एक्स्प्लोर

सुनील केदार अपात्रच, ना शिक्षेला स्थगिती, ना आमदारकी बहाल, हायकोर्टाचा झटका!

सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुनील केदार हे अपात्रच राहतील. स्वतः ला मिळालेली शिक्षा स्थगित करून  घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागणार आहे. 

नागपूर :  मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुनील केदार (Sunil Kedar) यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात यावी या मागणीवर कुठलाही दिलासा दिलेला नाही. नागपूरच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Nagpur Bank Scam) घोटाळा प्रकरणी सुनील केदार (Sunil Kedar) यांना हायकोर्टाने झटका दिला आहे. नागपूर खंडपीठाने (Nagpur Bench High Court) सुनील केदार यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे सुनील केदार हे अपात्रच राहतील. स्वतः ला मिळालेली शिक्षा स्थगित करून  घेण्यासाठी आणि त्या आधारे आमदारकी बहाल करून घेण्यासाठी आता सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावावे लागणार आहे. 

22 डिसेंबर रोजी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने केदार यांना विविध गुन्ह्यांतर्गत दोषी ठरवून कमाल पाच वर्षे सश्रम कारावास आणि एकूण 12 लाख 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळल्यावर केदार यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.

सुनील केदार यांना हायकोर्टाने 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र केदार यांनी नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी झालेल्या 5 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. पण हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. 

आमदारकी रद्द 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 150 कोटी रुपयांच्या सरकारी रोखे खरेदी घोटाळा प्रकरणी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार यांना पाच वर्षाची शिक्षा तसेच साडे बारा लाख रुपयांचा दंड ठोटावण्यात आला होता. त्यामुळे विधानसभाध्यक्षांनी राज्यघटनेच्या कलम 191 (1) व लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम 83 (3) अन्वये सुनील केदार यांना आमदार म्हणून अपात्र ठरविले होते. त्यानुसार सुनील केदार यांची आमदारकी रद्द झाली होती. बँक घोटाळा प्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवल्यानंतर आता  शिक्षेला स्थगिती मिळावी अशी याचिका सुनील केदार यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठात केली होती.  

नेमकं प्रकरण काय?

2001-2002 मध्ये नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने होम ट्रेड लिमिटेड, इंद्रमनी मर्चंट्स प्रायव्हेट लिमिटेड, सेंचुरी डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड, सिंडिकेट मॅनेजमेंट सर्विसेस आणि गिलटेज मॅनेजमेंट सर्विसेस या खाजगी कंपन्यांच्या मदतीने बँकेच्या रकमेतून सरकारी रोखे (शेअर्स) खरेदी केले होते. मात्र, पुढे या कंपन्यांकडून कधीच बँकेला खरेदी केलेले रोखे मिळाले नाही, ते बँकेच्या नावाने झाले नव्हते.

धक्कादायक बाब म्हणजे पुढे रोखे खरेदी करणाऱ्या या खाजगी कंपन्या दिवाळखोर झाल्या होत्या. या कंपन्यांनी कधीच बँकेला सरकारी रोखेही दिले नाही आणि बँकेची रक्कमही परत केली नाही असा आरोप आहे.

तेव्हा फौजदारी गुन्ह्याची नोंद होऊन पुढे सीआयडीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्यावर 22 नोव्हेंबर 2002 रोजी सीआयडीने कोर्टात आरोपपत्र दाखल केले होते. हा खटला तेव्हापासून विविध कारणांनी प्रलंबित होता.  

खटल्यात एकूण 11 आरोपींपैकी 9 आरोपींवर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

त्यामध्ये भादंवि च्या 406 (विश्वासघात), 409 (शासकीय नोकर आदीद्वारे विश्वासघात), 468 (बनावट दस्तावेज तयार करणे), 120-ब (कट रचणे) हे दोषारोप निश्चित करून खटला चालविण्यात आला.

या प्रकरणातील आरोपींमध्ये बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सुनील केदार, तत्कालीन महाव्यवस्थापक अशोक चौधरी, तत्कालीन मुख्य हिशेबनिस सुरेश पेशकर, शेयर दलाल केतन सेठ, सुबोध भंडारी, नंदकिशोर त्रिवेदी यांच्यासह अनेक रोखे दलालांचा समावेश आहे.  

VIDEO : सुनील केदार यांना दिलासा नाहीच, शिक्षेला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

 

संबंधित बातम्या 

Sunil Kedar : आधी गुन्हा दाखल केला, आता गाडीही जप्त केली; सुनील केदारांच्या अडचणी थांबता थांबेना    

Sunil Kedar : काँग्रेस नेते सुनील केदार यांची उच्च न्यायालयात धाव; शिक्षेला स्थगिती मिळवण्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न, नेमकं प्रकरण काय?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Fairness Cream Alert : सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड,
सावधान! पाकिस्थान निर्मित गोरी ब्युटी क्रीम ठरतेय किडनीच्या गंभीर विकाराचे कारण; छत्रपती संभाजीनगरनंतर नागपुरात धक्कादायक प्रकार उघड
Nagpur : स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
स्वयंपाकघरातील गॅस गळतीने आग लागली, नंतर स्फोट झाला, नागपुरात एकाचा मृत्यू, 10 जण जखमी
Nagpur : अवैध दारू, बेकायदेशीर शिकार अन् वाटमाऱ्या सोडल्या, अख्खं गावच शेतीकडे झुकलं, पारधी समूदायाच्या शेषनगरची यशोगाथा
अवैध दारू, बेकायदेशीर शिकार अन् वाटमाऱ्या सोडल्या, अख्खं गावच शेतीकडे झुकलं, पारधी समूदायाच्या शेषनगरची यशोगाथा

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati Video Viral : महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
महागडे मोबाईल अन् मुलींवर उडवण्यासाठी पैशांचा हव्यास! आईचे दागिने विकून अयान अहमद पूर्ण करायचा शौक; थार गाडी मालकाचाही मोठा खुलासा
Devendra Fadnavis and Prajakt Tanpure: देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस फोनवर मोजून तीन वाक्य बोलले, प्राजक्त तनपुरेंना एका मिनिटात माघार घ्यायला लावली, नेमकं काय म्हणाले?
Raigad Crime news: माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
माणगावच्या लॉजवर सफाई कर्मचाऱ्याने दरवाजा उघडताच दिसलं भयानक दृश्य, तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
Highest Paid Indian Actors 2026: देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
देशातला सर्वात महागडा स्टार कोण? दोन वर्षांपासून एकही फिल्म नाही, तरीसुद्धा सलमान-शाहरुख-आमिर पेक्षा जास्त फी घेतोय 'हा' सुपरस्टार
Maharashtra Weather Updates मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
मोठी बातमी: पुढील 3 तासांत मुंबईसह ठाणे, पालघर रायगडमध्ये पावसाचा इशारा; मंत्रालयाकडून सतर्कतेचा इशारा
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Maharashtra Live blog updates: भाजप नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल; एबीपी माझाच्या बातमीनंतर पोलिसांची कारवाई
Dhurandhar 2 vs Vaazha 2: ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
ना कोणता बडा हिरो, ना हिरोईन; तरीसुद्धा 'धुरंधर 2'ला पाजलं पाणी, 'या' फिल्मनं बजेटच्या 20 पट केलीय कमाई
Sunetra Pawar and Sharad Pawar: अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
अजितदादांच्या बारामतीत सांगता सभा, देवेंद्र फडणवीस प्रचारसाठी येणार, शरद पवारांचं काय, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
Embed widget