एक्स्प्लोर
Advertisement
मतमोजणी केंद्रांवर कशी होणार मतमोजणी?
मुंबई : मुंबई महापालिकेची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलं आहे. यंदा मुंबईत विक्रमी 55.28 टक्के इतकं मतदान झालं. ही मतमोजणी कशाप्रकारे पार पडणार याबाबत मतदारांच्या मनात उत्सुकता आहे.
मुंबईत एकूण 23 मतमोजणी केंद्रे, 23 निवडणूक निर्णय अधिकारी
प्रत्येक केंद्राच्या अंतर्गत असलेल्या सर्व प्रभागांची मतमोजणी एकाच वेळी सुरु होणार
एका प्रभागासाठी दोन टेबल, प्रत्येक टेबलवर दोन बॅलेट मशीन आणि काऊंटिंग मशिन
सुरुवातीला पोस्टल बॅलेट -- पोस्टानं आलेल्या मतांची मोजणी होणार
मतमोजणीदरम्यान होणाऱ्या राऊंडची संख्या प्रभागातील एकूण मतदानावर अवलंबून असणार
एका राऊंडसाठी सरासरी 15 मिनिटांचा वेळ लागणार
प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर असणार
2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकांच्या तुलनेत 2017 मधील निवडणुकीतल्या मतदानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या निवडणुकांच्या तुलनेत तब्बल 6 लाख अधिक मतदारांनी मतदान केल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला असला तरी अनेकांना मतदार यादीतील घोळामुळे मतदान करता आले नाही. मुंबईत 2012 मध्ये भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या यादीमध्ये 1 कोटी 2 लाख मतदार होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement