एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणूक ; उद्या चार वाजता संपणार प्रचार ; ... तर तुमची मतपत्रिका अवैध ठरु शकते

मतदाराची ओळख पटू शकेल अशी कोणतीही खूण आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने आकडा घातलेला असेल तर अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

Teachers Constituency Elections Nagpur : येत्या 30 जानेवारीला विधानपरिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक होत आहे. उद्या, शनिवारी (28 तारखेला) मतदानाच्या 48 तास आधी प्रचार संपणार आहे. 

जिल्हानिहाय मतदानाची वेळ...

नागपूर विभागातील 5 जिल्ह्यात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया व भंडारामध्ये 48 तास अधी प्रचार संपणार आहे. या पाच जिल्ह्यात मतदानाची वेळ 30 जानेवारीला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात  30 जानेवारीला सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत मतदान आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात 3 वाजता प्रचार संपणार आहे.  मतदारांनी मतदान कसे करावे, याबाबतची मतदानाची पध्दती कशी असावी, याबाबत निवडणूक विभागाने सूचना केल्या आहेत.

एकाच उमेदवारांच्या नावासमोर 1 हा आकडा एकदाच टाकावा

एकापेक्षा अधिक उमेदवारांची निवड करायची असली तरी देखील 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर घालावा लागेल. निवडणूकीतील उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार निवडणूक लढवत असतील तेवढे पसंतीक्रम तुम्हाला देता येतील. उदाहरणार्थ, पाच उमेदवार निवडणुकीत उभे असतील आणि त्यापैकी एक उमेदवार निवडून द्यायचा असेल तरीही तुम्हाला तुमच्या निवडीच्या पसंतीक्रमाने उमेदवारांच्या नावासमोर 1 ते 5 असे आकडे घालता येतील. उर्वरीत उमेदवारांबाबतचा तुमचा पुढील पसंतीक्रम, अशा उमेदवारांच्या नावासमोर असलेल्या 'पसंतीक्रम' दर्शवाचा स्तंभामध्ये तुमच्या पसंतीक्रमानुसार 2,3,4 इत्यादी आकडे घालून दर्शवा.

फक्त जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा

मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने पुरविलेले कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील. जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरा. मतपत्रिकेबरोबर हे स्केच पेन तुम्हाला देण्यात येईल. अन्य कोणतेही पेन, मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द पेन्सिल, बॉलपॉईन्ट पेन किंवा अन्य कोणतेही लेखनाचे साधन मतदानासाठी वापरु नका. कारण त्यामुळे तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. उमेदवाराच्या नावाच्या स्तंभासमोर पसंतीक्रम म्हणून असलेल्या स्तंभामध्ये तुम्ही प्रथम पसंतीचा उमेदवार म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहून मतदान करा. हा 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्या.

या भाषांमध्ये लिहा पसंती क्रमांक

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा तुम्ही घातलेला आहे याची खात्री करून घ्या. तसेच तोच आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला नाही याची देखील खात्री करून घ्या. हा पसंतीक्रम फक्त 1,2,3  इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. एक, दोन, तीन इत्यादी शब्दांमध्ये दर्शवू नका. हे आकडे भारतीय अंकाच्या १, २, ३ इत्यादीसारख्या आंतरराष्ट्रीय रुपात किंवा I, II, III इत्यादींसारख्या रोमन रुपात किंवा 1. 2, 3 अशा देवनागरी रुपात किंवा संविधानाच्या अनुसूची आठमधील मान्यता दिलेल्या कोणत्याही एका भारतीय भाषेमध्ये वापरण्यात येणाऱ्या रुपामध्ये चिन्हांकित करता येतील.

या चुका टाळा अन्यथा तुमचे मत ठरणार अवैध

मतपत्रिकेवर तुमचे नाव लिहू नका किंवा अन्य शब्द लिहू नका किंवा तुमची स्वाक्षरी किंवा आद्याक्षरे लिहू नका. तसेच, तुमच्या अंगठ्याचा ठसा देखील उमटवू नका. यामुळे  तुमची मतपत्रिका अवैध ठरेल. तुमचा पसंतीक्रम दर्शविण्यासाठी तुमच्या निवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर v/ किंवा x अशी खुण करणे पुरेसे होणार नाही. अशा मतपत्रिका बाद करण्यात येतील. यापूर्वी स्पष्ट केल्याप्रमाणे तुमचा पसंतीक्रम फक्त 1,2,3 इत्यादी आकड्यांमध्येच दर्शवा. तुमची मतपत्रिका वैध ठरण्यासाठी तुम्ही उमेदवारांपैकी एका उमेदवारासमोर 1 हा आकडा लिहून तुमची पहिली पसंती दर्शवणे आवश्यक आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहेत. म्हणजेच तुम्ही तुमची दुसरी किंवा पुढील पसंती दर्शवा अथवा दर्शवू नका.

...तर मतपत्रिका ठरणार अवैध

1 हा आकडा घातलेला नसेल. 1 हा आकडा एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर घातलेला असेल. 1 हा आकडा, तो कोणत्या उमेदवाराला देण्यासाठी घातलेला आहे याबाबत संदेह निर्माण होईल अशा प्रकारे घातलेला असेल.  एकाच उमेदवारांच्या नावासमोर 1 आणि त्याबरोबर 2,3 इत्यादी आकडे देखील घातलेले असतील. पसंतीक्रम आकड्याऐवजी शब्दांमध्ये दर्शविलेला असेल. मतदाराची ओळखपटू शकेल अशी कोणतीही खूण किंवा लेखन असेल, आणि असे आकडे घालण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने दिलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त अन्य साधनाने कोणताही आकडा घातलेला असेल, तर अशी मतपत्रिका अवैध ठरेल.

ही बातमी देखील वाचा...

Nagpur Crime : सीसीटीव्ही असलेल्या स्मार्ट नागपूरमध्ये 'चेनस्नॅचिंग'च्या घटनांमधील अर्धे आरोपी अज्ञातच

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
Embed widget