Azadi Ka Amrit Mahotsav : विविध क्रीडा प्रकारात शहराला वैभव प्राप्त करुन देणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार
अनेक वर्षांपासून शहराला विविध क्रीडा प्रकारात वैभव प्राप्त करुन देणारे खेळाडू, प्रशिक्षक, वृत्त संकलन करणारे क्रीडा पत्रकारांचा जिल्हाधिकारी आर. विमला यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
![Azadi Ka Amrit Mahotsav : विविध क्रीडा प्रकारात शहराला वैभव प्राप्त करुन देणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार Azadi Ka Amrit Mahotsav felicitation of senior sportspersons in nagpur by collector Azadi Ka Amrit Mahotsav : विविध क्रीडा प्रकारात शहराला वैभव प्राप्त करुन देणाऱ्या क्रीडापटूंचा सत्कार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/24/c0dfb4e61892b675f2a7bd5330c711aa1658672541_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : नागपुरात इतक्या मोठ्या संख्येने शिव छत्रपती पुरस्कार (chhatrapati puraskar) प्राप्त खेळाडूंशी संवाद साधताना आनंद होत आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू निर्माण होण्याची जिद्द आहे. पायाभूत सुविधा व त्यासाठी कार्य करणाऱ्या संघटना आहेत. क्रीडा क्षेत्रातही उत्तम करिअर घडू शकते. हे नव्या पिढी बिंबविण्याचे काम आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी आर. विमला यांनी सांगितले.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त द्रोणाचार्य, अर्जुन, शिव छत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच राज्य व राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त खेळाडूंचा भावपूर्ण सोहळा शनिवारी सायंकाळी मानकापूर क्रीडा स्टेडियममध्ये रंगला, यावेळी त्या बोलत होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून शहराला विविध क्रीडा प्रकारात वैभव प्राप्त करुन देणारे खेळाडू, प्रशिक्षक, वृत्त संकलन करणारे क्रीडा पत्रकार या सोहळ्याला उपस्थित होते. जिल्हाधिकारी आर. विमला यांनी यावेळी प्रत्येक खेळाडूंचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. व्यासपीठावर द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मुनीश्वर, उपसंचालक क्रीडा शेखर पाटील, विम्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष बदखल, डॉ. नेहा बदखल, डॉ. ईशा कुमारी, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक उपस्थित होत्या.
जिल्हाधिकारी म्हणाल्या, जुन्या जाणत्या क्रीडापटूंना बघून, भेटून व संवाद साधून त्यांच्या दायित्वाची कल्पना येते. या एका पिढीने प्रचंड कष्ट घेतल्यामुळे सुविधा नसणाऱ्या काळात नागपूरच्या नावलौकिकाला ते वाढवू शकले. त्यामुळे नव्या पिढीने जोमाने या क्षेत्रात पदार्पण आवश्यक आहे. यावेळी शिव छत्रपती पुरस्कार, राज्य व राष्ट्रीय युवा पुरस्कार भेटलेल्या तीस खेळाडूंचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.
या क्रीडापटूंचा सत्कार
व्यांगांमधून अँथलेटीक्स, भारोत्तोलन क्रीडा प्रकारात द्रोणाचार्य, अर्जुन, दादोजी कोंडदेव आणि शिव छत्रपती पुरस्कार विजेते विजय कविश्वर, अँथलेटीक्समध्ये दादोजी कोंडदेव पुरस्कार संजय काणे, सिताराम भोतमांगे दादोजी कोंडदेव (हँडबॉल), डॉ. सुनील भोतमांगे दादोजी कोंडदेव, शिवछत्रपती पुरस्कार (हँडबॉल), संदीप गवई एकलव्य पुरस्कार (दिव्यांग धनुर्विद्या), संजय लोखंडे शिवछत्रपती पुरस्कार (संघटक), यापुढील सर्व मान्यवर हे शिवछत्रपती पुरस्कार विजेते होत. त्यात अतुल दुरुगकर (हँडबॉल) पियुष आंबुलकर (सॉफ्ट बॉल,) निखिलेश तभाणे व पियुष आकरे (स्केटिंग), मोहम्मद कुरेशी, श्रीमती लक्ष्मी चौरे, वैशाली नागुलवार, नंदकुणाल धनविजय आणि दामिनी रंभाड (तलवारबाजी), शत्रुघ्न गोखले व सतिश वरिअर (बास्केटबॉल), राजकुमार नायडू, मिलींद माकडे, रुपकुमार नायडू, मृदुला केदार, आत्माराम पांडे, आशिष बँनर्जी, अनिता हलमारे-भोतमांगे, इंद्रजितसिंग रंधवा, भावना किंमतकर, प्रिती सुपारे, समिक्षा ईटनकर, अश्लेशा इंगोले (हँडबॉल) दिपक कविश्वर, प्रवीण वहाले, भूषण गोमासे, सौरभ मोहोड आणि डॉ. अशोक पाटील (आट्यापाट्या), शारदा नायडू, नितू नेवारे, नसीम शेख, भूषण बांते, कल्पना मिश्रा, आशा मेश्राम आणि लता यादव (फुटबॉल) अंजली देशपांडे, अरुणा आरवे आणि सुनील भडांगे (व्हॉलीबॉल), अपर्णा भोयर, माधुरी गुरनुले, स्वाती गुरनुले आणि वैशाली चतारे (अँथलेटीक्स), गजानन बुरडे, प्रदीप देशपांडे, सुशील झाम आणि दिनेश सार्वे (सायकलपोलो) असून, खालील पुरस्कारार्थी दिव्यांग उत्तम मिश्रा, प्रवीण उघडे, गिरीश नागभिडकर, संजय भोसकर आणि वैशाली थुल (अँथलेटीक्स) भारत्तोलनमध्ये प्रवीण सोरते, लतिका माने -लेकुरवाळे, रोशनी रिंके आणि प्रतिमा बोंडे या पुरस्कारार्थींचा समावेश आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सन्मानित राज्य डॉ. शांतिदास लुंगे व गौरव दलाल तर राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थीमध्ये संजय दुधे, अविनाश दोसटवार, मोहम्मद शरीफ शाहिद आणि सिद्धार्थ रॉय यांचा समावेश आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे नियोजन केले होते. यावेळी पुरस्कारांच्यामध्ये आंतरराष्ट्रीय योगापटू धनश्री लेकुरवाळेच्या मार्गदर्शनात योगा कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. तसेच बहुमहिला संस्था नागपूरच्या रजनी धुर्वे यांच्या मार्गदर्शनात देशभक्ती गीत सादर करण्यात आले. राकेश वानखेडे यांना जयस्तुते कार्यक्रम, अमित स्पोर्ट अकादमी व वंदेमातरम नेहरु स्पोर्ट यांच्यामार्फत देशभक्ती गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन क्रीडा अधिकारी माया दुबळे यांनी तर आभार तालुका क्रीडा अधिकारी पवन मेश्राम यांनी मानले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त सन्मानित द्रोणाचार्य, अर्जुन, दादोजी कोंडदेव आणि शिवछत्रपती पुरस्कारार्थीं सहभागी झाले होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)