एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : गुड न्यूज, लाडक्या बहिणींना आजपासून पैसे मिळण्यास सुरुवात, डिसेंबरच्या हप्त्यासाठी 3500 कोटी वर्ग, 1500 की 2100 रुपये मिळणार?

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता या वर्षीच मिळणार आहे.

मुंबई :  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे विधानसभेत अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार या वर्षीच लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे. हप्ता देण्याची प्रक्रिया आजपासून सुरु करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींना 1500 रुपयांप्रमाणं सहावा हप्ता मिळणार आहे. 

डिसेंबरच्या हप्त्यासाठी  3500 कोटी रुपयांची तरतूद

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पाच हप्त्यांची रक्कम पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात वर्ग करण्यात आली होती. जुलै ते नोव्हेंबर पर्यंत 1500 रुपयांप्रमाणं  7500 रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले होते. निवडणुकीपूर्वीच महिलांच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याची रक्कम आली होती. आता डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून महिलांच्या खात्यात येणार आहे.  

लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता या महिना अखेर मिळणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधानसभेतील घोषणेप्रमाणं अधिवेशन संपल्यानंतर 1500 रुपयांची रक्कम मिळणार आहे. डिसेंबरचा हप्ता लाडक्या  बहिणींना देण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. एका महिन्याचा हप्ता देण्यासाठी लागणारी रक्कम लाडक्या बहिणींना वर्ग करण्यात आला आहे. 

किती महिलांना मिळणार लाभ?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता दोन टप्प्यात दिला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात 2 कोटी 35 लाख महिलांना पंधराशे रुपये प्रमाणे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी अखेरच्या टप्प्यात महिला व बाल कल्याण विभागाकडे 25 लाख महिलांचे अर्ज आले होते. त्या अर्जांची स्क्रुटिनी राहिली असल्यानं ती  पूर्ण करुन या महिलांना देखील डिसेंबरचा हप्ता दुसऱ्या टप्प्यात दिला जाईल.   

लाडक्या बहिणींना 2100 रुपयांसाठी वाट पाहावी लागणार

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केल्यानंतर महायुतीनं मोठी घोषणा केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात महायुतीकडून लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयांवरुन 2100 रुपये करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार 2100 रुपये कधीपासून मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र, डिसेंबरचा हप्ता 1500 रुपयांप्रमाणं मिळणार आहे. दुसरीकडे, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर अर्थसंकल्पात याबाबत निर्णय घेतला जाईल, असं म्हटलं होतं. त्यानुसार अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरचं महिलांना 2100 रुपयांचा हप्ता मिळू शकेल, अशी स्थिती आहे.

इतर बातम्या :

लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची खरंच छाननी होणार का? आदिती तटकरे यांनी संभ्रम संपवला, थेट सांगून टाकलं!

महत्त्वाच्या बातम्या

LPG Gas subsidy Ujjwala Scheme: घरगुती एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
एलपीजी गॅसबाबत केंद्र सरकारचा महत्त्वाचा निर्णय, उज्ज्वला योजनेतील अनुदानित सिलेंडरची संख्या 9 वरुन 4 पर्यंत घटवली
JSW Energy : जेएसडब्ल्यू एनर्जीचा मोठा धमाका! गुजरातमध्ये पवन ब्लेड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन; 30 गिगावॉट क्षमतेचे उद्दिष्ट
जेएसडब्ल्यू एनर्जीचा मोठा धमाका! गुजरातमध्ये पवन ब्लेड निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन; 30 गिगावॉट क्षमतेचे उद्दिष्ट
Equitas Bank : 100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
100 रुपयांपेक्षा स्वस्त असलेल्या 'या' बँकेच्या शेअरमध्ये 'कप आणि हँडल' ब्रेकआउट; 52 आठवड्यांचा नवा उच्चांक!
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण

व्हिडीओ

Nashik Vidhan Parishad Politics : एकाचं फत्ते काम, दुसऱ्याने फोडला घाम Special Report
Chhagan Bhujbal Upsate On NCP : राज्यसभेची उमेदवारी नाही, भुजबळ नाराज Special Report
Shetkari KarjMafi : शेतकरी कर्जमाफीच्या अटी, मित्रांच्या कपाळावर आठी | Special Report
Eknath Shinde CM : एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्रिपदाचे वेध लागले आहेत का? | Special Report
India Alliance Meeting : 4 राज्यात बिघाडी, आता आठवली इंडिया आघाडी | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Badlapur MNS Leader Accident : भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
भरधाव कारनं मनसे पदाधिकाऱ्याला उडवलं अन् पळाला; राजेश शेटे गंभीर जखमी, आयसीयूमध्ये उपचार सुरू, नेमकं काय घडलं?
Virar Crime News: डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
डोंगराकडे मोबाईल झूम केला अन् तरुणाचे पायच थरथरले; जंगलात झाडाला...; विरारच्या कुलस्वाई माता मंदिर परिसरातील धक्कादायक घटना
Ashok Kharat Nashik Crime Case: अशोक खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
खरातच्या केबिनमधील व्हिडीओला श्रीलंका, नायजेरिया, फिलिपाईन्समधून मागणी, एका क्लीपचा रेट किती?, पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड
Maharashtra Rain Updates: महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
महाराष्ट्रात आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज; मुंबई, पुणे आणि नाशिक 25 जिल्ह्यांना यलो अलर्ट
Lalbaug cha Raja 2026 Muhurat Pujan: चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
चाफ्याच्या फुलांवर अवतरलं लालबागच्या राजाचं पाऊल, मुहूर्त पूजन झालं, पाहा Exclusive फोटो
Anshuman Vichare On Maharashtrachi Hasyajatra Show: 'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
'माझी एक्सपायरी डेट जवळ आलीय...'; प्रसिद्ध अभिनेत्यानं सांगितलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' सोडण्याचं खरं कारण
TMC Crisis : भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
भाजपच्या तिकिटावर खासदार होऊन दाखवा, बघुया तुम्ही किती हिरो आहात; महुआ मोईत्रांचं फुटीरांना आव्हान, युसूफ पठाणची लाज काढली
LPG Price Hike : मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
मोठी बातमी! घरगुती गॅस सिलेंडर आणखी महाग होणार; केंद्र सरकारनं सांगितलं त्यामागचं मोठं कारण
Embed widget