Mumbai News: मुंबईच्या झोपडपट्टीतील दुकानदारांना पालिकेचा झटका, गाळेधारकांना कर भरावा लागणार, पालिकेच्या बजेटमध्ये घोषणा
Mumbai News: मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. या अर्थसंकल्पात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.

मुंबई: देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प मंगळवारी मांडण्यात आला. यावेळी एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यानुसार आता मुंबईतील झोडपट्ट्यांमध्ये असणाऱ्या गाळेधारकांना कर भरावा लागणार आहे. झोपडपट्टीतील व्यावसायिक गाळेधारकांना लावण्यात येणाऱ्या या कराच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेला सुमारे 350 कोटी इतका महसूल अपेक्षित आहे. या व्यवसायिक गाळेधारकांना कर निर्धारण करून त्यांच्याकडून मुंबई महापालिका मालमत्ता कर वसूल करणार आहे. मुंबई महापालिकेच्या क्षेत्रात अडीच लाख झोपडपट्ट्या आहेत. त्यातील 20 टक्के झोपडपट्ट्यांमध्ये गाळ्यांचा वापर उद्योगधंदे, दुकाने, गोदाम आणि हॉटेल्स अशा व्यावसायिक कारणांसाठी केला जातो. या सगळ्या गाळेधारकांना आता कर भरावा लागणार आहे.
मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त आयुक्त भूषण गगराणी यांनी सादर केला. 2024-25 च्या बजेटमध्ये ६५हजार१८० कोटी तरतुदी करण्यात आली होती. यामध्ये यंदा 14.19 टक्क्यांची वाढ होऊन सन २०२५-२६या आर्थिक वर्षासाठी 74 हजार 427 कोटी रुपयांचा बजेट मांडण्यात आला. यंदाच्या अर्थसंकल्पात मालमत्ता करात वाढ होणार का, याकडे सगळ्यांच्या नजरा होत्या. मात्र, आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय लांबणीवर पडला आहे. तसेच यंदाच्या वर्षीपासून मुंबईत कचरा शुल्क आकारले जाईल, अशी चर्चा होती. मात्र, या निर्णयाचा सारासार विचार करुन त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असे पालिका आयुक्तांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या बजेटमधील महत्त्वाच्या घोषणा
* रस्ते व वाहतूक खात्याकरिता 2025- 26 या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात 5100 कोटी रुपयांची इतकी तरतूद
* कचरा संकलन कर संदर्भात अद्याप निर्णय नाही कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय घेणार
* दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये ४३०० कोटी इतकी तरतूद
* गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता 1958 कोटी रुपयांची इतकी तरतूद
* दहिसर ते भाईंदर पर्यंतच्या कोस्टल रोड प्रकल्प करिता 2025 26 चा अर्थसंकल्पीय अंदाज मध्ये ४३०० कोटी इतकी तरतूद
* गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाकरिता १९५८ कोटी इतकी तरतूद
* मुंबई महापालिका शिक्षण खात्याचा यंदाच्या वर्षीच बजेट 3955 कोटी रुपये तरतूद
* मिशन व्हिजन 27, मिशन संपूर्ण हे दोन मिशन मुंबई महापालिकेच्या शिक्षण खात्याकडून राबवले जाणार
महापालिकेचे आयुक्त काय म्हणाले?
मुंबई महापालिकेकडून सादर करण्यात आलेल्या मुंबईकरांच्या अपेक्षा या अर्थसंकल्पतून प्रतिबिंबित झाल्या आहेत, असे मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भुषण गगराणी म्हणाले. 2025-26 चा अर्थसंकल्प 74,427 कोटींचा आहे हा मुंबई महापालिकेच्या इतिहासातला आतापर्यंत मोठी अर्थसंकल्पतील वाढ आहे. मुंबई महापालिकेच्या महसूलात 7410 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. आम्हाला व्याजाचा परतावा अर्धा टक्का जास्त मिळत आहे. मालमत्ता करात कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही.
महसूली उत्पन्न वाढविण्यासाठी विविध योजना प्रस्तावित केल्या आहेत. प्रीमियम FSI ची विभागणी चार संस्थांमध्ये केली जाते. धारावी प्राधिकरण 25 %, महापालिका 25 टक्के, एम एस आर डी सी 25% आणि राज्य सरकार 25 टक्के अशाप्रकारे ही विभागणी करण्यात आली आहे. आता धारावी प्राधिकरणाला 25 टक्क्यांची गरज नाही कारण ते स्वतंत्र झाले आहेत. हा FSI मुंबई महापालिकेकडे वर्ग होईल, 300 कोटी रुपये अतिरिक्त महसूल मिळेल, असे भुषण गगराणी यांनी सांगितले.
आणखी वाचा
मुंबई महापालिकेचा 74 हजार कोटींचा अर्थसंकल्प सादर,अर्थसंकल्पात भरभक्कम वाढ...























