एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नागपूरचे महाराजबाग प्राणीसंग्रहालय बंद होणार !
नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द केली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणून नुकतेच 25 वर्ष पूर्ण करणाऱ्या ह्या प्राणीसंग्रहालयाचे भवितव्य काय? हा मोठा प्रश्न उभा झाला आहे.
नागपूर : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केल्यानंतर आता नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द केली आहे. त्यामुळे देशातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणून नुकतेच 25 वर्ष पूर्ण करणाऱ्या ह्या प्राणीसंग्रहालयाचे भवितव्य काय? हा मोठा प्रश्न उभा झाला आहे.
नागपूरच्या अगदी मध्यभागी स्थित महाराजबाग प्राणीसंग्रहालय हे इतर प्राणी संग्रहालयांपेक्षा वेगळे आहे. कारण या संग्रहालयाची मालकी आहे डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे आहे. केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने ह्या प्राणीसंग्रहालयाचे मान्यता नियम न पाळल्यामुळे आणि व्यवस्थापनातील अनेक त्रुटीमुळे रद्द केली आहे.
मान्यता रद्द करण्याची काही ठळक कारणे
- बालोद्यान वेगळे केलेले नाही
- कचरा व्यवस्थापन,संरक्षक भिंत नाही
- मत्स्यालय अद्यावत नाही
- प्राण्यांच्या नोंदी बरोबर नाहीत
- प्राण्यांचे स्थानांतरण विना परवानगीने
- अनेक महत्वाच्या कामाची पदे रिक्तच
एकीकडे ही सत्य परिस्थिती असली तरीही दुसरीकडे हे देखील महत्वाचे आहे की, 2011 पासून महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने जो विकास आराखडा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवला तो मान्य झाला नाही. त्यानंतर लीट प्लॅन मागवला, मात्र त्याचेही पुढे काही झाले नाही. त्यामुळे विकास आराखडा एवढा रखडवून मग विकास झाला नाही म्हणून मान्यता रद्द करणे हे कोंडीत पकडल्यासारखे आहे ? असा सवाल केला जात आहे.
औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालय बंद होणार !
औरंगाबाद : औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे. प्राण्यांची पुरेशी सुविधा आणि अपुरी जागा असल्यामुळे सिद्धार्थ उद्यानाची परवानगी रद्द करण्यात आली आहे. या प्राणी संग्रहालयात 9 वाघ, 4 बिबट्यांसह हरीण, सांबर, माकड, कोल्हा, मगरी आणि इतर प्राणी आहेत. सोबतच सर्पालय देखील आहे.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणी संग्रहालयाचा परवाना रद्द करण्यात आला आहे. केंद्राने दिलेल्या निकषांचं पालन न केल्याने हा परवाना रद्द केला आहे. याबाबत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडून अनेक वेळ स्मरणपत्र सुद्धा पाठवण्यात आली होती, मात्र महापालिका प्रशासन यांच्याकडून याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. अखेर परवाना रद्द करण्याची तब्बल 47 कारणे देत परवाना रद्द केल्याचे पत्र महापालिकेत धडकले आहे.
सिद्धार्थ प्राणी संग्रहालय महापालिकेच्या अधिपत्याखाली येते. महापालिकेचे असलेले दुर्लक्ष संग्रहालयाचा परवाना रद्द होण्यासाठी कारणीभूत ठरलं आहे. याबाबत महापालिकेला 30 दिवसात म्हणणं मांडण्याची मुभा देण्यात आली आहे. तो पर्यंत प्राणी संग्रहालायला टाळे ठोकण्यात येणार नाही. सिद्धार्थ उद्यान हे शहरातील एक मोठं उद्यान आहे आणि एकमेव प्राणी संग्रहालय आहे.
केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने केलेली ही कारवाई सूडबुद्धीने केली आहे, असा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला आहे. काहीही झाले तरी औरंगाबादेतील हे प्राणी संग्रहालय बंद पडू देणार नाही, असं देखील महापौर म्हणाले आहेत.
सिद्धार्थ उद्यानाची प्राणी संपदा
वाघ- 9
बिबटे - 3
हरीण, काळवीट- 48
सांभार- 47
नील गाय- 3
चितळ- 2
सायळ- 2
कोल्हे- 2
तडस- 1
माकड- 10
वेगवेगळ्या प्रजातीचे 100 साप
विविध पक्षी 19
मगर- 5
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
निवडणूक
आरोग्य
गडचिरोली
Advertisement