Mahavitaran Corruption : महावितरणच्या लाचखोर अभियंत्याला लाच घेताना रंगेहात अटक
मंजूर वीजभारपेक्षा अधिक वीजभार वाढवून हवा असल्याने तक्रारदाराने महावितरणच्या बिनाकी उपकेंद्रात अर्ज केला. वीजभार वाढवून देण्यासाठी भाजीपाले यांनी तक्रारदाराला दोन हजार रुपयांची लाच मागितली.
नागपूरः अधिक वीजभार वाढवून देण्यासाठी दोन हजारांची लाच घेणाऱ्या महावितरणच्या अथिरिक्त कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात अटक केली. प्रशांत मारोतराव भाजीपाले (वय 52) असे अटकेतील अभियंत्याचे नाव आहे. पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कंपनीचे टॉवर आहे. त्यावर मंजूर वीजभारपेक्षा अधिक वीजभार वाढवून हवा असल्याने तक्रारदाराने महावितरणच्या बिनाकी उपकेंद्रात अर्ज केला. वीजभार वाढवून देण्यासाठी भाजीपाले यांनी तक्रारदाराला दोन हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदाराने एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार केली.
यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला, अतिरिक्त अधीक्षक मधुकर गीते यांच्य मार्गदर्शनात उपअधीक्षक संदीप जगताप, निरीक्षक युनूस शेख, नितीन बलिंगवार, शिपाई भागवत वानखेडे, महेश सेलेकर, सचिन किन्हीकर, कांचन गुलबासे, शारिक अहमद यांनी उपकेंद्रात सापळा रचला. भाजीपाले यांनी लाच घेताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात अटक केली. त्यांच्याविरुद्ध पाचपावली पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
NMC Elections 2022 : नागपुरात शिंदे गट, मनसे सक्रिय: उद्धव ठाकरेंना बसणार फटका
जमीन फसवणूक प्रकरणात दोघांना अटक
नागपूरः बनावट नावासह जमीन हडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी दोघांना गिट्टीखदान पोलिसानी अटक केली आहे. याप्रकरणी 16 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रविण मोरेश्वर बोरले (वय 45, रा. साईनगर, गोधनी रेल्वे) आणि हेमलता सुनील दोडके (वय 45, रा. वाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मौजा दाभा येथील पीकेव्ही कर्मचारी हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेला प्लॉट क्र. 200 हा राजु मुकुंद बोरले (वय 62, रा. चौधरी ले आऊट, सेवाग्राम, वर्धा) आणि त्यांची आई व 2 बहिणी यांचे नावाने आहे. मात्र, या प्लॉटला मुकूंद मिनू बोरले (वय 50), प्रविण मोरेश्वर बोरले आणि हेमलता सुनील दोडके यांनी संगनमत करुन खोटे कागदपत्र तयार करीत अतुल पुरुषोत्तम बांगडकर (रा. दाभा) यांच्यासोबत विक्रीचा सौदा केला. त्यासाठी 51 हजार रुपये आगाऊ रक्कम घेतली.
याशिवाय हाच प्लॉट यशवंत मारोतीराव दरवाई (वय 42, टिळक नगर) यांच्यासोबत 22 लाख 50 हजारात विक्रीचा करारनामा करीत, पाच लाख 31 हजार रुपये घेत फसवणूक केली. याशिवाय अनेकांना तो प्लॉट विकण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राजू बोरले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी चौकशी करीत गुन्हा दाखल केला.