कोणाच्या आदेशाने किंवा आशीर्वादाने वाधवान कुटुंब महाबळेश्वरमध्ये? मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावं : देवेंद्र फडणवीस
विशेष गृहसचिवांचं पत्र घेऊन लॉकडाऊनमध्येही घोटाळ्याचे आरोपी असलेले वाधवान कुटुंबातील 23 सदस्य मुंबईहून महाबळेश्वरमध्ये पोहोचले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सरकारकडे स्पष्टीकरण देण्याची मागणी केली आहे.

स्थानिकांच्या तक्रारीनंतर वाधवान कुटुंब ताब्यात वाधवान कुटुंब मुंबईच्या वांद्र्यातील पाली हिल परिसरातं राहतं. मुंबईहून हे कुटुंब महाबळेश्वरमध्ये पोहोचलं असता, स्थानिकांनी 23 जणांना पाहून याचा विरोध केला आणि लॉकडाऊनदरम्यान हे लोक महाबळेश्वरला कसे पोहोचले. काही रहिवाशांनी याची तक्रार स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये केली आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वरमध्ये पोहोचलेल्या सगळ्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सध्या वाधवान कुटुंबातील सर्व सदस्यांना विलग करण्यात आलं आहे. महाबळेश्वरमध्ये दाखल झालेल्यांमध्ये कुटुंबातील महिला आणि मुलांचाही समावेश आहे. वाधवान प्रकरणात गृहमंत्र्यांचीच चौकशी करावी : चंद्रकांत पाटील विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता सक्तीच्या रजेवर लॉकडाऊनदरम्यान वाधवान कुटुंबीयांना प्रवासाची परवानगी देणारे विशेष गृहसचिव अमिताभ गुप्ता यांना तातडीने सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आलं आहे. त्यांच्याविरुद्धची चौकशी संपेपर्यंत ते सक्तीच्या रजेवर असतील, अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. अनिल देशमुख यांनी रात्री दोन वाजत या संदर्भात ट्विटरवरुन माहिती दिली. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही येस बँक घोटाळ्यातील वाधवान कुटुंबातील 23 जण सात गाड्यांमधून मुंबईहून महाबळेश्वरला गेल्याचं उघडं झालं. विशेष म्हणजे त्यांच्याकडे गृह मंत्रालयाच्या विशेष सचिवाचं पत्र मिळालं. त्यामुळे सामान्यांना एक नाही आणि श्रीमंत धेंडांना, त्यातही घोटाळ्याच्या आरोपींना संचारबंदीत फिरण्याची मुभा कशी काय मिळाली यांसह अनेक प्रश्न उपस्थित झाले होते.With whose order or blessings was this done ? Mr. CM & HM you owe us an explanation. (2/2)
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 9, 2020
वाधवान कुटुंबाला संचारबंदीत प्रवासाची परवानगी कशी? किरीट सोमय्यांचं चौकशीचीसाठी राज्यपालांना पत्र
'त्या' 23 जणांमध्ये कुणाचा समावेश?
कपिल वाधवान अरुणा वाधवान वनिता वाधवान टीना वाधवान धीरज वाधवान कार्तिक वाधवान पूजा वाधवान युविका वाधवान अहान वाधवान शत्रुघ्न घागा मनोज यादव विनीद शुक्ला अशोक वाफेळकर दिवाण सिंग अमोल मंडल लोहित फर्नांडिस जसप्रीत सिंह अरी जस्टीन ड्मेलो इंद्रकांत चौधरी प्रदीप कांबळे एलिझाबेथ अय्यापिल्लई रमेश शर्मा तारकर सरकार
Anil Deshmukh | वाधवान प्रकरणी गृहमंत्रालय चौकशी करणार : गृहमंत्री अनिल देशमुख
























