Maharashtra Assembly Winter Session 2023 LIVE, Day 2: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस
Nagpur Winter Session 2023 LIVE Updates: नवाब मलिकांवरुन काल सभागृहात पडलेली ठिणगी आज वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.

Background
Maharashtra Assembly Winter Session 2023, Day 2: नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राष्ट्रवादी नेते नवाब मलिक (Nawab Malik) सभागृहात सत्ताधारी बाकांवर बसले आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. नवाब मलिकांवर आरोप करणाऱ्या भाजपला आता मलिक कसे चालतात? असा सवाल करत सभागृहात ठिणगी पडली. आज हीच ठिणगी वणव्याचं रुप घेण्याची शक्यता आहे. सभागृहात नवाब मलिकांवरुन विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे. मलिकांना भाजपात सामील करुन न घेण्याची विनंती देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खुलं पत्र जारी करत अजितदादांना (NCP Ajit Pawar) केली आहे. पण या ओपन लेटरवरुन सध्या अनेक तर्क वितर्क लढवले जात आहेत.
दुसरीकडे मराठा आरक्षण, अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, गेल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात झालेल्या ड्रग्ज कारवाया, ड्रग्जचे कारखाने, आरोग्य विभागातील कथित घोटाळ्याचे आरोप या सर्व विषयांवर अधिवेशनात चर्चा होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यांवरुन विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरु शकतात.
नवाब मलिकांवरुन आरोप प्रत्यारोप, फडणवीसांचा 'लेटर बॉम्ब'
अधिवेशनाचा पहिला दिवस कामकाजापेक्षा गाजला तो एका नेत्यामुळे. आणि तो नेता म्हणजे नवाब मलिक. ऑगस्टमध्ये जामीन मिळाल्यापासून ते कारागृहाबाहेर आहेत. मात्र, राष्ट्रवादीतल्या उलथापालथीनंतर त्यांची भूमिका काय? हे अजून गुलदस्स्त्यात होतं. आणि काल अचानक मलिक हिवाळी अधिवेशनात हजर झाले. इतकंच नाही तर, ते सत्ताधारी बाकावरही बसले. त्यातून त्यांचा पाठिंबा अजितदादांना आहे हे उघड झालं. मात्र हे सगळं असतानाच, उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीसांनी एक लेटरबॉम्ब टाकला आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
फडणवीसांनी काय म्हटलंय पत्रात?
जामिनावर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे आज अजित पवार गटात सहभागी होत सत्ताधारी बाकावर बसले. मलिक हे सत्ताधारी बाकांवर बसल्याने भाजपवरही टीका होऊ लागली असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना पत्र लिहित विरोध केला आहे. सत्ता येते जाते, पण देश महत्वाचा. त्यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाली होती. त्यामुळे त्यांना महायुतीमध्ये सामावून घेता कामा नये असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांमधील मतभेद समोर येऊ लागल्याची चर्चा होऊ लागली आहे.
दर्डा यांच्या घरी नवाब मलिक उपस्थित, ते निघून गेल्यानंतर फडणवीसांची हजेरी
कालपासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. दरम्यान माजी खासदार विजय दर्डा यांच्यावतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं..या कार्यक्रमाला नवाब मलिकांनी उपस्थिती लावली. मात्र कार्यक्रमातून मलिक निघून गेल्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीस स्नेहभोजनासाठी विजय दर्डा यांच्या घरी दाखल झाले.
Maharashtra Assembly Winter Session 2023 : विधानसभा कामकाज दिवसभरासाठी तहकुब
सोमवारी अवकाळी पावसावर तर मंगळवारी १२ वाजता मराठा आरक्षण वरती चर्चा होणार
देवेंद्र फडणवीस
- कॅसिनो नियंत्रण आणि कर संदर्भात सभागृहात कायदा पास केला होता
- 2016 मध्ये या फाईल वरती मी लिहील हेत
- कॅसिनो कल्चर आपल्याला नको अस लिहील
- सरकर बदलल्यानंतर पुन्हा माझ्याकडे फाईल आली
- मात्र ही कायदा निरसीत केल तर परत कोणी कोर्टात जाणार नाही
- त्यामुळे हा निरसन कायदा मान्य करावा
Maharashtra Assembly Winter Session 2023 : भाजप आमदार सुरेश धस यांची मोठी मागणी
- 1 ते 10 वी शालेय शिक्षणात छ.शिवाजी महाराजांवर आधारीत अभ्यास क्रम समाविष्ठ करावा
- सध्या शिकवला जात असलेला महाराजांचा इतिहास हा जुजबी आहे
- संपुर्ण जग महाराजांचे धडे घेतायेत ॲाक्सफर्ड युनिर्वसिटीत तर महाराजांच्या रणनितीवर मॅनेजमेंटचा मोठा अभ्यास क्रम आहे
- मग आपला महाराष्ट्र का महाराजांचा इतिहास शिकवत नाही?
- महाराजांचा इतिहास टप्प्या टप्याने शालेय शिक्षणात समाविष्ट करावा
- अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत केली
- अशासकीय ठराव माध्यमांतून ही मागणी त्यांनी केलीये
- यांवर विधान परीषदेत चर्चा होवून त्या विषयी सरकार आपली भुमिका जाहीर करणार























