एक्स्प्लोर

Jain Paryushan 2022 : पर्युषण पर्व दिनानिमित्त शहरातील कत्तलखाने बंद, 24 ऑगस्टपासून सुरु होतोय पर्व

पर्युषण पर्वानिमित्त नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येणार आहे.

नागपूर : पर्युषण पर्व दिनानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार श्रावण वैद्य 12 व भाद्रपद शुध्द 4 या दिवशी राज्यातील सर्व कत्तलखाने आणि मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याच्या शासनाने निर्णय घेतलेल्या आहे. तसेच उर्वरीत दिवशी (श्रावण वैद्य 13 ते भाद्रपद शुध्द 3 व 5) सर्व कत्तलखाने व मांस विक्री दुकाने बंद ठेवण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. त्यानुसार  बुधवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी (श्रावण वैद्य 12) आणि बुधवार दिनांक 31 ऑगस्ट (भाद्रपद शुध्द 4) रोजी नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे. जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेव्दारे कार्यवाही करण्यात येईल. तसेच दिनांक 25 ऑगस्ट (श्रावण वैद्य 13) ते 30 ऑगस्ट दरम्यान व 01 सप्टेंबर (भाद्रपद शुध्द 3 व 5) या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

Maharashtra Corona Update : राज्यात सोमवारी 1183 कोरोना रुग्णांची नोंद तर 1098 रुग्ण कोरोनामुक्त

पर्युषण पर्व म्हणजे?

श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व हा 8 दिवसांचा असतो. तर दिगंबर जैन बांधवांचा सण हा 10 दिवसांचा असतो. श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व संपल्यावर दिगंबर जैन बांधवांचा पर्युषण पर्व सुरु होतो. या वर्षी 24 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान श्वेतांबर जैन यांचा पर्युषण पर्व आहे. जैन बांधव या पर्युषण पर्व सणाच्या च काळात मनातील सर्व क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि वैराग्यापासून मुक्त होण्यासाठी मार्ग शोधतात. या सर्व गोष्टींवर विजय मिळवल्यानंतर त्यांना स्वत:ला शांती आणि शुद्धतेकडे नेण्याचा मार्ग सापडत असल्याची मान्यता आहे. मनात येणारे तामसिक विचार दूर करण्याचा उपवास म्हणजेच पर्युषण असे म्हणतात. पर्युषणचा सामान्य अर्थ आहे की, या उत्सवात आपल्या मनात येणारे सर्व वाईट विचारांपासून सुटका. जैन बांधवांचा पर्युषण पर्व हा सण भाद्रपद महिन्याच्या पंचमी तिथीला सुरू होतो आणि अनंत चतुर्दशीपर्यंत हा उत्सव सुरू राहतो. हा उत्सव साजरा करणारे अनुयायी भगवान महावीरांनी सांगितलेल्या 10 नियमांचे पालन करुन पर्युषण पर्व साजरा करतात. हिंदू धर्मातील नवरात्रांप्रमाणेच मानला जाणारा हा उत्सव जैन धर्माचं मुख्य तत्व अहिंसेवर चालण्याचा मार्ग दर्शवतो.

Nitin Gadkari : अटलजी-अडवाणींसारख्या नेत्यांमुळं आज मोदींच्या नेतृत्वात भाजपची सत्ता : नितीन गडकरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 6:30 AM  :20 April 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSpecial Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतिल तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
विधानसभा निवडणुकीत फडणवीस सांगतील तो निर्णय मान्य, हर्षवर्धन पाटलांसमोर अजित पवारांचं वक्तव्य 
Weather Update : कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
कुठे ऊन, कुठे पाऊस! दक्षिण कोकणात पावसाची शक्यता, या भागात उष्णतेची लाट
Horoscope Today 20 April 2024 : आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
आज 'या' राशींवर असणार शनिची कृपा, तर धनु, मीन राशीला बसणार आर्थिक फटका; वाचा शनिवारचं राशीभविष्य
IPL 2024: रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
रस्सीखेच सुरु झाली...चार संघाचे 8, तर 3 संघाचे 6 गुण; पाहा आयपीएलचे Latest Points Table
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
Travel : आता फ्रान्सचा अनुभव मिळेल भारतात! देशातील पहिली 'फ्रेंच कॉलनी!' इथली घरं करतात आकर्षित, एकदा भेट द्या..
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
Embed widget