात सांगितलं
Embed widget