Nagpur News : भूमापन अधिकारी कार्यालयात 24 ऑगस्टला फेरफार अदालत
प्रकरणी संबंधित परिरक्षण भूमापक प्रकरणाची तपासणी करुन कार्यवाही करणेचे नियोजित आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी सतीश पवार यांनी केले आहे.
नागपूर : कोरोनाकाळापासून प्रलंबित फेरफार प्रकरण निकाली काढण्यासाठी 24 ऑगस्ट रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे. नामांतरणासाठी बंधकारक ऑनलाईन प्रणाली लागू केल्याने नगर भूमापन अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत क्र.1 मध्ये सदर EPCIS प्रणाली नवीन असल्याने दि. 15 जुलै 2022 पर्यंतच्या मुदतबाह्य प्रकरणांवर कार्यवाही करणेबाबत नामांतरण प्रकरणे प्रलंबित आहेत व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 155 अंतर्गत अर्ज अशा प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची समक्ष पूर्तता करुन नियमानुसार नामांतरणे मंजूर व्हावेत यासाठी नगर भूमापन अधिकारी क्रं.2, नागपूर कार्यालयात 24 ऑगस्ट रोजी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
WCL Nagpur : कोळसा कर्मचाऱ्यांना मिळेल पर्याप्त पेंशन, खासगी खदानींमध्येही लागू होईल निवृत्ती वेतन
या कागदपत्रांसह भेटा
त्याकरिता संबंधित अर्जदार यांनी कार्यालयात सादर केलेल्या प्रकरणाची पोचपावती व त्यांच्या प्रकरणाशी संबंधित सर्व मूळ कागदपत्रे व त्यांचा एक फोटोकॉपी सेट, इत्यादीसह समक्ष उपरोक्त दिनांकास कार्यालयात हजर रहावे. फेरफार अदालतीच्या अनुषंगाने उपस्थित होणाऱ्या संबंधित अर्जदारास टोकन वाटप करण्यात येणार असून त्यानुसार अर्जदारास त्यांच्या प्रकरणाच्या अनुषंगाने संबंधित परिरक्षण भूमापक यांची भेटीची वेळ देण्यात येणार असून प्रकरणी संबंधित परिरक्षण भूमापक प्रकरणाची तपासणी करुन कार्यवाही करणेचे नियोजित आहे. सर्व अर्जदार यांनी शासनाच्या सूचनेनुसार कोव्हीड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन नगर भूमापन अधिकारी क्रं.2 सतीश पवार यांनी कळविले आहे.