एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणारे हात वंचित, अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतिक्षेत

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारनं जुलै 2024 मध्ये आणली होती. या योजनेद्वारे महिलांना सहावा हप्ता दिला जात आहे. दुसरीकडे योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचा सरकारला विसर पडलाय.

नागपूर :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीचं सरकार पुन्हा येण्यास महत्त्वाची ठरली.  राज्य सरकारकडून महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता महिलांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या खात्यात 9000 हजार रुपये पोहोचले आहेत. मात्र, ही योजना यशस्वी करुन दाखवणाऱ्या अंगणवाडी सेविकांना दिलेला शब्द  पूर्ण करण्यास शासन विसरल्याचं चित्र आहे. अंगणवाडी सेविकांना एका फॉर्मला 50 रुपये देण्यात येतील, असं सांगण्यात आलं होतं. मात्र, अद्याप अंगणवाडी सेविकांना त्यांनी भरलेल्या अर्जांची रक्कम मिळालेली नाही. आम्ही पण तुमच्या लाडक्या बहिणी आहोत, आम्हाला आम्ही केलेल्या कष्टाचा मोबदला मिळाला पाहिजे, असं अंगणवाडी सेविकांनी म्हटलं.  

राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून योजनेचा सहावा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, या योजनेचे फॉर्म भरून देणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून वंचित आहेत.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे.  योजना सुरू झाली तेव्हापासून हा लाभार्थी महिलांना मिळणारा सहावा हप्ता आहे. मात्र लाडक्या बहिणींचे 2 कोटी 34 लाख फॉर्म भरून देणाऱ्या आणि अगदी कमी वेळेत योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविका प्रती फॉर्म मागे सरकार कडून मिळणाऱ्या पन्नास रुपयांपासून अद्यापही वंचित आहेत. 

जून महिन्यात योजना लाँच झाल्यानंतर सरकारकडून अंगणवाडी सेविकांना महिलांचा एक फॉर्म भरून देण्यामागे पन्नास रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. अंगणवाडी सेविकांनी दिवस-रात्र काम करून शेकडो महिलांचे फॉर्म भरून दाखवले, त्यामुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या तब्बल 2 कोटी 34 लाख एवढी प्रचंड झाली आहे. 

योजना यशस्वी होऊन राज्यात महायुतीचा सरकार पुन्हा सत्तेतही आलं. मात्र अंगणवाडी सेविकांना प्रत्येक फॉर्म मागे पन्नास रुपये अद्यापही मिळालेले नाही.  नवीन वर्षात तरी सरकार आमची आठवण ठेवेल, अशी अपेक्षा आता अंगणवाडी सेविकांनी व्यक्त केली आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरुन देणाऱ्या अंगणवाडी सेविकांकडून त्यांनी नेमके किती फॉर्म भरुन घेतले याबाबतची आकडेवारी जमा करुन घेताना देखील ती पूर्णपणे घेतली नसल्याची तक्रार आहे. काही अंगणवाडी सेविकांनी जितके अर्ज भरले त्यापेक्षा कमी अर्जांची संख्या वरिष्ठांकडून नोंदवून घेतली गेल्याचंही समोर आलं आहे. आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वी करणाऱ्या अंगणवाडी सेविकांचं लक्ष शासनाच्या निर्णयाकडे लागलं आहे.   

इतर बातम्या : 

Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग, 1500 की 2100 रुपये मिळणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kho Kho World cup| खो-खोने आम्हाला नॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचवलं, कर्णधार प्रतीक वायकरची प्रतिक्रियाSaif Case Recreate Seen : सीन रिक्रिएशनसाठी आरोपी शेहजाद सैफच्या घरी, क्राईम ब्रँच घटनास्थळीABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 21 January  2025Akshay Shinde Case | अक्षय शिंदेचा फेक , पोलिसांचा दावा संशयास्पद ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Donald Trump : अध्यक्ष होताच डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, गुन्हा दाखल, एलन मस्क देखील संकटात
डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्ष होताच पहिला धक्का, गुन्हा दाखल; एलन मस्क देखील संकटात
Kolhapur Guardian Minister : मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील लोकांच्या मनातील मीच पालकमंत्री, तिकडं क्षीरसागरांची सुद्धा खदखद काही केल्या थांबेना!
Nashik Guardian Minister : नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
नाशिकचं पालकमंत्रिपद गिरीश महाजनांकडेच राहणार, भाजपच्या गोटातून मोठी माहिती समोर
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच दिवशीच्या 10 निर्णयांनी अमेरिका सोडाच, पण अवघ्या जगाला धडकी भरली!
Beed News: बीड जिल्ह्यात मोठी घडामोड, 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका; सदस्यत्त्व रद्द केले
मोठी बातमी: बीड जिल्ह्यातील 13 सरपंच आणि 418 ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा झटका
Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर
Haribhau Bagde : विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
विखे पाटलांनी कोल्हे वस्तीवर येणं टाळलं! राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले, दूध आणि साखर एकत्र....
Eknath Shinde: फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
फडणवीसांच्या 'त्या' दोन निर्णयांमुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ? 20 आमदार फुटण्याच्या चर्चेने आगीत आणखी तेल ओतलं
Embed widget