Nagpur News : धक्कादायक! लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई
Nagpur News : नागपूरात खाद्यतेलात भेसळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर अन्न व औषध प्रशासन विभागाने भेसळीच्या संयशावरून 3, 445 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे.
![Nagpur News : धक्कादायक! लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई nagpur news a major action by the food and drug department seized adulterated edible oil worth lakhs maharashtra marathi news Nagpur News : धक्कादायक! लाखोंचे भेसळयुक्त खाद्यतेल जप्त; अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/03/14/c38d35cd04c22187c7def918a6d82f841710423983051892_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News नागपूर : नागपूरात खाद्यतेलात भेसळ केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) विभागाने भेसळीच्या संयशावरून 4,23,190 रुपये किमतीचे 3, 445 किलो खाद्यतेल जप्त करण्यात आले आहे. भेसळयुक्त खाद्यतेल विक्रीविरुद्ध अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम राबवत ही कारवाई केली आहे. या प्रकरणी पूर्व नागपुरातील (Nagpur News)लकडगंज परिसरातील दोन प्रतिष्ठानांवर अचानक धाडी टाकून सखोल तपासणी केली असता, या ठिकाणी उपलब्ध असलेल्या 'रिफाइंड सोयाबीन तेल' आणि 'रिफाइंड पामोलीन तेल' या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित साठा भेसळीच्या संशयावरून जप्त केला आहे. या तेलाचे नमुने घेऊन विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठविले असून पुढील कारवाई करण्यात आली आहे.
3, 445 किलो भेसळयुक्त तेल जप्त
नागपुरातील लकडगंज परिसरात काही प्रतिष्ठानांवर खाद्यतेलात भेसळ केली जात असल्याची गुप्त माहिती नागपूर अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली. या माहितीच्या आधारे 12 आणि 13 मार्च रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने याठिकाणी अचानक धाड टाकून पाहणी केली असता घटनास्थळी खाद्यतेल रिपॅकिंग करीत असतांना भेसळ केली जात असल्याचे संशय या पथकाल आला. त्यानंतर या अन्नपदार्थाचे नमुने घेऊन उर्वरित साठा भेसळीच्या संशयावरून जप्त करण्यात आला आहे. या साठ्याची एकूण किंमत 4,23,190 रुपये असून वजन 3, 445 किलो इतके आहे. या प्रकरणाच्या तपासणी अहवालअंती पुढील कारवाई करण्यात येणार असली तरी, तपासणी अहवालाच्या अनुषंगाने एका प्रतिष्ठानाला अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 आणि त्याअंतर्गत नियम व नियमन मधील कलम-32 अन्वये सुधारणा नोटीस पाठविण्यात आली आहे. या सोबतच एका आस्थापनेस विनापरवाना व्यवसाय करीत असल्यामुळे, अन्न सुरक्षा व मानदे कायदा-2006 अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
442 किलो चीज आणि पनीरसदृश पदार्थ जप्त
नुकतेच मध्यप्रदेशातून नागपूर बस स्थानकावर आलेल्या एका बसमधून तब्बल 442 किलोग्राम चीज अनालॉग हा चीज आणि पनीर सदृश्य पदार्थ जप्त करण्यात आला होता. नागपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने (Food and Drug Administration) ही कारवाई करण्यात आली असून यात 92 हजार रुपये किमतीचा चीज अनालॉग जप्त करण्यात आले होते. प्राप्त माहिती नुसरा, ही खेप गणेशपेठ बसस्थानकावर पोहचल्यानंतर हिंगणा येथील एका वितरकासह इतर दोन ठिकाणी पोहचवली जाणार होती. मात्र त्यापूर्वीच गुप्त माहितीच्या आधारे एफडीएच्या (FDA) वतीने ही कारवाई करून हे चीज अॅनालॉग जप्त करण्यात आले होते. त्यामुळे सतत घडत असलेल्या आशा भेसळीच्या घटना समोर येत असल्याने नागपूर अन्न व औषध प्रशासन विभाग सतर्क राहून अश्या छुप्या कारवायांवर लक्ष ठेवून आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)