Defense sector : संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रातील कौशल्य विकास, नोकरी प्रशिक्षण आता नागपुरात
कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण सुविधा प्रदान करणे हा प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. याद्वारे संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात स्थानिक लोक रोजगारक्षम होऊ शकतील व्हीडीआयएच केंद्रीकृत सुविधा प्रदान करेल.
- विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यात MOU
- ऑर्डनन्स फॅक्टरी अंबाझरी येथील यंत्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटमध्ये सुविधा उपलब्ध
नागपूर: विदर्भातील तरुणांना आता संरक्षण आणि एरोस्पेसमधील कौशल्य विकास आणि नोकरी प्रशिक्षण सुविधांसाठी शोधाशोध करण्याची आवश्यकता पडणार असून आता विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्रा इंडिया लिमिटेडच्या (DPSU) यांच्या दरम्यान फॅक्टरी लर्निंग इन्स्टिट्यूट, ऑर्डिनन्स फॅक्टरी अंबाझरी, नागपूर येथील यंत्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट आणि कॉमन फॅसिलिटी सेंटर येथे 'सेंटर ऑफ एक्सलन्स' आणि 'केंद्रीकृत सुविधा केंद्र' स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार झाला आहे. यामुळे आता तरुणांना नागपुरातच संरक्षण आणि एरोस्पेसमधील कौशल्य विकास आणि नोकरी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध होणार आहे.
यंत्रा इंडिया लिमिटेड ने विदर्भ आणि मध्य भारतातील तरुणांना या क्षेत्रात करिअर करण्याला प्रोत्साहन देण्यासाठी नागपूर येथे ग्लोबल सेंटर ऑफ एक्सलन्स इन डिफेन्स, एरोस्पेस स्थापन करण्यासाठी विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब च्या उपक्रमाला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
व्हीडीआयएचचे दुष्यंत एन देशपांडे यांनी सांगितले की, 'संपूर्ण इकोसिस्टम एरोस्पेस, एव्हिएशन आणि संरक्षण क्षेत्रातील विकासाचे केंद्र बनेल. सुरुवातीला आम्ही वायआयटीएमच्या पायाभूत सुविधांचा वापर करण्याचा प्रस्ताव ठेवला, ज्याचा उपयोग युडीएएन -कौशल्य विकास केंद्र तयार करण्यासाठी केला जाईल. त्यानंतर 'ऑर्डीनन्स फॅक्टरी अंबाझरी ' च्य विद्यमान सेटअपमध्ये NIRMAN (एनआयआरएमएएन)-इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग कम सेंट्रलाइज्ड फॅसिलिटी सेंटरची स्थापना केली जाईल.
स्थानिकांना रोजगारक्षम करण्याचे उद्देश
यंत्र इंडिया लिमिटेडचे चेयरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर, आयओएफएस राजीव पुरी यांनी सांगितले की 'या प्रकल्पाचा मुख्य उद्देश कौशल्य विकास आणि रोजगार प्रशिक्षण सुविधा प्रदान करणे हा आहे. /eodb संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रात स्थानिक लोक रोजगारक्षम होऊ शकतील व्हीडीआयएच केंद्रीकृत सुविधा देखील प्रदान करेल. ज्यामुळे स्वतःचा उत्पादन उद्योग सुरू इच्छुकांना ते उपयुक्त ठरतील. व्हीडीआयएच द्वारे संभाव्य उद्योजकांसाठी आवश्यक कायदेशीर आणि तांत्रिक-व्यावसायिक मार्गदर्शन देखील प्रदान केले जाईल.
Jain Paryushan 2022 : पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद, 24 ऑगस्टपासून सुरु होतोय पर्व
पाच वर्षात 40 हजार जणांचा प्रशिक्षण
व्हिडीआयएचचे संयोजक दुष्यंत देशपांडे यांनी याविषयी अधिक प्रकाश टाकताना सांगितले की व्हिडीआयएच किमान 40,000 व्यक्तींना पाच वर्षांत UDAN (युडीएएन) एरो डिफेन्स सेंटर ऑफ एक्सलन्स येथे प्रशिक्षण देईल. यात एकात्मिक उत्पादनाद्वारे रिव्हर्स इंजिनीअरिंग, प्रोटोटाइपिंग, उत्पादन विकास या क्षेत्रात नागपूरच्या आसपासच्या लघु आणि मध्यम उद्योगांना निर्माण केंद्रात प्रशिक्षणाद्वारे कौशल्य प्राप्त करण्यास सक्षम करण्यात येईल. यामुळे एरोस्पेस आणि डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंगमधील उदयोन्मुख संधी आत्मसात करण्यासाठी अनुकूल आणि भविष्यातील उद्योगासाठी तयार वर्कफोर्स तयार होईल. अशा प्रकारे व्हीडीआयएच रोजगार निर्माण करेल, कुशल मनुष्यबळ निर्माण करेल आणि विदर्भात उद्योगधंदे वाढविण्यास योगदान देईल.
Mahatma Jyotirao Phule Karjmukti Yojna : एकही पात्र लाभार्थी वंचित राहू नये, चुकीच्या माणसाला लाभ मिळू नये ; कर्मचाऱ्यांना निर्देश
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यातील MOU
विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रियल हब यंत्रा इंडिया लिमिटेड आणि विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी उपक्रम आहे. नागपूर आणि परिसरातील स्थानिक उद्योगांकडून याला प्रोत्साहन आणि सहकार्य लाभत आहे. महाराष्ट्र सरकार या प्रयत्नात सहभागी होण्यासाठी पुढे आले होते. आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्र दरम्यान नागपुरात उडान-एरो डिफेन्स स्किल कॉम्पिटन्स सेंटर आणि निर्माण-सीएफसी कम इंटिग्रेटेड मॅन्युफॅक्चरिंग सेंटर स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार केला होता. विदर्भ डिफेन्स इंडस्ट्रीज असोसिएशन ने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोबत महाराष्ट्राला एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून प्रोत्साहन देण्यासाठी MOU देखील केला आहे.