Independence Day 2022 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासाठी ज्येष्ठ नागरिकांचा पुढाकार, अबाल-वृद्धांना सांगितले स्वातंत्र्याचे किस्से
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त शहरात विविध सामाजिक संस्थांच्यावतीने उत्साहात स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिक यामध्ये योगदान देत असल्याचे दिसून येत आहे.
नागपूरः देशभरात उत्साहात साजरा होत असलेल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवासाठी सिनीयर सिटीजन कौन्सिल ऑफ नागपूर डिस्ट्रिक्टनेही पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ नागरिकांच्यावतीने परिसरात अबाल-वृद्ध सर्वांनाच्या छोटेखानी कार्यक्रम घेऊन स्वातंत्र्यांचे किस्से सांगण्यात येत आहे. तसेच परिसरातील नागरिकांना ध्वज वितरण करण्यात आले.
ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष मनोहर खर्चे, सचिव सुरेश रेवतकर व मधुकर पाठक यांचे हस्ते ध्वज वितरण करण्यात येत आहे. तर मनोहर तुपकरी, प्रदीप धुमाळ, संजय अस्वले, उकंडराव चौधरी, भगवान टिचकुले, वसंत पाटील, पंढरोनाथ सालीगुंजेवार, उल्हासनगरातील ज्येष्ठ नागरिक प्रा. चंन्द्रशेखर डुमरे, मेजर सुरेश फालके, गणपत ठाकरे, विजय वानखेडे, योगेश बिरे, लिना गहुकर, अर्चना गहुकर यांनी मोलाचे सहकार्य केले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी कौन्सिलच्या उपक्रमाचे सर्व ज्येष्ठांनी स्वागत केले.
Independence Day 2022 : 76 व्या स्वातंत्र्य दिनाबाबत 10 महत्त्वाच्या गोष्टी, वाचा सविस्तर...
रन फॉर 75 चे जिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
नागपूरः भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पाश्वभूमीवर जनतेच्या मनात देशभक्तीची भावना व स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात या उद्देशाने आजादी का अमृत महोत्सवांतर्गत रन फॉर 75 चे आयोजन क्रीडा विभागातर्फे करण्यात आले. या रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याहस्ते झाला.
क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ व एन.सी.सी.चे अधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी आर. विमला व क्रीडा विभागाचे उपसंचालक शेखर पाटील यांनी उपस्थितांना शुभेच्छा दिल्या.
Independence Day 2022 PM Modi Speech : यंदाचं भाषण 1 तास 22 मिनिटं 32 सेकंदांचं; सर्वाधिक वेळ भाषणाचा रेकॉर्ड मोदींच्याच नावे
समाज कल्याण विभागातर्फे बाईक रॅली
नागपूर : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात. स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुलिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी. याच उद्देशाने सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत सामाजिक न्याय विभागातर्फे प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण विभाग नागपूर यांच्या वतीने विभागात विविध कार्यक्रम राबवून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात आहे.डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रादेशिक उपायुक समाज कल्याण नागपूर यांच्या मार्गदर्शनात बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.