![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Amruta Fadnavis : 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचं वाण'; उखाण्यातून अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला
Amruta Fadnavis Ukhane : नागपुरात भारतीय जानता पक्षाचा महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून 'विकासाचे वान' हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं.
![Amruta Fadnavis : 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचं वाण'; उखाण्यातून अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला Devendra Fadnavis s wife Amruta Fadnavis special ukhane for opposition also singing song nagpur bjp Haldi kunku event marathi news Amruta Fadnavis : 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचं वाण'; उखाण्यातून अमृता फडणवीसांचा विरोधकांना टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/02/06/d6169b1074a2ab6dd66a32ac6db6214a1707192806911322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra News : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या होम मिनिस्टर अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उखाण्यातून (Ukhane) विरोधकांना (Opposition) टोला हाणला आहे. 'देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वाण' असं म्हणत अमृता फडणवीसांनी (Amruta Fadnavis Ukhane) विरोधकांवर निशाणा साधला आहे. हळदी कुंकू (Haldi-Kunku) कार्यक्रमाला हजेरी लावत त्यांनी विरोधकांनाही कैचीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
अमृता फडणवीसांचा उखाण्यातून विरोधकांना टोला
नागपुरात (Nagpur News) भारतीय जानता पक्षाचा (BJP) महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून 'विकासाचे वान' हळदी कुंकू (Haladi Kunku Event) या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आलं होतं. "देवेंद्रजीनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आली विकासाचे वाण, आपण सर्वांनी ते स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण", असं उखाण घेत अमृता फडणवीसांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं आहे.
Amruta Fadnavis Ukhana : अमृता फडणवीसाच्या खास उखाण्यातून विरोधकांना टोला
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या दक्षिण पश्चिम विधानसभा मतदार संघात भाजपाच्या (BJP) महिला आघाडीने हळदी कुंकवाचा (Haladi Kunku Program) कार्यक्रम ठेवला त्यात अमृत फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी उखाणा घेतला
हळदी-कुंकू कार्यक्रमात गायलं गाणं
'विकासाचे वान' हळदी कुंकू या कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) या कार्यक्रमात महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महिलांचा आग्रहावर एक गाणंही गायलं.
यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारांच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजना त्यांना समाजात सन्माने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
VIDEO: Just Looking Like A Wow! म्हणत अमृता फडणवीसांनी दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)