घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटनेचे नेमकं कारण काय? मुंबई महापालिका घेणार VJTI संस्थेची मदत
मुंबई महापालिकेच्या उपायुक्तांनी व्हीजेटीआयला पत्र लिहिलं असून घाटकोपर दुर्घटनेमागचं तांत्रिक कारण शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई: अचानक आलेल्या पावसानंतर घाटकोपरमध्ये भलंमोठं होर्डिंग कोसळून (Ghatkopar Hoarding Collapsed Case) त्याखाली 17 जणांचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. आता ते होर्डिंग पडण्याचा नेमकं कारण काय हे जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेने व्हीजेटीआय संस्थेला पत्र लिहिलं आहे. या दुर्घटनेमागे नेमकं कारण काय हे शोधण्यासाठी महापालिका आता व्हीजेटीआय या संस्थेची मदत घेणार आहे.
महापालिका प्रशासनाने व्हिजेटीआय संस्थेच्या संरचनात्मक अभियांत्रिकी (स्ट्रक्चरल इंजिनिअरींग) विभागाच्या प्रमुखांना पत्र पाठवलं आहे. घाटकोपर येथे होर्डिंग कोसळून आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून अजून 20 ते 30 जण त्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशा दुर्घटनेची भविष्यात पुनरावृत्ती होवू नये यासाठी काळजी घेण्यात येणार आहे. या दुर्घटनेमागचे तांत्रिक कारण शोधण्यासाठी महापालिकेडून अभ्यास करण्यात येणार आहे.
या प्रकरणी अभ्यास करून लवकरात लवकर अहवाल सादर करावाअसे पत्र उपायुक्त (विशेष) किरण दिघावकर यांनी व्हीजेटीआयच्या संरचनात्मक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख केशव सांगळे यांना पाठवले आहे. व्हीजेटीआयमधील तज्ज्ञांची टीम आता यामागचं तांत्रिक कारण शोधून हा अहवाल मुंबई महापालिकेला सादर करणार आहे.
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यूंचा आकडा 17 वर पोहोचला आहे. घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनामध्ये 50 तास उलटून गेले आहेत. अजून देखील NDRF आणि महापालिका आपत्ती सेवा,अग्निशमन दलांकडून बचावकार्य सुरूच आहे. आतापर्यंत 50 टक्के ढिगारा उपसण्याचं काम पूर्ण झालं असून 50 टक्के काम बाकी आहे.
बचावकार्याला आणखी 24 तास लागणार
ढिगाऱ्याखालून 25 दुचाकी आणि 10 चारचाकी वाहने बाहेर काढल्या आहेत. याठिकाणी एक जोडपं आणि एक वाहन चालक याठिकाणी असे एकूण 3 जण अडकले असून त्यांना जेसीबीच्या माध्यमातून बाहेर काढण्याचं काम NDRF जवानांच्या माध्यमातून केला जात आहे. आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू तर 75 जण जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.
होर्डिंगखाली अडकलेले 88 जण जखमी झाले आहेत. अनेक जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे अनधिकृत जाहिरात होर्डिंग अचानक वादळानंतर कोसळलं. या दुर्घटनेमुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
ही बातमी वाचा: