एक्स्प्लोर
वसईत मॉडेलिंगच्या आमिषाने अनेकींवर रेप, आरोपीला बेड्या

वसई : मॉडेलिंगचं आमिष दाखवून तरुणींवर बलात्कार करणाऱ्या इसमाला तुळींज पोलिसांनी अटक केलीय. संदीप यादव असं या आरोपीचं नाव आहे. तक्रारीनुसार संदीपनं वेगवेगळ्या नावानं फेसबूकवर अकाऊंट उघडली आहेत. त्यांच्या माध्यमातून संदीप तरुणींशी संपर्क साधायचा आणि मॉडेलिंगचं आमिष दाखवायचा. फोटोशूटसाठी समुद्र किनाऱ्यावर बोलवून खाण्याच्या बहाण्यानं त्यांना गुंगीचं औषध द्यायचा. त्यानंतर तरुणींचं न्यूड फोटोशूट करुन त्यांच्यावर बलात्कार करायचा. मात्र एका तरुणीनं संदीपचा पर्दाफाश केला. मॉडेल बनायचं असल्याचं सांगून तरुणीनं संदीपलाच बोलवून घेतलं आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकवलं.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
सांगली
महाराष्ट्र
राजकारण























