वाधवान प्रकरणात गृहमंत्र्यांचीच चौकशी करावी : चंद्रकांत पाटील
देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे.
मुंबई : देश लॉकडाऊन असताना महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबाला गृहमंत्रालयाचे पत्र असल्याने प्रवासात कुणीच अडवले नाही .गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. त्यामुळे गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा घेण्याची मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. देश लॉकडाऊन असताना मुंबईतून महाबळेश्वरात दाखल झालेल्या वाधवान कुटुंबामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. या सर्व प्रकरणावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील नाराज असल्याची चर्चा आहे.
चंद्रकांत पाटील आपल्या ट्विटमध्ये म्हणाले, 'गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा अशी मी मागणी करतो. शिवाय ते डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील जामीनावर असलेले आरोपी आहेत.आरोपींना सीबीआयच्या ताब्यात देण्याऐवजी राष्ट्रवादीकडे असलेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्यानी त्यांना विशेष सवलत दिली.'
गृहमंत्र्यांना अंधारात ठेवून असे पत्र देणे हे अशक्य आहे. गृहमंत्र्यांची सखोल चौकशी करून त्यांचा त्वरित राजीनामा @CMOMaharashtra यांनी घ्यावा अशी मी मागणी करतो.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 9, 2020
सीबीआयच्या समन्समुळे वाधवान ब्रदर्स महाबळेश्वरला पळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सीबीआयचे वाधवान यांना तीन समन्स आले होते, त्यानंतर सीबीआयचं पथक वाधवान यांच्या मागावर होतं. मात्र त्यांचा पाठलाग चुकवण्यासाठी वाधवान कुटुंबीय महाबळेश्वरला गेले, अशी शंका उपस्थित होत आहे.
वाधवान बंधूंना आणि कुटुंबाला देशात संचारबंदी लागू असताना महाबळेश्वरला प्रवास करण्यासाठी विशेष पास किंवा परवानगी कशी मिळाली. महाबळेश्वरला जाताना त्यांच्य गाड्यांचा ताफा कुठेच कसा अडवला गेला नाही. शिवाय ते डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्यातील जामीनावर असलेले आरोपी आहेत. त्यामुळे यासर्व प्रकरणाची चौकशी करण्याची विनंती किरीट सोमय्या यांनी राज्यपालांना पत्राद्वारे केली आहे
सात गाड्यांमधून हे 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या सर्वांना पाचगणीतील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केला जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखाने दिली आहे.
संबंधित बातम्या :