Bhandup : भांडुपमध्ये भीषण बस अपघात; BEST बसची पाच-सहा जणांना धडक, चार जणांचा मृत्यू
Bhandup Bus Accident : अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास करत आहेत.

मुंबई: भांडुप (पश्चिम) भागात सोमवारी रात्री एक गंभीर अपघात झाला असून त्यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. स्टेशन रोड परिसरात धावणाऱ्या BEST बसने रस्त्यावर चालणाऱ्या पाच ते सहा जणांना धडक दिली. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
Mumbai Bus Accident : जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींवर उपचार सुरू असून घटनेची सखोल चौकशी केली जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी उपस्थित होती.
Mumbai, Maharashtra: A major road accident in Mumbai’s Bhandup area occurred after a BEST bus went out of control and hit pedestrians, crushing 10–12 people. Two deaths have been confirmed, while several injured are undergoing treatment: Mumbai Police pic.twitter.com/Ag0x1PNcRk
— IANS (@ians_india) December 29, 2025
BEST Bus Accident Mumbai : अपघात कसा झाला?
प्राथमिक माहितीनुसार, भांडुप स्टेशन रोडवरून जाणाऱ्या BEST बसने पाच ते सहा नागरिकांना धडक दिली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास करत आहेत.
BEST Bus Crash : आपत्कालीन यंत्रणा तत्काळ घटनास्थळी
अपघाताची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, BEST कर्मचारी आणि 108 रुग्णवाहिका सेवा घटनास्थळी दाखल झाली. जखमींना प्राथमिक उपचार देऊन रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातामुळे काही दिवसांपूर्वी घडलेल्या कुर्ला येथील BEST बस अपघाताच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या असून, सार्वजनिक वाहतूक सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
ही बातमी वाचा:
























