एक्स्प्लोर

Mahayuti Seat Shearin Dispute : 'साहेबांवर दबाव होता, त्यामुळे मागे हटलो'; शिंदेसेनेच्या नेत्याने मुख्यमंत्री शिंदेंसमोरच भाजपवर सोडले बाण

Mahayuti : सर्व काही घडत असतांना मी हे सर्व पाहत होतो. साहेब माझ्यासाठी शेवटपर्यंत लढत होते. मात्र, त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे मी मागे हटलो, असे शिंदेसेनेचे खासदार कृपाल तुमाने म्हणाले.

नागपूर : गेली अनेक वर्षे निवडणूक लढवणारे मतदारसंघ शिंदेसेनेकडून महायुतीच्या जागावाटपात (Mahayuti Seat Shearing)  मित्रपक्षांच्या ताब्यात गेले आहेत. त्यामुळे शिंदेसेनेत मोठी नाराजी आहे. विशेष म्हणजे आपली नाराजी नेतेमंडळी आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यासमोर थेटपणे मांडत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, रामटेकचे लोकसभा मतदारसंघातून (Ramtek Lok Sabha Constituency) तिकीट कटल्याने दुखावलेले शिंदेसेनेचे खासदार कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी देखील मुख्यमंत्र्यांसमोर आपलं दुःख मांडत थेट भाजपवर (BJP) बाण सोडले आहेत. रविवारी देशपांडे सभागृहात आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते. 

दरम्यान यावेळी आपल्या भाषणात बोलतांना कृपाल तुमाने म्हणाले की, "मागील लोकसभा निवडणूक (Lok Sabha Election) आपण याच पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भरवशावर जिंकली होती. मात्र, तुमच्याकडे लोकं नाहीत, संघटना नाही असे यावेळी काही लोकांनी साहेबांना सांगितले. तसेच तुमाने हे घरातच बसले असल्याचे देखील मुख्यमंत्री शिंदे यांना सांगण्यात आले. पण, काँग्रेसचे केंद्रीय नेते असलेल्या मुकुल वासनिक यांचा पराभव करून मी निवडून आलो होतो. यावेळी तर स्पर्धाच नव्हती. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत मी एक लाखावर मतांनी निवडून आलो असतो,” असे म्हणत कृपाल तुमाने यांनी भाजपवर निशाणा साधला. 

साहेबांवर दबाव होता...

दरम्यान, सर्व काही घडत असतांना मी हे सर्व पाहत होतो. साहेब माझ्यासाठी शेवटपर्यंत लढत होते. मात्र, त्यांच्यावर दबाव होता, त्यामुळे मी मागे हटलो. पक्षासाठी काम करा असे साहेब म्हणाले. मनात दुःख होते; पण मी शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहीन, असा शब्द साहेबांना दिला, असे म्हणत तुमाने यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली. 

आमच्यासोबत राहून लोकं मोठे होतात, नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात

शिवसेनेच्या मेळाव्यात तुमाने दाखल होताच्या त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोर भाषण देण्यासाठी तुमाने उठताच सभागृहात पुन्हा घोषणा सुरु झाल्या. विशेष म्हणजे आपल्या भाषणातून तुमाने यांनी देखील भाजपवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत आपलं मन मोकळ केलं, “लोक आमच्या सोबत राहतात. मजबूत होतात व नंतर आमच्याच लोकांना घेऊन पळतात. त्यामुळे आमचा पक्ष डाऊन होतो. साहेबांच्या मनात काय होते, हे मला माहीत आहे, असे म्हणत तुमाने यांनी एकामागून एक बाण भाजपवर सोडल्याचे पाहायला मिळाले. 

शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये नाराजी...

कुठे भाजपच्या सर्वेचा संदर्भ, तर कुठे स्थानिक भाजप नेत्यांचा विरोध पाहता शिंदेसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले आहे. तर, काही ठिकाणी शिवसेनेच्या नेहमीच्या जागा मित्रपक्षांकडे गेल्या आहेत. त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेत मोठी नाराजी असल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी मुख्यमंत्री यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या शिवसेनेच्या बैठकीत अनेक नेत्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच, आपण उठाव केल्यानेच भाजप पक्षाला सत्तेत बसला आहे. पण आता त्यांच्या दबावाला किती बळी पडायचं? असा सवाल देखील काही नेत्यांनी उपस्थित केल्याची माहिती मिळत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या : 

CM Eknath Shinde : घरात बसून उंटावरून शेळ्या हाकणे आम्हाला जमत नाही; आदित्य ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

About the author मोसीन शेख

मोसीन शेख
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना

व्हिडीओ

Election Update : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय
Thackeray Sena Vs BJP Rada : ठाकरेंची शिवसेना, भाजपमध्ये कामगार युनियनवरुन राडा
PM Narendra Modi : भारत आणि रशियात विन-विन संबंध बनले, उर्जा सुरक्षा ही दोन्ही देश संबंधात मोठी बाब
Vladimir Putin : उर्जा क्षेत्रात विना अडथळा भारताला पुरवठा करत राहणार, पुतीन यांचं महत्वाचं विधान
Amol Kolhe Lok Sabha : अमोल कोल्हे यांच्या प्रश्नाला केंद्रीय जलशक्ती मंत्र्‍यांचं मराठीतून उत्तर

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
हा सागरी किनारा... नॅशनल क्रश पुन्हा चर्चेत, निळाभोर समुद्र, मंद वारा अन् गिरीजाचा लाजरा नं साजरा मुखडा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 05 डिसेंबर 2025 | शुक्रवार
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
जामखेडमध्ये नर्तिकेनं लॉजवरच संपवलं जीवन, रोहित पवारांचं ट्विट, तो व्यक्ती कोण, कोणत्या पक्षाशी निगडीत?
Kolhapur Crime News: 'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
'रस्ता तुझ्या बापाचा आहे का?', एसटी चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण, वाहकालाही धक्काबुक्की; कोल्हापुरातील धक्कादायक घटना
Indigo Crisis : इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार? A टू Z जाणून घ्या
इंडिगोच्या एका चुकीमुळं फ्लाईट धडाधड रद्द, देशभर एवढा गदारोळ कशामुळं झाला? DGCA च्या निर्णयामुळं दिलासा मिळणार?
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले मराठी माणूस लवकरच पंतप्रधान होणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
बाप रे... पुण्यातून मुंबईला जाणे लंडन, थायलंडपेक्षाही महाग; विमान प्रवासाचे दर गगनाला भिडले, 61 हजार
Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!
Embed widget