एक्स्प्लोर

अल्पवयीन मुलाशी लग्न, 'त्या' महिलेचा जामीन नाकारला

अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या 22 वर्षीय महिलेला जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं शनिवारी जामीन देण्यास नकार दिला आहे. विशेष कोर्टात शनिवारी या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी झाली. सदर महिलेवर पोक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई : एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाशी लग्न करणाऱ्या 22 वर्षीय महिलेला जामीन देण्यास मुंबई सत्र न्यायालयानं शनिवारी जामीन देण्यास नकार दिला आहे. विशेष कोर्टात शनिवारी या प्रकरणाची इन कॅमेरा सुनावणी झाली. सदर महिलेवर पोक्सो, अपहरण आणि बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी काल सुनावणी शनिवारपर्यंत तहकूब करण्यात आली होती. अल्पवयीन मुलाच्या आईनं दाखल केलेल्या तक्रारीनंतर वर्षभराच्या तपासानंतर या महिलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सदर महिलेची पाच वर्षांची मुलगी असून तीदेखील सध्या भायखळा जेलमध्ये तिच्या आईसोबतच आहे. अल्पवयीन मुलाच्या आईनं दिलेल्या तक्रारीनुसार या मुलीचा याआधी दोनवेळा घटस्फोट झालेला आहे. तसेच आपल्या मुलाचं वय लग्नाच्यावेळी 17 वर्ष 8 महिने असल्याचं सांगितले आहे. एकेदिवशी ही महिला रात्री अचानक मुलाच्या घरी आपल्या नातेवाईकांसह दाखल झाली. तुमच्या मुलानं माझ्याशी लग्न केलं असल्यानं आता मी याच घरात राहणार असल्याचा दावा केला. मुलाच्या आईवडिलांनी याला विरोध करताच महिलेनं तिच्या नातेवाईकांसह त्यांना दमदाटी केली व स्वत:ला इजा करून घेण्याची धमकी दिली. या घटनेनंतर मुलगाही आईवडिलांचं घर सोडून गेला. या सगळ्याचा मुलाच्या मानसिकतेवर इतका परिणाम झालाय की तो दहावीच्या परिक्षेत यंदा नापास झाला. या महिलेनं जामीनासाठी अर्ज करताना म्हटलंय की नवऱ्याशी असलेलं आपलं नात हे दोघांच्या सहमतीनं आहे. तसेच मुलगा लग्नाच्यावेळी अल्पवयीन असल्याचा तक्रारदार आईचा दावा खोटा असल्याचाही दावा केला आहे. तक्रारदार महिलेला तीन मुलं आहेत. ज्यातील मोठी मुलगी 20 वर्षांची असून त्यानंतरची दुसरी मुलगी ही 18 वर्षांची आहे. मग तिसरा मुलगा 17 वर्ष 8 महिन्यांचा कसा असू शकतो? असा दावा केला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सEknath Shinde vs Ganesh Naik : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची 'डरकाळी' Rajkiya Shole Special ReportDhananjay Munde :राजीनाम्याचा फैसला कुणाच्या कोर्टात?दिल्लीत काय झालं? Rajkiya Shole Special ReportZero Hour : Nanded Corporation : महापालिकेचे महामुद्दे : नांदेडकरांच्या समस्या कोणत्या?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Aditi Tatkare : राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अहिल्याभवन उभे करण्यास गती द्यावी : अदिती तटकरे
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या! ओवैसी म्हणाले, एका रात्रीत 655 पाने कशी वाचायची?
वक्फ सुधारणा विधेयकात जेपीसीमधील विरोधी खासदारांच्या सुचनांना कात्रजचा घाट! सत्ताधाऱ्यांच्या दुरस्त्या मात्र स्वीकारल्या!
Nashik : नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
नाशिकमध्ये 776 गावांमध्ये भूजल पातळी खालावली, पाण्याच्या आणीबाणीची शक्यता, विहीर खोदण्यास बंदी
IND vs ENG 4th T20I : भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
भारत-इंग्लंड चौथ्या टी-20 मॅचवर जीबीएसचे सावट; पुण्यातील एमसीएचे मैदानावर कोणती खबरदारी घेतली जात आहे?
Success Story: नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
नैसर्गिक शेतीनं उत्पादन 50 टनांहून 400 टनांवर गेलं, यवतमाळच्या 73 वर्षांच्या शेतकऱ्याला पद्मश्री मिळाला, कशी केली त्यांनी शेती?
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Dhananjay Munde PC : संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशी द्या, धनंजय मुंडे यांची मागणी
Cidco Lottery 2025 : सिडकोच्या 26000 घरांसाठी किती जणांनी बुकिंग शुल्क भरलं? सोडतीची तारीख ठरली...
सिडकोच्या 26000 घरांसाठी बुकिंग शुल्क किती अर्जदारांनी भरलं? सोडतीचं वेळापत्रक जाहीर 
Ibrahim Ali Khan Debut:
"याच्या तर रक्तातच अॅक्टिंग..."; करण जोहरकडून इब्राहिम अली खानला डेब्यू फिल्म ऑफर...
Embed widget