एक्स्प्लोर
मित्राच्या अनैतिक संबंधात विवाहितेच्या पतीचा अडसर, पोलिसाकडूनच हत्येची सुपारी
संबंधित पोलिसाच्या मित्राचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध होते. यामध्ये विवाहित महिलेचा पती अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याची जबाबदारी पोलिस कमांडोवर सोपवण्यात आली.
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातच पोलिसांची खाकी वर्दी पुन्हा काळवंडली आहे. मित्र आणि त्याच्या विवाहित प्रेयसीच्या अनैतिक संबंधात नवरा अडसर ठरत असल्याने पोलिसानेच सुपारीची व्यवस्था केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सुपारी किलिंगमध्ये पोलिस कमांडोचा सहभाग असल्याची घटना नागपुरात समोर आला आहे. संबंधित पोलिसाच्या मित्राचे एका विवाहितेसोबत अनैतिक संबंध होते. यामध्ये विवाहित महिलेचा पती अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्याची जबाबदारी पोलिस कमांडोवर सोपवण्यात आली.
आपल्या मित्राच्या सांगण्यावरुन पोलिसाने तीन लाखात हत्येची सुपारी दिली आणि मारेकरी बोलावले. मित्रासोबत मिळून पार्टीचं सोंग करुन त्याने विवाहितेच्या पतीला शहराबाहेरच्या धाब्यावर नेलं. त्याला सुपारी किलर्सकडे सोपवून आरोपी नागपूरला परत आले.
हत्ये प्रकरणी पोलिसांनी मयताची पत्नी, तिचा प्रियकर, आणि त्याचा पोलिस कमांडोला अटक केली आहे. सुपारी किलर्स मात्र फरार झाले आहेत.
याआधी ही नागपूर पोलिसांचे काही कर्मचारी दरोडा, कॅश व्हॅन लूट, गुन्हेगारांच्या पार्टीत डान्स, ड्रग्ज माफियासोबत मैत्री अशा प्रकरणात अडकले होते. मात्र आता गुन्हे थांबवण्याची जबाबदारी असलेल्या खाकी वर्दीवर हत्येचा कलंक लागला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
कोल्हापूर
Advertisement