PM Modi : पंतप्रधानांनी विकासाचे 11 नक्षत्र असा उल्लेख केलेले विदर्भातील 11 प्रकल्प कोणते? जाणून घ्या...
पंतप्रधानांनी नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भवासियांना 75 हजार कोटींच्या प्रकल्पाचे गिफ्ट दिले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केला.
PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागपूर दौऱ्यादरम्यान विदर्भवासियांना 75 हजार कोटींच्या प्रकल्पांचे गिफ्ट दिले आहे. या प्रकल्पांमुळे फक्त विदर्भच नव्हे तर महाराष्ट्राची एक वेगळी ओळख निर्माण होईल असा विश्वासही यावेळी पंतप्रधानांनी (PM Narendra Modi) व्यक्त केला. यामध्ये उद्घाटन करण्यात आलेला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा (Balasaheb Thackeray Samruddhi Mahamarga) पहिला टप्पा म्हणजेच नागपूर ते शिर्डी असा 520 किमीचा मार्ग आज जनतेसाठी खुला केला. उर्वरित शिर्डी ते मुंबई हा टप्पाही वेळेत पूर्ण करु असा विश्वास यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. तसेच आपण सरकारमध्ये असतानाच एखाद्या प्रकल्पाचे भूमिपुजून होणे आणि त्यांचे लोकार्पणाची संधी मिळणे यासाठी स्वतःला भाग्यवान मानत असल्याचे भावनिक उद्गारही यावेळी मुख्यमंत्र्यांनी काढले.
आज म्हणजेच रविवारी पंतप्रधान मोदींनी नागपुरात कोणकोणत्या प्रकल्पाबद्दल काय काय केले, जाणून घेऊया...
1) हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी दरम्यानच्या 55 हजार कोटींच्या 520 किलोमीटरच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण.
2) नागपूर - बिलासपूर - नागपूर या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केले. ताशी 130 किमी वेगाने ही एक्स्प्रेस धावणार आहे. सोमवार ते शनिवार ही गाडी धावणार असून नागरिकांना दर्जेदार सुविधा यामध्ये मिळणार आहे.
3) भारतीय रेल्वेच्या नागपूरातील सीताबर्डी येथील मुख्य रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 589 कोटी आणि अजनी येथील रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी 360 खर्चाच्या प्रकल्पाची पायाभरणी केली.
4) अजनी येथे बाराशे एचपीच्या लोकोमोटीव्ह ( इंजिन ) मेंटेनेंस सेंटर चे उद्घाटन केले.
5) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ( AIIMS) नागपुरचे राष्ट्राला समर्पण केले. हे रुग्णालय 150 एकर क्षेत्रात अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे. (कोरोना काळात रुग्णसेवेसाठी रुग्णालय सुरु करण्यात आले होते. मात्र औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला नव्हता.)
6) नागपूर मेट्रो रेलच्या पहिल्या फेजमधील रिच 2 आणि रिच 3 या 40 किमी अंतराच्या आणि 9300 कोटी खर्चातून तयार झालेल्या मार्गिकेचे लोकार्पण आणि नागपूर मेट्रोच्या विस्तारासाठी 6700 कोटी खर्चाच्या 44 किमी अंतराच्या फेज 2 चे भूमिपूजन केले.
7) नरखेड-कोहळी रेल्वे मार्गावरील तिसऱ्या लाईन चे लोकार्पण केले.
8) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान ( AIIMS) नागपुरचे राष्ट्राला समर्पण केले. (कोरोना काळात रुग्णसेवेसाठी रुग्णालय सुरु करण्यात आले होते. मात्र औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला नव्हता.)
9) सेंटर फॉर स्किलिंग अँड टेक्निकल सपोर्ट (म्हणजेच सीटीएस) चंद्रपूर, महाराष्ट्राचे लोकार्पण केले.
10) रक्तसंबंधीत रोगांवरील अनुसंधान केंद्र (Centre for Research Management and Control of Hemoglobinopathies), चंद्रपूर
11) नागपूर नाग नदी प्रकल्पाच्या विकास (Nag River) आणि स्वच्छतेचा प्रकल्प.
ही बातमी देखील वाचा