Nagpur News: तुम्ही व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घेतलाय...नागपुरातील 'या' केंद्रांत विनाामूल्य लसीकरण
मनपाकडे कोव्हॅक्सीनचा साठा 31 जानेवारीपर्यंत आणि कोव्हिशिल्डचा साठा 9 फेब्रुवारीपर्यंतच उपलब्ध आहे. दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो.
![Nagpur News: तुम्ही व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घेतलाय...नागपुरातील 'या' केंद्रांत विनाामूल्य लसीकरण Have you taken a booster dose of vaccine Free Vaccination at these centers in Nagpur know the name of the center near your home Nagpur News: तुम्ही व्हॅक्सिनचा बुस्टर डोस घेतलाय...नागपुरातील 'या' केंद्रांत विनाामूल्य लसीकरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/09/072ccdaed8b8ef8aa964231fab3626311657360883_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nagpur News : कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी (covid vaccination) शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला 9000 डोस मिळाले आहेत. कोव्हिड प्रतिबंधात्मक कोव्हिशिल्ड / कोव्हॅक्सीन लसीकरणाचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस न घेतलेल्या व्यक्तींनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. मनपाकडे कोव्हॅक्सीनचा साठा 31 जानेवारीपर्यंत आणि कोव्हिशिल्डचा साठा 9 फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध आहे.
कोरोना संसर्गापासून बचावाचे मोठे अस्त्र कोव्हिड प्रतिबंधक लसीकरण ठरत आहे. नागपूर महानगरपालिकेद्वारे नागपूर शहरातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण पूर्ण व्हावे यासाठी लसीकरणाचे अभियान चालविण्यात आले होते. शहरात अनेक नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. दुसऱ्या डोससाठी काही नागरिकांचे लसीकरण अद्यापही बाकी आहे. याशिवाय दोन डोस घेतल्यानंतर सहा महिन्याचा कालावधी पूर्ण झालेल्या व्यक्तींना बुस्टर डोस देण्यात येतो. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे लसीकरण करण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनाकडून झालेल्या लस पुरवठ्यानुसार शहरात लसीकरण अभियान चालविण्यात आले आहे. झोननिहाय मनपाच्या विविध केंद्रांवर लस उपलब्ध करून देण्यात येत असून लसीकरणापासून अद्याप वंचित असलेल्यांनी त्वरीत आपले लसीकरण करून घेण्याचे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.
'हे' आहेत नागपुरातील कोव्हिशिल्ड लसीकरण केंद्र (वेळ सकाळी 9 ते दुपारी 1 पर्यंत)
अ.क्र. मनपा झोनचे नाव - लसीकरण केंद्र पत्ता
1. लक्ष्मीनगर, खामला प्राथ. आरोग्य केंद्र-पांडे लेआउट, खामला
2. धरमपेठ, इंदिरा गांधी रुग्णालय - गांधीनगर
3. धरमपेठ, के.टी. नगर यूपीएचसी के.टी. नगर - उत्कर्ष नगर जवळ, काटोल रोड
4. हनुमान, नगर सोमवारी क्वॉटर, गजानन मंदिराच्या बाजूला, सोमवारी पेठ
5. धंतोली, एम्स हॉस्पीटल - मिहान
6. धंतोली, आयसोलेश हॉस्पिटल - इमामवाडा
7. धंतोली, बाबुळखेडा यूपीएचसी - मानवता शाळा समोर, रामेश्वरी रोड बाबुळखेडा
8. नेहरू नगर, नंदनवन यूपीएचसी - दर्शन कॉलनी नंदनवन
9. नेहरू नगर, दिघोरी यूपीएचसी - जिजामाता नगर, दिघोरी
10. गांधीबाग, स्व. प्रभाकरराव दटके महाल रोगनिदान केंद्र - कोतवाली पोलिस चौकीजवळ, महाल
11. सतरंजीपुरा, मेहंदीबाग यूपीएचसी - देवतारे चौक, मेहंदीबाग
12. लकडगंज, हिवरीनगर यूपीएचसी हिवरीनगर - पॉवर हाउस जवळ
13. आशीनगर, मनपा स्त्री रुग्णालय - पाचपावली
14. मंगळवारी, इंदोरा यूपीएचसी - बेझनबाग मैदान, इंदोरा
15. मंगळवारी, झिंगाबाई टाकळी यूपीएचसी - झिंगाबाई टाकळी झेंडा चौक जवळ
ही बातमी देखील वाचा...
MPSC News : एमपीएससीच्या नियमामुळे पत्रकारितेच्या पदव्यांवरच प्रश्नचिन्ह ; पदवी आणि पदविका पात्र तर पदव्युत्तर पदवी अपात्र?
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)