(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पंतप्रधान गोव्यातही पोहोचले, मात्र भाषण ऐकण्यासाठी मिहानमध्ये गेलेले नागपूरकर अजूनही ट्रॅफिक जॅममध्येच...
पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंतप्रधान नागपुरातील कार्यक्रम संपवून गोव्यातही पोहोचले. तरी नागपूरकरांची गाडी सभास्थळावरुन मुख्यमार्गापर्यंतही अद्याप पोहोचली नाही.
PM Narendra Modi in Nagpur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नागपूर दौऱ्यात विदर्भवासियांना (Vidarbha) 75 हजार कोटींच्या विकास प्रकल्पांची भेट दिली. पंतप्रधान येणार म्हणून नागपूरकरांमध्येही उत्साह संचारला होता. मात्र पोलीस प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे पंतप्रधान नागपुरातील कार्यक्रम संपवून गोव्यातही पोहोचले. तरी नागपूरकरांची गाडी सभास्थळावरुन मुख्यमार्गापर्यंतही अद्याप पोहोचली नाही. प्रशासनाकडून वाहतूकीचे नियोजन करण्यात आले नसल्याचा मनस्ताप मात्र नागपूकरांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.
आगामी नागपूर महानगरपालिका (nagpur municipal corporation election) निवडणूका लक्षात घेता. पंतप्रधानांच्या दौऱ्याद्वारे वातावरणनिर्मिती करत शक्ती प्रदर्शन करण्यासाठी भाजपनेही (BJP) कंबर कसली होती. पंतप्रधान जाणाऱ्या मार्गांवर मोठे बॅनर्स, भारती जनता पक्षाचे झेंडे, भाजपच्या ध्वजाच्या रंगाचे फुगे आदी शहरातील रस्त्यांची सजावट करण्यात आली होती. कधीही न झालेले रस्ते दुरुस्तीचे काम रात्रांदिवस जाऊन कंत्राटदारांकडून भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) (NHAI), सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD), नागपूर महानगरपालिका (nagpur municipal corporation), जिल्हा प्रशासन, नागपूर मेट्रोने (Nagpur Metro) करवून घेतले. पंतप्रधानांच्या ताफ्याला दळण-वळणासाठी अडचण होऊ नये म्हणून शहरातील अनेक मार्ग नागपूर पोलिसांनी (Nagpur Police) बंद केले होते. मात्र तरी सर्व सामान्य नागपूरकरांच्या सोयीसाठी मात्र प्रशासनाने कुठलेही नियोजन गांभीर्याने केले नसल्याचे एम्स आणि मिहान परिसरातील वाहतूक कोंडीतून दिसून येत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुमारे 75 हजार कोटींचे विविध अकरा प्रकल्प विदर्भवासियांना मिळाले. यात नागपूर मेट्रोचे नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्स्प्रेस, नागपूर मेट्रो फेज वनच्या रीच 2 आणि रीच 3 चे लोकार्पण, मेट्रो फेज 2चे भूमिपूजन, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण, एम्स रुग्णालयाचे राष्ट्राला अर्पण, नाग नदीचे स्वच्छता प्रकल्प, नागपूर मुख्य रेल्वे स्थानक आणि अजनी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विसाक प्रकल्पाचे भूमिपजून यासह आदी प्रकल्पांचा समावेश होता.
पंतप्रधानांच्या एम्स (AIIMS) रुग्णालय परिसरातील मुख्य कार्यक्रमासाठी सुमारे 30 हजार नागरिकांची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये नागपूर शहर आणि ग्रामीणच नव्हे तर विदर्भातील शेजारच्या जिल्ह्यांतील भाजप पदाधिकाऱ्यांनाही जबाबदारी देणण्यात आली होती. आगामी मनपा निवडणूक असल्याने तिकीटासाठी इच्छुक उमेदवारांनाही पक्ष श्रेष्ठींच्या आदेशाला साथ देत आपल्या प्रभागातील नागरिकांसाठी वाहन आणि नाशत्याची सुविधा उपलब्ध करुन दिल्याची चर्चा आहे. मात्र एवढ्या मोठ्या संख्येत नागरिक एकत्र आल्यावर त्यांच्या वाहनांचे मार्ग, निघण्याची वेळ आदींची नियोजन करण्यास प्रशासनाला वेळच भेटला नाही की काय असा प्रश्न वाहतूक कोडींत अडकलेले नागपूरकर विचारत आहेत.
ही बातमी देखील वाचा