एक्स्प्लोर
महाराष्ट्र गारठला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहूल
मुंबईकरांना हवीहवी वाटणाऱ्या थंडीची चाहूल लागली असून तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे.
मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच मुंबईच्या किमान तापमानात घट नोंदविण्यात येत असल्याने मुंबईकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे मुंबईकर सध्या थंडीचा सुखद अनुभव घेत आहेत. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईचे किमान तापमान 15 अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले होते. आज मुंबईचं तापमान 21 अंश सेल्सिअस इतक नोंदवण्यात आलं आहे. सध्या किमान तापमानात होत असलेल्या घसरणीमुळे सकाळी आणि सायंकाळी मुंबई शहर आणि उपनगरात गार वारे वाहत असून, मुंबईकरांना थंडी अनुभवता येत आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारची थंडी मुंबईकरांना 17 जानेवारीपर्यंत अनुभवता येणार आहे. हिवाळा सुरू होऊनही मुंबईत मात्र त्याचा परिणाम जाणवत नव्हता. अखेर आता मुंबईत हळूहळू गारठा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. पारा हळूहळू खाली येऊ लागल्याने आता लवकरच मुंबईत थंडीचा मौसम सुरू होणार आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार पारा 21 अंशांपर्यंत खाली उतरला होता. पण पारा 17 अंशांच्या खाली उतरल्यास थंडीचा अनुभव मुंबईकरांना घेतला येणार आहे. पण सध्या थोडा थोडा गारठा निर्माण होण्यास सुरुवात झाल्याने ही देखील मुंबईकरांसाठी दिलासादायक बाब आहे. तेव्हा मुंबईकर आता गुलाबी थंडीच्या प्रतीक्षेत असून ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र गारठला -
मुंबईत थंडीची चाहूल सुरू झाली असताना राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मात्र याआधीच थंडी सुरू झाली आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी पारा 15 अंशांच्या खाली उतरला आहे. विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान 14 ते 16 अंशांच्या आसपास आहे. हे तापमान सरासरी किमान तापमानापेक्षा कमी असल्याची नोंद अकोला, अमरावती, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ येथे झाली. काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने तापमानाचा पारा जास्तच खाली घसरला आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी फायदेशीर मानली जाते. त्यामुळे अवकाळी पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्याला यामुळे थोडा दिलासा मिळाला आहे.
संबंधित बातम्या -
Nashik Climate | नाशिककरांना हिवाळ्यात विचित्र अनुभव, दुपारी कडक ऊन तर सकाळी थंडी | ABP Majha
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बॉलीवूड
महाराष्ट्र
जळगाव
करमणूक
Advertisement