Congress And VBA Alliance : तब्बल दोन दशकानंतर मुंबईत काँग्रेस-वंचित आघाडी Special Report
मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या आघाडीची अधिकृत घोषणा झाली.. मात्र युतीवरुन काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य रंगलंय.. वर्षा गायकवाड वंचितसोबतच्या आघाडीवर समाधानी नसल्यानं नाराज असल्याची चर्चा होती... दरम्यान एकदा आघाडी झाल्यानंतर दोन पावलं मागं जावं लागतं, असं विजय वडेट्टीवारांनी म्हटलं तर आपण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण गायकवाड यांना द्यावं लागलं
दोन दशकानंतर..पुन्हा एकदा... काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकरांची आघाडी झाली...
पण ही घोषणा होत असतानाच एक चेहरा याठिकाणी मिसिंग होतो तो म्हणजे मुंबई काँग्रेस अध्यक्ष, खासदार वर्षा गायकवाड यांचा...
याला कारण म्हणजे वर्षा गायकवाड वंचितसोबतच्या आघाडीवर समाधानी नसल्यानं नाराज असल्याची चर्चा होती...
पण दुसऱ्या दिवशी वर्षा गायकवाड स्वत: समोर आल्या...
आणि नाराजीची चर्चा फेटाळत वंचितसोबत आघाडी झाल्याचा आनंद असल्याचं स्पष्ट केलं...
तब्बल २५ वर्षांनंतर हे दोन्ही पक्ष एकत्र आले. गेल्या २५ वर्षांत आघाडीसाठी झालेल्या प्रयत्नांची गणती नाही. यावेळीसुद्धा ही आघाडी होणारच नाही असं अनेकांना वाटत होतं...
पण कॉफी विथ कौशिक य़ा एबीपी माझाच्या संपादक सरिता कौशिक यांच्या एका पॉडकास्टमुळे या आघाडीचं पहिलं पाऊल पडलं...
कसं ते वर्षा गायकवाड यांच्याच तोंडून ऐका...
दुसरीकडे आघाडी करायची तर तडजोड आलीच अशी काँग्रेस नेत्यांची सबुरीची भूमिका आहे...
All Shows

































