Mumbai Water Cut Decision : मुंबईकरांनो आता निश्चिंत व्हा! पालिकेकडून दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय अखेर मागे
Mumbai Water Cut Decision : मुंबई महानगरपालिकेकडून मुंबईसाठी घेण्यात आलेला दहा टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
Mumbai Water Cut Decision : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये वाढ झाल्याने मुंबई महानगरपालिकेने अखेर पाणीकपातीचा (Watercut) निर्णय मागे घेतला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठी तयार झाला आहे. त्यामुळे पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता. सातही जलाशयांमध्ये 81 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे या जलाशयात पुरेसा पाणी साठा आहे.
यंदाच्या वर्षात राज्यात मान्सूनचे आगमन उशीरा झाले होते. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये अगदी मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध होता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट ओढावलं होतं. पण सध्या वर्षभर पुरेल इतका पाणी निर्माण झाला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांवरचं पाणीकपातीचं घोंघावणारं संकट आता संपलं आहे.
मुंबईसह महानगरपालिका क्षेत्रात पाणीपुरवठा करण्यासाठी या जलाशयांमध्ये 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका उपयुक्त पाणीसाठा असावा लागतो. पण हा जलसाठा जून महिन्याच्या अखेरीस 1 लाख 41 हजार 387 दशलक्ष लिटर म्हणजेच 9.77 टक्के इतकाच उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. पावसाअभावी शनिवार दिनांक 1 जुलै 2023 संपूर्ण मुंबई महानगरापालिका क्षेत्रामध्ये 10 टक्के पाणी कपात लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासंदर्भातली माहिती मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आली होती. मुंबई महानगरपालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका आणि इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो, त्यात देखील ही 10 टक्के कपात लागू करण्यात आली होती.
मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील ही सातही धरणे ऑगस्टपर्यंत 100 टक्के भरतात. पण सध्या मान्सून बराच लांबणीवर पडतो. त्यामुळे मे अखेर ते जूनपर्यंत या धरणांमधील पाणीसाठा अक्षरश: तळाला जातात. यावर्षी देखील हा पाणीसाठा सात टक्क्यांवर गेला होता. त्यामुळे मुंबई महापालिकेकडून 1 जुलैपासून पाणीकपात करण्यात आली होती. त्यामुळे आता मुंबईकरांची चिंता मिटली असल्याचं सांगण्यात येत आहे.
मुंबईला सात जलाशयांमधून केला जातो पाणीपुरवठा
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून दररोज 3,850 दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. पण यंदा मान्सूने उशीरा हजेरी लावल्याने या जलाशयांमधील पाणीसाठा हा कमी झाला होता. जून महिन्यामध्ये पावसाने ओढ दिल्याने या जलाशयांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा कमी झाल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून महापालिकेकडून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
हेही वाचा :
Pune Water Cut : पुणेकरांना दिलासा! 10 ऑगस्टला होणारी पाणीकपात रद्द