Azadi Ka Amrit Mahotsav : चिमुकल्यांनी चित्रांद्वारे समजून घेतले 'चाले जाव', जंगल सत्याग्रह, गोवा मुक्ती संग्राम
प्रदर्शनीमध्ये 1942 सालच्या 'चाले जाव' आंदोलन, जंगल सत्याग्रह गोवा मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचे आणि त्या काळाचे चित्रण करण्यात आलेले आहे.
नागपूर: 09 ऑगस्ट, क्रांतिदिनाचे औचित्य साधून नागपूर जिल्हा पारिषदेच्या पंचायत आणि पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिम्मिताने स्वातंत्र्य चळवळीत शहीद झालेल्या तसेंच स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या आणि स्वातंत्र्यपूर्व काळात देशासाठी निरनिराळ्या क्षेत्रात कार्य केलेल्या नागपूर जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचे चित्र वर्णन करणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्षा रश्मी बर्वे यांच्या हस्ते संपन्न झाले.
75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त 'भारतीय स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्या स्वातंत्र्य सैंनिकांची चित्र प्रदर्शनी' चे आयोजन कै. आबासाहेब खेडकर सभागृहाच्या बाहेरील भिंतींवर करण्यात आलेले आहे. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषद उपाध्यक्षा सुमित्रा कुंभारे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे विवेक इलमे, सामान्य प्रशासन विभागाचे विपुल जाधव, पंचायत विभागाच्या प्रमिला जाखलेकर, आरोग्य विभागाचे दीपक सेलोकर, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उमल चांदेकर, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे संजय वानखेडे, शिक्षणाधिकारी (मा.) रवींद्र कटोलकर महिला व बाल कल्याण विभागाचे भागवत तांबे, तसेच जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्तीत होते.
Azadi Ka Amrit Mahotsav : 'हर घर तिरंगा' उपक्रमांतर्गत शाळांमध्ये मोफत ध्वज वितरण
चरित्र दर्शविणारी चित्रे
या प्रदर्शनित जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे चरित्र दर्शविणारी चित्रे आहेत. 1942 सालच्या 'चाले जाव' आंदोलन, जंगल सत्याग्रह गोवा मुक्ती संग्राम मध्ये स्वातंत्र्य सैनिकांच्या जीवनाचे आणि त्या काळाचे चित्रण करण्यात आलेले आहे . " स्वातंत्र्य चळवळीत जिल्ह्यातील स्वातंत्र्य सेनानींनी बजावलेल्या महत्वाच्या भूमिकांबद्दल जागरूकता पसरवणे" हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश असल्याचे प्रतिपादन अध्यक्षा रश्मीताई बर्वे यांनी केले. शासनाच्या निर्देशाप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त स्वराज्य महोत्सव अंतर्गत 17 ऑगस्ट पर्यंत आणि पुढे वर्षभर विविध उपक्रमांची अमलबाजवणी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केली जाणार असल्याचे मत या वेळी सीईओ योगेश कुंभेजकर यांनी व्यक्त केले.
Bihar Political Crisis : नितीश कुमार यांचा भाजपला दे धक्का, बिहारमध्ये महागठबंधन, बुधवारी शपथविधी
जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन
जिल्हा परिषद, नागपूर महानरपालिका, पोलिस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने शहरात भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात नागरिकांमध्ये जनजागृती करणे, ध्वज वितरण, सौंदर्यीकरण आदींचा समावेश आहे. नागरिकांनीही या महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.