एक्स्प्लोर

अर्ध्या देशात गोठवणारी थंडी, दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी

गेल्या 120 वर्षांत केवळ चार वेळा डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवलं होतं.

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतसह उत्तरेकडील राज्यांमध्ये सध्या गोठवणारी थंडी पडली आहे. दिल्लीतील थंडीने तर मागील 120 वर्षांपासूनचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील अनेक भागात तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसपेक्षा खाली गेला आहे. तर दिल्लीतील किमान तापमान 3.6 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे.

या गोठवणाऱ्या थंडीमुळे हावामान विभागाने दिल्लीसह सहा राज्यांमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. सकाळी सकाळी प्रत्येक गल्ली बोळांमध्ये शेकोट्या/होळी दिसू लागल्या आहेत. शेकोटीच्या सहाय्याने लोक थंडीपासून स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

हवामान विभागाने आज पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार या राज्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच मध्य प्रदेशमध्येदेखील यल्लो अलर्ट जारी केला आहे. हवामानाची परिस्थिती अत्यंत वाईट असते तेव्हाच रेड अलर्ट जारी केला जातो.

दिल्लीतल्या काही भागात काल दोन अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. तर लोधी रोड वेधशाळेने 1.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद केली आहे. गेल्या 120 वर्षांत पहिल्यांदाच डिसेंबर महिन्यात दिल्लीत एवढी थंडी पडली आहे. याआधी 1901 मध्ये डिसेंबर महिन्यात एवढी थंडी पडली होती.

दिल्लीतल्या थंडीचा विमान आणि रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काल (28 डिसेंबर) दिवसभरात चार विमानांचा मार्ग वळवण्यात आला होता. कमी दृष्यमानतेमुळे विमानांचे लॅण्डिंग करताना अडचणी येत होत्या. दरम्यान रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, थंडी आणि धुक्याचा रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली पूर्वी एक्सप्रेससह इतर 24 रेलगाड्या पाच तास उशिराने धावत आहेत.

तापमानाचा पारा आणखी घसरण्याची शक्यता

दिल्लीत शुक्रवारी किमान 4.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जे सामान्य तापमानाच्या तीन अंश सेल्सिअसने कमी आहे. तर कमाल तापमान 13.4 अंश सेल्सिअस होतं, जे सामान्य तापमानाच्या सात अंश सेल्सिअसने कमी आहे. यंदाच्या मोसमातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. आज, उद्या या तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. डिसेंबर महिन्यातील दोन दशकातील हे सर्वात निच्चांकी तापमान आहे. याआधी 1997 साली पहिल्यांदा दिल्लीकरांनी एवढ्या थंडीचा अनुभव घेतला होता.

गेल्या 120 वर्षांत केवळ चारच वेळा कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस खाली

गेल्या 120 वर्षांत केवळ चार वेळा डिसेंबरमधील कमाल तापमानाचा पारा 20 अंश सेल्सिअसच्या खाली आला आहे. डिसेंबर महिन्यातील कमाल तापमान 20 अंश सेल्सिअस पेक्षा कमी 1919, 1929, 1961 आणि 1997 मध्ये दिल्लीकरांनी अनुभवलं होतं. दोन दिवसांपूर्वी म्हणजे गुरुवारी कमाल तापमान 19.85 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलंय. गेल्या दोन आठवड्यांपासून दिल्लीत कडाक्याची थंडी पसरली आहे. आधी 1997 मध्ये सलग 13 दिवस अशी कडाक्याची थंडी पडली होती.

पुढील आढवड्यात दिलासा मिळण्याची शक्यता

पुढील आठवड्यात वाऱ्याची दिशा बदल्यास हवामानात बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिल्लीकरांना थंडीपासून थोडासा दिलासा मिळू शकतो. थंडी आणि दाट धुक्यामुळे हवामान विभागाने 29 डिसेंबरपर्यंत दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर

व्हिडीओ

Seher Shaikh MIM : मुंब्रा पूर्णपणे हिरवा करू, विरोधकांच्या अहंकाराला मातीमोल केलंय- सहर शेख
Kishor Jorgewar Chandrapur : काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये नगरसेवकांची पळवा पळवीची स्पर्धा सुरू
Thane Mayor Office : ठाण्यात २०२२ नंतर पहिल्यांदाच महापालिकेतील महापौर दालन उघडलं
Samdhan Sarvankar on BJP BMC Election : भाजप नव्हे, त्यांच्या टोळीने माझा पराभव केला : समाधान सरवणकर
Vijay Ubale AIMIM : एमआयएम मधून हिंदू उमेदवार म्हणून निवडून आल्याच्या चर्चा, विजय उबाळे EXCLUSIVE

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
निवडणूक आयोगाच्या कार्यालताच घुसले, ईव्हीएमविरोधात घोषणबाजी; पोलिसांनी 4 जणांना घेतलं ताब्यात
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
सह्याद्रीतला अंधार संपला!महाराष्ट्रातील किल्ले आणि आदिवासी गावे सौर ऊर्जेने उजळली
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरमध्ये गँगवॉरचा थरार! गावठी कट्टा काढत गोळीबार, दगड फेकले, जमाव बघताच पाण्याच्या टाकीत लपून बसला, नेमकं काय घडलं?
Embed widget