Indian Science Congress : प्रगतीसाठी पूरक संशोधनामुळे मिळेल देशहिताची संधी ; नवसंशोधकांना संकल्पनांचे 'बूस्टर'
संशोधनात अपयश असे काही नसते, एका उद्देशात अपयशी ठरलेले संशोधन दुसऱ्या क्षेत्रात उपयोगी पडले असल्याची उदाहरणे देत तज्ज्ञांनी नवसंशोधकांना संकल्पनांचे 'बुस्टर डोज' दिले.
Indian Science Congress Nagpur : देशाच्या प्रगतीसाठी पूरक संशोधन केल्यास नवसंशोधकांना देशहितासाठी काम करण्याच्या संधी उपलब्ध होतील, असा निष्कर्ष 'पुनरूत्थानासाठी संशोधन' परिषदेच्या बैठकीत काढण्यात आला. 108 व्या इंडियन सायन्स काँगेस अंतर्गत 'पुनरूत्थानासाठी संशोधन' परिषदेचे आयोजन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ (RTMNU) परिसरातील गुरूनानक भवन येथे आज करण्यात आले होते.
'हेतुपुर्ण व परिणामकारक संशोधन कार्यप्रणाली तसेच भारत केंद्रीत संशोधन', या विषयावर बोलतांना प्रा. बिनीवाले म्हणाले की, संशोधनात यशप्राप्तीसाठी उद्देश ठरवून काम करावे. लक्ष केंद्रित करून आवडीने शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे व आपल्या कामात सातत्य ठेवून हुशारीने त्यांची अंमलात आणावे. प्रा. राजेश बिनीवाले म्हणाले की, संशोधनात अपयश असे काही नसते, एका उद्देशात अपयशी ठरलेले संशोधन दुसऱ्या क्षेत्रात उपयोगी पडले असल्याची उदाहरणे त्यांनी दिले. संशोधकांना मार्गदर्शन करण्यासाठी सुरू करण्यात आलेले 'तपस' या पाच दिवशीय अभ्यासक्रमाची माहिती दिली.
'शाश्वत विकासासाठी भारतीय शिक्षण सुत्रप्रणाली' याविषयावर वाराणसी येथील संपुर्णानंद संस्कृत विश्वविद्यालयाचे आचार्य ज्ञानेंद्र सापकोटा, भारतीय शिक्षण मंडळाचे महासचिव उमाशंकर पचौरी व आय. आय. एम. बोधीगया येथील प्रा. विनीता सहाय यांनी मार्गदर्शन केले. तिसऱ्या सत्रात 'संशोधन आणि विकासासाठी उद्योग आणि धोरणाचा दृष्टीकोन' या विषयावर मर्सिडिज बेंज बंगळूरू येथील संशोधन अधिकारी अंशुमन अवस्थी, निती आयोगाचे माजी सदस्य डॉ. राजीव कुमार, व व्ही.एन.आय.टी.चे संचालक प्रा. प्रमोद पडोले यांनी मार्गदर्शन केले. तर शेवटच्या सत्रात 'संशोधन आणि विकासाच्या अंमलबजावणीसाठी कृती', या विषयावर भारतीय शिक्षा मंडळाचे आयोजन सचिव आचार्य मुकुल कानिटकर यांनी मार्गदर्शन केले. परिषदेस विविध राज्यातील संशोधक तसेच आर.एफ.आर.एफ. चे पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी रिसर्च फॉर रिसर्जन फाऊंडेशनचे (आर.एफ.आर.एफ.) महासंचालक प्रा. राजेश बिनीवाले, भारतीय शिक्षा मंडळाचे महासचिव उमाशंकर पचौरी, आय.आय.टी. खरगपूरचे प्रा. डॉ. मकरंद घांगरेकर उपस्थित होते.
परिसंवादः ‘आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ येथील 108 वी भारतीय विज्ञान काँग्रेस कार्यक्रमात ‘आरोग्यसेवा आणि उद्योगातील नैसर्गिक उत्पादने: शाश्वत विकासातील दृष्टीकोन’, या विषयावर रसायनशास्त्र विभागामध्ये चर्चा करण्यात आली. अध्यक्षस्थानी कुरुक्षेत्र विद्यापीठाचे प्रा. एस. पी. सिंह हे होते. तर तिरुअनंतपुरम केरळ येथील डॉ. कौस्तभ कुमार मैती, प्रा.डॉ. नीरा राघव यांनी सहभाग घेतला. औषध वितरण ही मानव किंवा प्राण्यांमध्ये उपचारात्मक प्रभाव प्राप्त करण्यासाठी फार्मास्युटिकल कंपाऊंडचे व्यवस्थापन करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया आहे. अस स्पष्ट मत त्यांनी या चर्चेत मांडले. रोगाने थेट प्रभावित असलेल्या शरीराच्या विशिष्ट भागात फार्मास्युटिकल उत्पादनाचे व्यवस्थापन करण्यासाठी औषध वितरण नेहमीच डॉक्टरांच्या चिंतेचा विषय आहे. जेणेकरून उपचाराचा प्रभाव जास्तीत जास्त वाढवताना दुष्परिणाम कमी होतील. काही नैसर्गिक पॉलिमरमध्ये असलेल्या रासायनिक भागांच्या मूळ गुणधर्मांचा विचार करून संशोधन गटाने विकसित केलेल्या काही औषध वितरण प्रणालींवर देखील चर्चा करण्यात आली.सूत्रसंचालन शिखा गुप्ता यांनी तर आभार डॉ. पायल ठवरे यांनी मानले.
ही बातमी देखील वाचा...