एक्स्प्लोर

Nagpur : नागपूरमध्ये नाईट पार्टीवर धाड, मोठा दारुसाठा जप्त

एका खासगी फार्महाऊसवर सुरू असलेल्या पार्टीमध्ये शेकडो तरुण-तरुणी दारूच्या नशेत नाचत होते.

नागपूर: रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या तरुणांच्या ट्रॉपिकल अफेयर नावाच्या पार्टीवर धाड टाकून नागपूर पोलिसांनी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. नागपूर वर्धा रोडवर जामठा क्रिकेट स्टेडियमच्या जवळ एका खासगी फार्महाउसवर सुरु असलेल्या या पार्टीत मोठ्या प्रमाणात तरुण तरुणी सहभागी झाले होते. 

रविवारी मध्यरात्री पोलीस या फार्महाऊसवर पोहोचले तेव्हा डीजेच्या तालावर शेकडो तरुण-तरुणी दारूच्या नशेत झिंगत नाचत होते. दारूसह या पार्टीत ड्रग्सचा वापर सुरु होता का याचाही तपास आता पोलीस करीत आहेत. 

नागपूर वर्धा रोडवर हिंगणा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जामठा क्रिकेट स्टेडियमच्या जवळ एका खाजगी फार्महाउसवर मध्यरात्रीनंतर एक पार्टी सुरु असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती. बक्कळ एंट्री फी वसूल करून काहींनी तरुणाईसाठी ट्रॉपिकल अफेयर नावाने ही पार्टी आयोजित करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या पार्टीसाठी संध्याकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंतची परवानगी घेण्यात आली होती. मात्र तरीही मध्यरात्रीपर्यंत ही पार्टी सुरु असल्याने झोन 3 चे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मध्यरात्रीनंतर फार्महाऊसवर धाड टाकली.

यावेळी शेकडो तरुण तरुणी दारूच्या नशेत डीजेच्या तलवार नाचताना दिसून आले. अनेकांना त्यांच्या कपड्यांचं भान देखील राहिलं नव्हतं. काही जण तर अर्धनग्न अवस्थेत या पार्टीत सहभागी झाले होते. अचानक पोलिसांनी टाकलेल्या धाडीमुळे सर्वजणच थबकले. आयोजकांकडे रात्री दहा पर्यंतची पोलीस परवानगी असताना उशिरापर्यंत पार्टी सुरु ठेवण्यात आली होती. तर डीजेसाठी फक्त परवानगी मागण्यासाठी दिलेला अर्ज देण्यात आला होता. मात्र त्यासाठी परवानगी मिळालेली नव्हती. 

विशेष म्हणजे एक मोठी एक्सयूव्ही भरून मद्यसाठा पोलिसांच्या हाती लागला असून या पार्टीत काहींनी ड्रग्सचा वापर केला होता का याचाही तपास पोलीस करीत असल्याची माहिती नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. पोलीस स्टेशन हद्दीत सुरु असलेल्या या पार्टीची स्थानिक पोलिसांना कशी काय माहिती नव्हती या कारणास्तव हिंगणा पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Helicopter Crash : Sunil Tatkare यांना घेण्यासाठी निघालेलं हेलिकॉप्टर पुण्यात कोसळलंPune Helicopter Crash Updates:पुण्यात हेलिकॉप्टर कोसळल्याची महिन्याभरातली दुसरी घटना,तिघांचा मृत्यूPune Helicopter Crash Breaking : पुण्यातील बावधन परिसरात धुक्यामुळे डोंगराळ भागात हेलिकॉप्टरचा अपघातABP Majha Headlines 8  AM : सकाळच्या 8 हेडलाईन्स : एबीपी माझा हेडलाईन्स : 2 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Helicopter Crash: खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
खासदार तटकरेंना घेण्यासाठी गेलेलं हेलिकॉप्टर कोसळलं; Photo पाहून अंगावर येईल काटा
Chhatrapati SambhajiNagar: सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
सहा महिन्यांच्या बाळाला घेऊन गोदावरी नदीत उडी मारली, आईचा मृतदेह मिळाला पण बाळ....
अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार
सोयाबीन उत्पादक साडे 7 लाख शेतकऱ्यांना दिलासा, 350 कोटी रुपये पीक विमा अग्रीम म्हणून मिळणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
मोठी बातमी! 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार, सणासुदीच्या काळात बळीराजाला भेट 
Pune Helicopter Crash: सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
सुनील तटकरेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टरने उड्डाण केलं, मुंबईला पोहोचण्यापूर्वीच दरीत कोसळलं
Jaggi Vasudev: स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
स्वत:च्या मुलीचं लग्न लावलंत इतर मुलींना संन्यासी रहायला कसे सांगताय? उच्च न्यायालयाचे सद्गुरुंवर ताशेरे
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
बारावी पास असल्यास 6 हजार, पदवीधरांना 10 हजार! काय आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना?
Pune Helicopter Crash: धुक्यामुळे बावधन बुद्रुक परिसरातील डोंगरात हेलिकॉप्टर कोसळलं, तिघांचा मृत्यू
पुण्यातील बावधन बुद्रुकमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, धुक्यामुळे घात झाला, तिघांचा मृत्यू
Embed widget