एक्स्प्लोर

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण द्या, अन्यथा समान नागरी कायदा लागू करा; मुधोजीराजे भोसले यांची मागणी

Maratha Reservation : एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, असं मुधोजीराजे भोसले म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला.

नागपूर : जालन्यातील अंतरवाली सराटी गावात आंदोलन करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांवर 2 सप्टेंबर रोजी पोलिसांनी लाठीमार केला. या प्रकारामुळे राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे आणि मराठा समाज आरक्षणासाठी एकवटला आहे. याबाबत नागपुरातील संस्थानिक आणि भोसले घराण्याचे विद्यमान वंशज मुधोजीराजे भोसले यांनी वेगळीच मागणी केली आहे. एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा, असं मुधोजीराजे भोसले (Mudhojirao Bhosale) म्हणाले. मराठा आरक्षणाबाबत (Maratha Reservation) त्यांनी एबीपी माझासोबत संवाद साधला.

एकतर मराठ्यांना आरक्षण द्या, नाहीतर समान नागरी कायदा करुन सर्वांना समान पातळीवर आणा. या संदर्भात आपण राज्यातील मराठा संघटनांची चर्चा करुन त्यांची समजूत काढू, सर्वांना समान व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करु, असेही मुधोजीराजे भोसले म्हणाले.

जालन्यातील आंतरवाली सराटी गावात जो प्रकार घडला, तो दुर्दैवी होता. आरक्षणासाठी मराठा समाज पूर्वीपासून एकजूट होऊन काम करत आहे. अचानक मराठा समाजातील आंदोलकांवरील लाठीमार नींदनीय आहे, असं मुधोजीराजे म्हणाले.  

'राजकीय आरक्षण नकोच, शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागतोय'

मराठ्यांची आरक्षणाची मागणी प्रामुख्याने पुढच्या पिढीसाठी आहे. राजघराणे, उद्योजक यांना आरक्षण नकोय पण समाजातील इतरांना नोकरी आणि शिक्षणासाठी आरक्षण हवं आहे. आम्हाला राजकीय आरक्षण नकोच, आम्ही शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण मागत आहोत. जर सरकारला ते द्यायचे नसेल तर सरकारने समान नागरी कायदा करावा आणि सर्वांना समान पातळीवर आणावं. एकदा समान नागरी कायदा लागू झाला तर प्रत्येकाला आपापल्या क्षमतेप्रमाणे शिक्षण आणि नोकरी मिळू द्यावी असे मुधोजीराजे भोसले म्हणाले.

मुधोजीराजे भोसलेंची मागणी मराठा संघटना मान्य करणार?

शिक्षण आणि नोकरी या दोनच मुद्द्यांसाठी आम्ही लढतोय. आम्हाला जमीन द्या किंवा राजकारणात आरक्षण द्या अशी मागणी कोणताही मराठा बांधव करत नाही. मराठ्यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी आणखी किती वर्ष संघर्ष करायचे. त्यामुळे एक तर शिक्षण आणि नोकरीसाठी आरक्षण द्यावं, नाही तर समान नागरी कायदा लागू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान मुधोजीराजे भोसले यांची ही मागणी इतर मराठा संघटनांना मान्य होते की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.

VIDEO : Mudhojiraje Bhosale : मराठ्यांना आरक्षण द्या अन्यथा समान नागरी कायदा लागू करा

हेही वाचा

"...तोपर्यंत आरक्षण कायम राहावं"; RSS प्रमुख मोहन भागवतांचं मोठं वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli : देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
देर लगी आने में तुमको, शुक्रर हैं फिर भी आये तोह, किंग कोहली तब्बल 13 वर्षांनी रणजीत दिसणार, दिल्लीकडून जंगी तयारी, 10 हजार जणांना एन्ट्री ते...!
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
2300 विद्यार्थ्यांनी साकारले देशातील सर्वात मोठे '26 जानेवारी'; 41,800 स्क्वेअर फूटचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Embed widget