एक्स्प्लोर

Azadi Ka Amrit Mahotsav : ध्वज खरेदी करण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या शाळांवर करणार कारवाई

जिल्ह्यातील अनेक शाळांत ध्वजासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येत असून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार सुरु असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

नागपूर :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 13 ते 15 ऑगस्टदरम्यान नागपूर विभागात 'घरोघरी तिरंगा' मोहीम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गंत विभागातील शासकीय, निमशासकीय कार्यालये व खासगी आस्थापना आणि घरांवर सन्मानपूर्वक राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असून, नागरिकांनीही या कालावधीत राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक फडकवून सहभागी व्हावे, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी आज येथे केले. तसेच जिल्ह्यातील अनेक शाळांत ध्वजासाठी विद्यार्थ्यांना सक्ती करण्यात येत असून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार सुरु असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

विभागीय आयुक्त कार्यालयात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माहिती संचालक हेमराज बागुल, उपायुक्त आशा पठाण आदी अधिकारी उपस्थित होते. या उपक्रमाच्या माध्यमातून देशाभिमान व जाणीव जागृतीची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वत: विकत घेऊन उभारण्यासाठी त्यांना प्रेरित करावे. भारतीय ध्वजसंहितेचे पालन करावे व राष्ट्रध्वजाचा सन्मान करावा. केंद्रीय गृह विभागाच्या 31 डिसेंबर 2021 च्या अधिसूचनेनुसार ध्वजसंहितेत बदल करण्यात आला असून, त्यानुसार सर्वांनी अनुकरण करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

विभागात 'घरोघरी तिरंगा' उत्सव

नागपूर विभागात विविध आस्थापना, घरांची संख्या  28 लक्ष 83 हजार 649 इतकी असून, नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण 3,72,262, महापालिका 6,28,245अशी एकूण 10 लक्ष 507, वर्धा 3,30,833, भंडारा 3,16,662, गोंदयिा 3,55,594, चंद्रपूर ग्रामीण 3,97,034 आणि महापालिका 1,84,615असे एकूण 5,81,649, आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 आस्थापनांचा समावेश आहे. तसेच विभागात 24 लाख 67 हजार 718 तिरंगा ध्वजांची मागणी असून, नागपूर ग्रामीण 3,72,262, महापालिका तीन लक्ष अशी एकूण 6 लक्ष 72 हजार 262, वर्धा 3,30,833, भंडारा 3,16,640, गोंदिया 3,55,594,चंद्रपूर ग्रामीण 3,50,734, महापालिका 1,43,251 अशी एकूण 4,93,985  आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 राष्ट्रध्वजांची मागणी आहे.

सर्व जिल्ह्यांना 23 लाख ध्वज देणार

विभागातील सर्व जिल्ह्यांना 23 लाख, 45 हजार 146 राष्ट्रध्वज तिरंगा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामध्ये नागपूर ग्रामीण 2,72,262, महापालिका तीन लक्ष असे एकूण 5,72,262, वर्धा 3,30,833, भंडारा 2,94,068, गोंदिया 3,55,594 चंद्रपूर ग्रामीण 3,50,734, महापालिका 1,43,251 असे एकूण 4,93,985 आणि गडचिरोली जिल्ह्यात 2,98,404 राष्ट्रध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. तसेच केंद्र शासनाकडून 1 लाख 22 हजार 572 तिरंगा ध्वज हे मागणी केल्यानुसार सशुल्क प्राप्त होणार आहेत. त्यामध्ये नागपूर ग्रामीणसाठी एक लक्ष, भंडारा 22 हजार 572 आणि गडचिरोली ग्रामीणसाठी  एक लक्ष 22 हजार 572 उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आतापर्यंत विभागीय आयुक्त कार्यालयाकडून सव्वालाख ध्वज वितरीत करण्यात आले असून, त्यामध्ये नागपूर ग्रामीणसाठी एक लक्ष तर भंडारा जिल्ह्यासाठी  25 हजार तिरंगाचा समावेश असल्याचे विभागीय आयुक्तांनी सांगितले.

विभागातील आस्थापना

घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गंत विभागात प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, रुग्णालये, औषधालये, सहकारी संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती, अंगणवाडी, उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र अशा 26 हजार 620 विविध आस्थापना असून, नागपूर 6 हजार 152, वर्धा 4 हजार 360, भंडारा 3 हजार 238, गोंदिया 3 हजार 812, चंद्रपूर 3 हजार 908 आणि गडचिरोली जिल्ह्यातील 5 हजार 150 आस्थापनांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Pawar VS Dilip Walse Patil : 'गुरू'चा कोप, शिष्य भावूक; पवारांच्या टीकेवर वळसे काय म्हणाले?Rahul Gandhi On Amit Shah Sabha : राहुल गांधींचा मोदी-शाहांवर गंभीर आरोप; धारावीच्या जमिनीसाठी..Who is Sajjad Nomani : व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चर्चेत आलेले सज्जाद नोमानी कोण आहेत? #abpमाझाDhananjay Munde Parli : बहीण-भाऊ स्टार प्रचारक, तरीही मोठी सभा का नाही? परळीत काय घडतंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
विधानसभेची खडाजंगी: सोलापूर उत्तरमध्ये पुन्हा भाजपचं कमळ खुलणार की पवारांची तुतारी वाजणार, अपक्षाचा फटका कोणाला बसणार
Sangli Assembly Constituency : भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
भाजपची हॅट्रिक की काँग्रेसची बाजी? वसंतदादा घराणं कमबॅक करणार का? सांगली विधानसभेचं गणित काय? 
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
निवडणुकीच्या धामधुमीत नागपुरात 17 किलो सोने आणि 55 किलो चांदी सापडली, 14 कोटींचा मुद्देमाल जप्त
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
शरद पवारांना गरिबांची नावं अन् श्रीमंतांची कामं लक्षात राहतात; राज ठाकरेंचा भुजबळांवरही निशाणा
Raj Thackeray on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
उद्धव ठाकरेंच्या जागी मी असतो, तर म्हटलो असतो मला नको मुख्यमंत्रीपद : राज ठाकरे
Priyanka Gandhi In Kohapur : महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
महाराष्ट्रात सरकार खरेदी करण्याची नवीन परंपरा मोदींनी सुरु केली आणि हे संविधान, भ्रष्टाचारावर बोलणार? प्रियांका गांधींचा हल्लाबोल
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
निवडणुकीसाठी परराज्यात महाराष्ट्रात किती लोकं आले, पंकजा मुंडेंनी सांगितला आकडा; भुवया उंचावल्या
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
मुंडेंच्या परळीत यंदा निवडणुकीचा धनुभाऊ पॅटर्न; शरद पवारांचे उमेदवार म्हणाले, ही निवडणूक अंडरकरंट
×
Embed widget